agriculture news in Marathi krushi sahayak sitting arrangement scheme stopped Maharashtra | Agrowon

कृषी सहायकांची बैठक व्यवस्था योजना गुंडाळली 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 2 मार्च 2021

 गावपातळीवर ग्रामविस्ताराला चालना मिळावी याकरिता कृषी सहाय्यकांसाठी ग्रामपंचायतस्तरावर बैठक व्यवस्थेचा उपक्रम राबविण्यात आला होता. 

नागपूर ः गावपातळीवर ग्रामविस्ताराला चालना मिळावी याकरिता कृषी सहाय्यकांसाठी ग्रामपंचायतस्तरावर बैठक व्यवस्थेचा उपक्रम राबविण्यात आला होता. मात्र सरकार बदलल्यानंतर ही योजना गुंडाळण्यात आल्याने कृषी विस्ताराचे काम प्रभावित झाले आहे. 

भाजप सत्ताकाळात तत्कालीन कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी कृषी सहाय्यक गावात येत नसल्याच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत ग्रामपंचायत परिसरातच कृषी सहाय्यकांसाठी बैठकीची व्यवस्था करण्याची घोषणा केली होती. त्याकरिता ग्रामविकास मंत्रालयाकडून शासन आदेशही काढण्यात आला. त्यानंतरच्या काळात गतिमान घडामोडी होत राज्यातील अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतस्तरावर कृषी सहाय्यकांकरीता बैठक व्यवस्था करण्यात आली. 

आता मात्र सरकार बदलताच पुन्हा येरे माझ्या मागल्याचा कित्ता गिरविला जात आहे. नागपूर विभागात २१०१ ग्रामपंचायती आहेत. यातील केवळ ९१६ ग्रामपंचायतींकडूनच या उपक्रमात सहभाग नोंदवीत कृषी सहाय्यकांकरीता बैठक व्यवस्था उपलब्ध करुन देण्यात आली. ९८५ ग्रामपंचायतींनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात ३९३९ ग्रामपंचायती आहेत. यातील ३५ ते ४० टक्के ग्रामपंचायती मध्येच कृषी सहायकांकरता बैठक व्यवस्था आहे. परंतु यातील किती ग्रामपंचायतींमध्ये कृषी सहाय्यक कार्यालय उघडून बसतात याबाबत ठोसपणे कुणालाही सांगता आले नाही. 

नागपूर विभागातील कृषी सहाय्यकांकरीता बैठकस्थिती 
नागपूर ः
२६३ 
वर्धा ः ४ 
गोंदिया ः १९ 
भंडारा ः २३ 
चंद्रपूर ः ३६२ 
गडचिरोली ः २४५ 

प्रतिक्रिया
ग्रामपंचायतीमध्ये कृषी सहाय्यकांकरता बैठक व्यवस्था हा योग्य निर्णय होता. परंतु यवतमाळ जिल्ह्यात या निर्णयाची कोठेही अंमलबजावणी झाल्याचे दिसून येत नाही. 
- मनीष जाधव, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, यवतमाळ. 

फिल्डवरच्या कर्मचाऱ्यांकरिता बैठक व्यवस्था अडचणीची ठरते. कार्यालय दिल्यास त्या ठिकाणी येणाऱ्या व्यक्तींच्या समस्या ऐकण्यासाठी मदतनीस देखील आवश्यक आहे. त्याच्या माध्यमातून संबंधित शेतकऱ्यांकडील दस्तऐवज घेत नंतर त्यावर प्रक्रिया करता येईल. काही ग्रामपंचायतींमध्ये ग्रामविस्तार अधिकारी व तत्सम व्यक्तींनाच बसण्यासाठी जागा नाही. मग कृषी सहाय्यकांकरीता व्यवस्था कशी होईल ? 
- बापूसाहेब शेंडगे, राज्य अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कृषी सहाय्यक संघटना. 
 


इतर बातम्या
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
नांदेडमध्ये ४२ हजार ६४९ क्विंटल हरभरा...नांदेड : जिल्ह्यात किमान हमी दरानुसार सुरू...
व्हर्च्युअल क्लासरूममुळे कृषी शिक्षणाची...नगर ः व्हर्च्युअल क्लासरूम आणि अॅग्री-दीक्षा वेब...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
‘एमआरपी’नुसारच खतांची खरेदी करावी सोलापूर ः यंदाच्या खरीप हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर...
खरीप हंगामासाठी ११४० कोटी रुपये पीककर्ज...अकोला : अकोला जिल्ह्यात या खरीप हंगामासाठी ११४०...
सटाणा बाजार समिती आवाराबाहेर अवैध...नाशिक : सटाणा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काही...
नाशिक जिल्ह्यात विहिरींनी गाठला तळ नाशिक : जिल्ह्यात गत मॉन्सूनमध्ये अनेक भागांत...
भोकरखेडात चार वर्षांपासून शेतकरी वीज...वाशीम : शेतात वीज जोडणी घेऊन सिंचन करता येईल....
टेंभू योजनेचे पाणी सोडले; ‘बंदिस्त पाइप...आटपाडी, जि. सांगली : आटपाडी तालुक्‍यात टेंभू...
प्रत्येक गावाचा होणार कृषी विस्तार...जालना : कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगामाचे...
तमाशा कलावंतांसाठी सरसावले मदतीचे हात नगर ः : कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे टाळेबंदी...
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत चुरस सोलापूर ः पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा...
कांदा बाजारावर ‘कोरोना’चा परिणाम नगर : कोरोना व्हायरसची बाधा वाढत असल्याचा बाजार...
महाराष्ट्राला रेमडिसिव्हिर देण्यास ‘...मुंबई : केंद्र सरकारकडून रेमडिसिव्हिर निर्यातीवर...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...
नांदेड जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वसंत...नांदेड : नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या...