कृष्णा कारखान्याची  निवडणूक जाहीर 

सातारा व सांगली जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या रेठरे (जि. सातारा) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला.
कृष्णा कारखान्याची  निवडणूक जाहीर  Krishna factory Election announced
कृष्णा कारखान्याची  निवडणूक जाहीर  Krishna factory Election announced

सातारा : सातारा व सांगली जिल्ह्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या रेठरे (जि. सातारा) येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला. कारखान्यासाठी २९ जूनला मतदान तर १ जुलैला मतमोजणी होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जिल्हा उपनिबंधक प्रकाश आष्टेकर यांची नियुक्ती झाली आहे. कऱ्हाडचे उपनिबंधक मनोहर माळी, कोरेगावचे संजय सुद्रीक व महाबळेश्वरचे जे. पी. शिंदे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.  जिल्हा निबंधक आष्टेकर यांनी कृष्णाची निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचा प्रस्ताव निवडणूक प्राधिकरणाकडे दिला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामध्ये मंगळवारपासून अर्ज भरण्यास सुरूवात होणार आहे. शासकीय सुट्टीचे दिवस वगळून अर्ज भरण्यास परवानगी आहे. २ जून रोजी छाननी आहे, ३ ते १७ जूनपर्यंत अर्ज माघारीची मुदत आहे. अंतिम यादी १८ जूनला जाहीर होणार आहे. त्यांनतर २९ जूनला मतदान तर १ जुलैला मतमोजणी होणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com