कृषी विभागाचे पुरस्कार जाहिर, भडसावळे, बोरसे कृषिरत्न

चंद्रशेखर भडसावळे, शिवनाथ बोरसे यांना कृषिरत्न पुरस्कार
चंद्रशेखर भडसावळे, शिवनाथ बोरसे यांना कृषिरत्न पुरस्कार

मुंबई : राज्यात कृषी, कृषीसंलग्न क्षेत्र, तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दिल्या जाणाऱ्या विविध कृषी पुरस्कारांची राज्य सरकारने तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर शनिवारी (ता.२) घोषणा केली. चंद्रशेखर भडसावळे हे २०१५ च्या, तर शिवनाथ भिकाजी बोरसे २०१६ च्या कृषिरत्न पुरस्काराचे मानकरी ठरले. अॅग्रोवनचे प्रतिनिधी गणेश कोरे, संदीप नवले (पुणे) आणि सूर्यकांत नेटके (नगर) यांना शेतीमित्र पुरस्काराने गौरविण्यात आले. २०१५ आणि २०१६ या दोन वर्षांतील हे कृषी पुरस्कार राज्य सरकारने जाहीर केले.  पुरस्कारप्राप्त व्यक्ती, संस्थांची नावे अशी आहेत.   डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार (२०१५) 

  •  चंद्रशेखर भडसावळे (सगुणा बाग, मालेगाव, पोस्ट दहिवली, नेरळ, ता. कर्जत, रायगड)
  • वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार (२०१५)  

  •  रामचंद्र रघुनाथ सावे (चिंचणी, ता. डहाणू, पालघर) 
  •  प्रकाश भुत्ता पाटील (पढावपद, ता. शिंदखेडा, धुळे)
  •  मोतीराम लक्ष्मण गावित (शिंदे (दि), पोस्ट मोहपाडा, ता. सुरगाणा, नाशिक)
  •  राजेंद्र नानासो गायकवाड (भुईंज, ता. वाई, सातारा)
  •  उद्धव आसाराम खेडेकर (शिवणी, ता. नेर, जालना)
  •  रवींद्र बाबासाहेब गोल्डे (पिंपरखेड, ता. अंबड, जालना)
  •  त्रिंबक अप्पाराव फंड (जळकोटवाडी, ता. तुळजापूर, उस्मानाबाद)
  •  अरुण गणपतराव धुळे (सुनगाव, ता. जळगाव जामोद, बुलडाणा)
  •  सैयद खुर्शिद सै. हाशम (बोरगाव मंजू, ता.जि. अकोला)
  •  यादव दसरुजी मेश्राम (लवारी, ता. साकोली, भंडारा)
  • जिजामाता कृषिभूषण पुरस्कार (२०१५)
  •  सुलोचना तुकाराम पिंगट (रावडेवाडी, ता. शिरूर, पुणे)
  •  मंदाताई वसंतराव पाटील (माळेवाडी-डुक्रेवारी, ता. राहुरी, नगर)
  •  आनंदी सीताराम चौगले (पोहाळे तर्फ आळते, ता. पन्हाळा, कोल्हापूर)
  •  सुवर्णा विनय निकम (पलूस, ता. पलूस, सांगली)
  • वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (२०१५)

  •  संदीप दत्तू नवले (भेंडा, ता. नेवासा, नगर)
  •  दत्तात्रय श्रीपती बोरगे (खुपीरे, ता. करवीर, कोल्हापूर)
  •  विजय एकनाथराव चौधरी (वेद बंगलो, १०७, गणपती मंदिराजवळ, ता. खुलताबाद, औरंगाबाद)
  • वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) (२०१५)

  •  शशिकांत भास्करराव पुंडकर (येऊलखेड, ता. शेगाव, बुलडाणा)
  •  दिलीप ऊर्फ रामदास नारायण फुके (चांभई, ता. मंगरुळपीर, वाशीम)
  •  सुमन माणिकराव झेंडे (पांडेश्वर, ता. बदनापूर, जालना)
  •  किसन रामदास शिंदे (वरुडी, ता. बदनापूर, जालना)
  •  हेमंत वसंतराव देशमुख (डोंगरकिन्ही, ता. मालेगाव, वाशीम)
  •     सुरेश एकनाथ कळमकर (मोहाडी, ता. दिंडोरी, नाशिक)
  •     भरत अंसिराम आहेर (टोणगा, ता.जि. औरंगाबाद)
  •     बालाजी बाजीराव तट (आपेगाव, ता. अंबेजोगाई, बीड)
  •     मनीष आत्माराम देसले (आसनगाव, ता. डहाणू, पालघर)
  •     तात्यासाहेब रामचंद नागावे (खटाव, ता. पलूस, सांगली)
  •     रमेश जयसिंग शिंदे (शिरगाव, ता. वाई, सातारा)
  •     अतुल प्रभाकर बागल (गादेगाव, ता. पंढरपूर, सोलापूर)
  •     अमर तात्यासाहेब पाटील (येडेनिपाणी, ता. वाळवा, सांगली)
  •     प्रमोद राघोबा दळवी (विलवडे, ता. सावंतवाडी, सिंधुदुर्ग)
  •     विनोद हाल्या मोरे (अंबोडे, ता. जि. पालघर)
  •     रवींद्र धनसिंग पवार (सातमाने, ता. मालेगाव, नाशिक)
  •     रामदास तात्याभाऊ यादव (उंचखडक, ता. जुन्नर, पुणे)
  •     बाबासाहेब बाळासाहेब पाटील (हेर, ता. उदगीर, लातूर)
  •     सदाशिव नाथा थोरात (सारोळा खुर्द, ता. पाथरी, परभणी)
  • वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार  (आदिवासी गट) (२०१५)

