agriculture news in marathi, krushi culture knowledge programme will celebrate in pune tomorrow, Maharashtra | Agrowon

पुण्यात उद्या रंगणार ‘कृषी कल्चर’ ज्ञान सोहळा
टीम अॅग्रोवन
रविवार, 30 सप्टेंबर 2018

पुणे ः कुशल, स्मार्ट आणि सुरक्षित शेतीसाठी लागणारे कौशल्य, समूह विकास, समूह शेती, गटशेतीचं तंत्र तसेच अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणारा अनोखा ‘कृषी कल्चर’ ज्ञान सोहळा उद्या (ता.१) पुण्यात होत आहे. एपी ग्लोबाले समूहातर्फे होणाऱ्या या सोहळ्यासाठी राज्यभरातील शेतकरी सहभागी होत आहेत. या ज्ञान सोहळ्याचे उद़़़्घाटन सकाळी १० वाजता कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्‍ते होणार आहे. 

पुणे ः कुशल, स्मार्ट आणि सुरक्षित शेतीसाठी लागणारे कौशल्य, समूह विकास, समूह शेती, गटशेतीचं तंत्र तसेच अद्ययावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती देणारा अनोखा ‘कृषी कल्चर’ ज्ञान सोहळा उद्या (ता.१) पुण्यात होत आहे. एपी ग्लोबाले समूहातर्फे होणाऱ्या या सोहळ्यासाठी राज्यभरातील शेतकरी सहभागी होत आहेत. या ज्ञान सोहळ्याचे उद़़़्घाटन सकाळी १० वाजता कौशल्य विकासमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या हस्‍ते होणार आहे. 

स्मार्ट व शाश्वत शेतीबाबत जागर घडवून आणणारा हा ज्ञान सोहळा येरवडा येथील डेक्कन कॉलेजमध्ये होत आहे. एमएसीसीआयए, चतुर आयडीयाज एक्सक्यूबेटर, नॅशनल इनोव्हेशन फाउंडेशन, बोलेरो मॅक्सीट्रक प्लस, बोलेरो पीक अप, गोदरेज ॲग्रोवेट, इंडोफील इंडस्ट्रीज लिमिटेड आणि कृषिकिंग हे या सोहळ्याचे प्रायोजक आहेत. 

महाराष्ट्र व्हिलेज सोशल ट्रान्स्फॉर्मेशन फाउंडेशनच्या कार्यकारी संचालक श्वेता शालिनी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, कृषी खात्याचे माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विलास शिंदे, रुरल रिलेशन्सचे संस्थापक प्रदीप लोखंडे, इंडोफिल इंडस्ट्रिजचे उत्पादन व्यवस्थापक महेश पवार आदी मान्यवर ‘कृषी कल्चर’मध्ये मार्गदर्शन करणार आहेत. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासोबतच कृषी क्षेत्रातील नवउद्योजक व महिला शेतकऱ्यांच्या यशोगाथा ऐकण्याची संधी ‘कृषी कल्चर’मध्ये मिळेल. राष्ट्रीय नवप्रवर्तन प्रतिष्ठानशी संबंधित संशोधकांचे नावीन्यपूर्ण संशोधन या वेळी पाहता येणार आहे. 

कृषी कल्चर परिषदेचे उद्देश

  • शाश्वत शेती आणि सर्वांगीण सामूहिक ग्रामविकासाची वाट चोखाळणे
  • शेतकऱ्यांना आदर्श शेतीपद्धती आणि नवीन तंत्रज्ञानाच ओळख करून देणे
  • स्मार्ट शेतकरी बनण्याकडे वाटचाल. समूहशक्तीचा जागर करून गटशेतीची कास धरणे
  • मार्केट लिंकेजेस विकसित करण्याची गुरुकिल्ली

इतर अॅग्रो विशेष
व्यापाऱ्यांनी शेतमाल बाजारातील बदल...पुणे ः बाजार समित्या बरखास्त केल्यास सक्षम...
नांदेड : सोयाबीनचा पेरणीपेक्षा अधिक...नांदेड  ः यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात...
पंचनाम्यांची ‘अतिवृष्टी’; रातोरात ९३...पुणे ः राज्य शासनाची यंत्रणा पिकाचे पंचनामे...
पीकविम्यापासून वंचित राहिल्यास कंपनी...अकोला ः जिल्ह्यात गेल्या महिन्यातील पावसाने...
उसावर आता तांबेरा, तपकिरी ठिबकेकोल्हापूर: सातत्याने पडणारे धुके व जमिनीतील...
राजू शेट्टीं थेट काश्‍मीरात;...कोल्हापूर : काश्मीरमधील सफरचंद, अक्रोड, केशर...
खरीप पिकांसाठी आठ हजार तर, फळबागांसाठी...मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने नुकसान...
विदर्भ, मराठवाड्यात गारठा कायमपुणे : कोकण, मध्य महाराष्ट्राच्या विविध भागात...
बांबू कलाकारीतून तयार केली ओळखकला पदवीधर असलेल्या सौ. संगीता दिलीप वडे यांनी...
पर्यावरण संवर्धन, लोक शिक्षणामध्ये ‘...अकोला, वाशीम जिल्ह्यांतील सुमारे तीस...
सत्ता अन् जीवन संघर्षराज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून २२ दिवस...
नुकसानीचा बोजा केंद्रप्रमुख, जिनिंग...जळगाव ः भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) कापूस...
गडचिरोलीत रब्बी मक्‍यावर लष्करी अळीचा...गडचिरोली  ः धानकाढणीनंतर मका लागवड होणाऱ्या...
काटेकोर शेतीत द्राक्ष उत्पादक अग्रेसर:...पुणे : कष्ट व कौशल्याच्या बळावर कोणताही आकार आणि...
चीनमधील संत्रा खरेदीदारांचे शिष्टमंडळ...नागपूर ः चीनची बाजारपेठ मोठी असल्याने संत्रा...
रसायने, कीडनाशकांचा विवेकपूर्ण वापर...नवी दिल्ली: रसायने आणि कीडनाशकांचा अतिरेकी...
पीकविमा सुधारणेसाठी अखेर समिती स्थापनपुणे: ‘‘राज्यात सध्या राबविल्या जात असलेल्या...
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची मदत रखडण्याची...मुंबई: फडणवीस सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना...
काजू, आंबा, कोकम प्रक्रिया उद्योगाची...नाधवडे (जि. सिंधुदुर्ग) येथील भालचंद्र भिकाजी...
पुणे बाजार समितीत आवळा खातोय भाव,...‘क’ जीवनसत्वासाठी प्रसिद्ध असलेल्या आणि...