दोन महिन्यांपासून दिल्लीमध्ये शांततेत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला २६ जानेवारी अर्थात प्रजासत्त
ताज्या घडामोडी
कृषिभूषण सुरेश वाघधरे यांचे निधन
सोलापूर ः सोलापूर जिल्ह्यातील माळीनगर येथील प्रगतशिल शेतकरी, कृषिभूषण सुरेश दत्तात्रय वाघधरे (वय ६०) यांचे सोमवारी (ता. २८) सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील प्रयोगशील, अभ्यासू शेतकऱ्यांपैकी एक असे कृषिभूषण वाघधरे यांचे नाव होते. प्रामाणिक आणि सचोटीने काम करणारे शेतकरी म्हणून त्यांचा लौकिक होता. सोलापूर जिल्ह्यातील ठिबक सिंचन गैरव्यवहाराचे प्रकरण त्यांनीच उघडकीस आणले. तसेच त्याचा पाठपुरावाही सातत्याने केला. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी शेतीची वाट चोखाळली, विविध प्रयोग केले. नैसर्गिक व सेंद्रिय शेतीवर त्यांचा विशेष अभ्यास होता. त्याचे अनेक प्रयोग त्यांनी त्यांच्या शेतीत केले होते. सोमवारी शोकाकूल वातावरणात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
- 1 of 1030
- ››