  •     सोमा धर्मा घोडे (तळेरान, ता. जुन्नर, पुणे) 
  •     सुरेश नामदेव भोये (खिरकडे, ता. पेठ, नाशिक)
  •     दत्तात्रय लक्ष्मण मोरमारे (टोकावडे, ता. खेड, पुणे)
  •     कैलास राघो बराड (नेवरे, ता. शहापूर, ठाणे)
  •     सीताराम दगडू आंबेकर (पोखरी, ता. आंबेगाव, पुणे)
  •     विमल जगन आचारी (चाकोरे, ता. त्र्यंबकेश्वर, नाशिक)
  • उद्यान पंडित पुरस्कार (२०१५)

  •     शशिकांत शंकर पुदे (बाभुळगाव, ता. मोहोळ, सोलापूर),
  •     भाऊसाहेब गोविंद जाधव (पिंपळगाव, ता.जि. नाशिक),
  •     प्रकाश मारुती शिंदे (परखंदी, ता. वाई, सातारा), 
  •     विकास तुकाराम थिटे (बावची, ता. परांडा, उस्मानाबाद),
  •     रमेश उत्तमराव सिरसट (आरणगाव, ता. केज, बीड)
  •     भदू गणपत कायते (पहेला, ता.जि. भंडारा),
  •     अतुल पुरुषोत्तम लकडे (अब्बासपुरा, ता. अचलपूर, अमरावती),
  •     पुष्पा एकनाथ कोटकर (बिरवाडी, ता. शहापूर, ठाणे).
  • पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार (२०१५)     रामचंद्र उद्धव लोकरे, कृषी उपसंचालक, कृषी आयुक्तालय, पुणे राज्यस्तरीय पीक स्पर्धा (२०१५) 

  •     प्रथम - हिम्मत हिंदुराव थोरात-पाटील 
  •     (सुपने, ता. कराड, सातारा),
  •     द्वितीय - मलगोंडा सातगोंडा टेळे 
  •     (सुळकूड, ता.कागल, कोल्हापूर),
  •     तृतीय - साताप्पा कृष्णा पाटील 
  •     (चंद्रे, ता.राधानगरी, कोल्हापूर),
  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार (२०१६) 

  • शिवनाथ भिकाजी बोरसे (भोयेगाव, ता. चांदवड, नाशिक)
  • वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार (२०१६) 

  •     दिलीप बाबाजीराव देशमुख (काराव, ता. अंबरनाथ, ठाणे)
  •     वामन किसन भोये (दलपतपूर, ता. त्र्यंबकेश्वर, नाशिक)
  •     अरुण बबनराव पवार (पवारवाडी, ता. मालेगाव, नाशिक)
  •     मकरंद बलभीम सरगर (खुडूस, ता.माळशिरस, सोलापूर)
  •     पांडुरंग वामनराव ईनामे (रांजणगाव खुरी, ता. पैठण, औरंगाबाद)
  •     अनिल काशिनाथ चेळकर (किल्लारी, ता. औसा, लातूर)
  •     नंदा काल्या चिमोटे (पलश्या, चिखलदरा, अमरावती)
  •     अरविंद उद्धवराव बेंडे (रातचांदणा, ता.जि. यवतमाळ)
  • प्रवीण विश्वनाथराव बोबडे (रासेगाव, ता. अचलपूर, अमरावती)
  • जिजामाता कृषिभूषण पुरस्कार (२०१६)

  •     प्रभावती जनार्दन घोगरे (लोणी खुर्द, ता. राहाता, नगर)
  •     कविता प्रवीण जाधव-बिडवे (जोगेश्वरी आखाडा, ता. राहुरी, नगर)
  •     सुनंदा शिवाजी क्षीरसागर (पांगरा, ता. पैठण, औरंगाबाद)
  • वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार (२०१६) 

  •     गणेश बाळासाहेब कोरे (बी-८ दौलतनगर सिंहगड रोड, वडगाव बु, पुणे)
  •     सूर्यकांत विलास नेटके (भुतकरवाडी, सावेडी, नगर)
  •     संतोष शामराव देशमुख (फ्लॅट ७४, गल्ली- ५, सुधाकरराव नाईक विद्यालय, न्यू हनुमान नगर, औरंगाबाद)
  • वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) (२०१६)

