agriculture news in Marathi krushi seva kendras shut in state Maharashtra | Agrowon

राज्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद सुरू

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 जुलै 2020

सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी विक्रेत्यास जबाबदार धरून गुन्हे नोंदविण्यात येऊ नये, गुन्हे नोंदविण्याबाबतचा अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करावा.

पुणेः सोयाबीन बियाणे न उगवल्या प्रकरणी विक्रेत्यास जबाबदार धरून गुन्हे नोंदविण्यात येऊ नये, गुन्हे नोंदविण्याबाबतचा अन्यायकारक निर्णय तातडीने रद्द करावा, तसेच कृषी निविष्ठा विक्रेत्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्या, या मागण्यांसाठी महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाइडस ॲण्ड सीडस डिलर्स असोसिएशनच्या (माफदा) वतीने राज्यभरात शुक्रवारपासून (ता.१०) तीन दिवसांचा बंद पुकारण्यात आला.

शासनाने परवानगी दिलेल्या कंपन्यांचे बियाणे सीलबंद स्थितीमध्ये शेतकऱ्यांना विकण्याचे काम विक्रेते करतात. बियाणे न उगवण्यामध्ये विक्रेत्यांचा काहीही संबंध येत नाही. मात्र, तरीही त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे योग्य नाही, असे असोसिएशनचे म्हणणे आहे. या आंदोलनाचा हा मुख्य मुद्दा आहेच. पण, याशिवायही कृषी सेवा केंद्राच्या अनेक वर्षापासूनच्या प्रलंबित मागण्यावरही असोसिएशनने प्रत्येक तालुकास्तरावर तहसीलदारांना निवेदन देऊन लक्ष वेधले आहे. 

बंदमुळे कृषी साहित्य विक्रीचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झाला आहे. शुक्रवारी (ता.१०) एकाही विक्रेत्याने दुकान उघडले नाही. सध्या राज्यात पेरणी, तर काही भागात सोयाबीन, मका पिकावर किडींसाठी फवारणीचे काम सुरू आहे. यासाठी अनेकांना खते, कीडनाशकांची गरज आहे. नेमका याच काळात बंद सुरू झाल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. 

पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूरसह राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये कृषी निविष्ठा केंद्रे बंद होती. नगर जिल्ह्यात शंभर टक्के बंद यशस्वी झाला. सुमारे अडीच हजार दुकाने बंद होती. मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात बंदमध्ये शहरी तसेच ग्रामीण भागातील कृषी निविष्ठा विक्रत्यांनी दुकाने बंद ठेवली होती. नाशिक जिल्ह्यातील १४ तालुक्यांमध्ये बंद पाळण्यात आला. वऱ्हाडात २५०० पेक्षा अधिक विक्रेते यात सहभागी झाले. कृषी व्यावसायिक बंदला अकोला, बुलडाणा, वाशीम या तीनही जिल्ह्यातील स्थानिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

अशा आहेत मागण्या

  • विक्रेत्यांवर गुन्हे दाखल होऊ नये 
  • नमुने गोळा करण्यासाठी घेतलेली १५ कोटी शासनाने परत करावे
  • वापराची मुदत संपलेली कीटकनाशके कंपन्यांनी परत घ्यावी 
  • परवाना नूतनीकरणाची रक्कम राज्यामध्ये एकाच दराने आकारावी

इतर अॅग्रो विशेष
बंदीची प्रक्रिया हवी  सुटसुटीत अन्...केंद्र सरकारने १८ मे रोजी २७ कीडनाशकांच्या बंदीचा...
कृषिसेवक भरतीतील गैरव्यवहारावर पांघरूण...पुणे : राज्यात २०१६ मध्ये झालेल्या कृषिसेवक भरती...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा पुणे ः मध्य प्रदेश व परिसराच्या वायव्य भागात कमी...
संपूर्ण नियमनमुक्तीची अंमलबजावणी करापुणे:  सर्वच शेतमालाच्या संपूर्ण...
बाजार समिती कायद्यात बदल करण्याची मागणीपुणे: शेतमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
भाजपच्या दूध आंदोलनापासून ‘संघर्ष समिती...नगर ः दुधाच्या दरासाठी सातत्याने आग्रही राहून...
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु...मुंबई: दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत...
बीटी कपाशी बियाणे अप्रमाणित ...अकोला ः या हंगामात बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या...
'नाबार्ड’चा व्यवस्थापक नसल्यास अग्रणी...पुणे: कृषी पायाभूत निधी योजनेला प्रत्येक...
देशातील जलसंपत्तीची माहिती आता एका...पुणे ः केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशभरातील...
भाजीपाला रोपांच्या मागणीत वाढकोल्हापूर: कोविडच्या संकटामुळे थांबलेल्या नव्या...
वऱ्हाडात जोरदार, मराठवाड्यात सर्वदूर...पुणे ः राज्यात पावसाने पुन्हा जोर धरण्यास सुरुवात...
`सीसीआय`कडून सहा कोटी क्विंटल कापूस...नागपूर : कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून (सीसीआय)...
अकरा ‘सेन्सर्स’ सह ‘वेदर स्टेशन’ द्वारे...वडाळी नजीक (ता.निफाड, जि. नाशिक) येथील रोशन...
सदोष बियाण्यांत शेतकरी दोषी कसा? सोयाबीनच्या सदोष बियाण्यांचा विषय यंदा...
बियाणे दहशतवाद गंभीरच!तणनाशक सहनशील अवैध एचटीबीटी कापूस बियाण्याच्या...
कोकण, विदर्भात जोरदार पावसाची शक्यता पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भात पावसासाठी...
मराठवाड्यात कपाशी लागवडीत सव्वा लाख...औरंगाबाद : मराठवाड्यात सर्वसाधारण क्षेत्राच्या...
सूक्ष्म सिंचन प्रस्तावांना पूर्वसंमतीची...अकोला ः  कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा...
साडेतीन हजार शेतकऱ्यांना शेतमाल तारण...पुणे ः शेतमालाच्या काढणीनंतर बाजारपेठेत एकाचवेळी...