  •     लक्ष्मण तात्याबा गरुड (आसनपोई, ता. महाड, रायगड)
  •     हेमंत पुंडलिक पिंगळे (लखमापूर, ता. दिंडोरी, नाशिक)
  •     उत्तमराव भागुजी ठोंबरे (भोयेगाव, ता.चांदवड, नाशिक)
  •     गणेश दामू निसाळ (लहवित रोड, भगूर, ता.जि. नाशिक)
  •     नवनाथ सोपान शेळके (पिंपळोली, ता. मुळशी, पुणे)
  •     प्रदीप भार्गव पवार (१०२, बुधवार पेठ, नीलम बंगला, कराड, सातारा)
  •     संतोष लक्ष्मणराव राठोड (वसंतनगर तांडा, ता. परळी वैजनाथ, बीड)
  •     दिपक पांडुरंग चव्हाण (सुलतानपूर, ता. खुलताबाद, औरंगाबाद)
  •     पुंजाराम अंकुशराव भुतेकर (हिवर्डी, ता.जि. जालना)
  •     समील भिमाजी इंगळे (सिंगापूर, ता. पुरंदर, पुणे)
  •     गणेश अर्जुन जगदाळे (बांधतिवरे, ता. दापोली, रत्नागिरी)
  •     राजकुमार धोंडिराम बिरादार (गौंडगाव, वि, ता. देवणी, लातूर)
  •     कोंडाजी बबन सणस (पेठ कोरेगाव, ता.आंबेगाव, पुणे)
  •     विजया अरविंद पोटे (कोळिंब, ता.कल्याण, ठाणे)
  •     अशोक हिंदुराव खोत (माऊली उरुण इस्लामपूर, ता.वाळवा, सांगली)
  •     चांगदेव विष्ण मोरे (सासुर्वे, ता.कोरेगाव, सातारा)
  •     अमृत तुळशीराम मदनकर (खोलमारा, ता. लाखांदूर, भंडारा)
  •     राजेंद्र महादेवराव ताले (दिग्रस, ता.पातूर, अकोला)
  •     अच्युत तुकाराम बोचरे (पाडोळी, ता.जि. उस्मानाबाद)
  • वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (आदिवासी गट) (२०१६)

  •     सुरेश बापूराव गरमडे (वायगाव ख., ता. वरोरा, 
  • चंद्रपूर)
  •     सुभाष चंदर डवणे (नायफड, ता. खेड, पुणे)
  •     चंद्रकांत गोविंद जाधव (म्हाळुंगे पडवळ, ता. आंबेगाव, पुणे)
  •     विनायक मारुती पोटे (रामपूर, ता. मुरबाड, ठाणे)
  •     लक्ष्मण गंगा पागी (धामणी, ता. शहापूर, ठाणे)
  •     सुरेश महादू भोईर (दुधणी, ता. भिवंडी, ठाणे)
  • उद्यान पंडित पुरस्कार (२०१६)

  •     सचिन साधू सांगळे (कुरवली, ता. फलटण, सातारा)
  •     रमेश नामदेव मेहेर (अलदरे, ता. जुन्नर, पुणे)
  •     अशोक शिवराम वानखेडे (टाकळी सुकळी जं, ता.उमरखेड, यवतमाळ)
  •     विजय उत्तम ठाकरे (निराळा, ता. किनवट, नांदेड)
  •     अशोक पंजाबराव धोटे (कोच्छी, ता. सावनेर, नागपूर)
  •     चंद्रशेखर रामभाऊ बढे (रुईखेडा, मुक्ताईनगर, जळगाव)
  • कृषिभूषण (सेंद्रीय शेती) शेतकरी (२०१६)

  •     स्नेहल अनंतराव पोतदार (जामशेत, ता. डहाणू, पालघर)
  •     तुकाराम राजाराम पडवळे (खुपसंगी, ता. मंगळवेढा, सोलापूर)
  •     संजय निंबा भामरे (काळगाव, ता. साक्री, धुळे)
  • कृषिभूषण (सेंद्रीय शेती) संस्था (२०१६)

  •     श्री क्षेत्र सिद्धगिरी मठ, कणेरी, ता. करवीर, कोल्हापूर.
  • पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, कृषी सेवारत्न पुरस्कार (२०१६)

  •     गोविंद गंगाराम हांडे (तंत्र अधिकारी, फलोत्पादन, कृषी आयुक्तालय, पुणे)
  •     रामचंद्र दाजी आलदर (कृषी सहायक, भोसे-१, ता. मंगळवेढा, सोलापूर)
  • राज्यस्तरीय पीक स्पर्धा (२०१६)

  •     प्रथम - कलगोंडा बापूसो पार्वते (सुळकूड, ता. कागल, कोल्हापूर),
  •     द्वितीय - धोंडिराम खानगोंडा कतगर (सुळकूड, ता. कागल, कोल्हापूर),
  •     तृतीय - चंद्रकांत शामराव चव्हाण (गारगोटी, ता. भुदरगड, कोल्हापूर).
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com