राज्याचा कृषिरत्न पुरस्कार विश्वंभर बाबर यांना जाहीर

कृषी पुरस्कार
कृषी पुरस्कार

पुणे ः कृषी, कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, संस्थांचा कृषी विभागाकडून पुरस्कार देऊन गौरव केला जातो. कृषी विभागाने शुक्रवारी (ता. २२) २०१७ या वर्षासाठीचे पुरस्कार जाहीर केले आहेत. कृषी विभागात उच्च समजला जाणारा डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार हा माण (जि. सातारा) तालुक्यातील म्हसवड येथील विश्र्वंभर सोपान बाबर यांना जाहीर झाला आहे.  पुरस्कार आणि विजेते पुढीलप्रमाणे डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न पुरस्कार  १) विश्र्वंभर सोपान बाबर, म्हसवड, ता. माण, जि. सातारा. 

वसंतराव नाईक कृषिभूषण पुरस्कार  १) शिवराम गोंविंद गोगटे, पालकरवाडी, ता. वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग २) समाधान दयाराम पाटील, उमरे, पो. धुळपिंप्री, ता. एरंडोल, जि. जळगाव ३) रामचंद्र बाजीराव नागवडे, बाभूळसर बु, ता. शिरूर, जि. पुणे  ४) कुबेर महादेव रेडे, महाळुंग, ता. माळशिरस, जि. सोलापूर ५) सुरेश ज्ञानदेव चव्हाण, हातनूर, ता. तासगाव, जि. सांगली ६) सुरेश नाभिराज मगदूम, सागाव (मगदूम मळा) ता. कागल, जि. कोल्हापूर ७) रावसाहेब नागोराव ढगे, शिरसवाडी, ता. जि. जालना, ८) देवानंद भानुदासजी चौधरी, आमगाव (दि), ता. जि. भंडारा 

जिजामाता कृषिभूषण पुरस्कार   १) मंदाकिनी रवींद्रनाथ मोरडे, खिलारवाडी (सावरगाव), ता. जुन्नर, जि. पुणे २) राहिबाई सोमा पोपेरे, कोंभाळणे, ता. अकोले, जि. नगर ३) सविता जीवनराव येळणे, कान्हापूर, पो सुकळी, ता. जि. वर्धा 

वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार  १) मोहन श्रीपती पाटील, बसरेवाडी, पो मिणचे खु, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर 2) दिनकर वि्ठ्ठलराव पाटील, लातूर रोड, मोहनाळ, ता. चाकूर, जि. लातूर 3) नीलेश पुनमचंद सोमाणी, धनज बु, ता. कारंजा, जि. वाशीम

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार (सर्वसाधारण गट) 1) मंगेश दत्तात्रय सावंत, सोलनपाडा (जामरूंग) पो, आंबिवली, ता. कर्जत, जि. रायगड २) हरिचंद्र धोंडू शिगवण, कुंभवे, पो. साखळोली, ता. दापोली, जि. रत्नागिरी ३) सचिन अनंत चुरी, माहिम, ता. जि. पालघर ४) कृष्णा धर्मा भामरे, पिंगळवाडे, ता. बागलाण, जि. नाशिक  ५) रघुनाथ पंढरीनाथ आव्हाड, शिवाजीनगर, ता. सिन्नर, जि. नाशिक ६) समीर मोहनराव डोंबे, खोर, ता. दौंड, जि. पुणे ७) नितीन चंद्रकांत गायकवाड, चांदखेड, ता. मावळ, जि. पुणे,  ८) सुरेश आप्पासो कबाडे, कारंदावाडी, ता. वाळवा, जि. सांगली ९) कुंडलिक विष्णू पाटील, चाफोडी, पो. सावर्डे दुमाला, ता. करवीर, जि. कोल्हापूर १०) अमोल आनंदराव लकेसर, दुधारी, ता. वाळवा, जि. सांगली ११) अभिमान शाहूराव आवचर, वडवाडी, बोरखेड, ता. जि. बीड १२) प्रल्हाद शिवाजीराव गवारे, चिंचवडगाव, ता. वडवणी, जि. बीड १३) पंजाबराव वसंतराव हारे, जवळगाव, आंबाजोगाई, ता. जि. बीड १४) ओमकार माणिकराव मसकल्ले, महादेववाडी, ता. देवणी, जि. लातूर,  १५) मुरलीधर गोंविदराव नागटिळक, मुरूड, ता. जि. लातूर १६)  बाळकृष्ण वासुदेव पाटील, कंडारी, पो. खैरा, ता. नांदुरा, जि. बुलढाणा १७) विठोबा तुकाराम दंदाले, खल्याळगव्हाण, ता. देऊळगाव राजा, जि. बुलढाणा १८) नरेश सदाशिव काळपांडे, महाबळा, ता. सेलू, जि. वर्धा १९) चंदुलाल जगन्नाथ राऊत, मिरेगाव व्हाया पोहरा, ता. लाखणी, जि. भंडारा

वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार (आदिवाशी गट)  १) सुनील महादू कामडी, कामडीपाडा, पो. डेंगाचीमेंट, ता. जव्हार, जि. पालघर २) दीपक नामदेव घिगे, दुधनोली, पो. मिल्हे, ता. मुरबाड, जि. ठाणे ३) सुरेश अर्जुन गावीत, करंजी बु, ता. नवापूर, जि. नंदुरबार ४) पुंजू चिंधा भोये, अजेपूर बु, ता. जि. नंदुरबार ५) बाळू शंकर बेंढारी, पोखरी, ता. आंबेगाव, जि. पुणे ६) सखाराम बाळू वनघरे, भिवेगाव, पो. भोरगिरी, ता. खेड, जि. पुणे  उद्यानपंडीत पुरस्कार १) संतोष अमृता दिनकर, अस्नोली, ता. शहापूर, जि. ठाणे २) रवींद्र माधवराव महाजन, प्लॉट न. 25, गोंविद कॉलनी, जामनेर, जि. जळगाव ३) दीपक विनायक जगताप, निंबुत, ता. बारामती, जि. पुणे ४) मारूती केरू पावशे, जाखिनवाडी, पो. नांदलापूर, ता. कराड, जि. सातारा ५) राजेश लक्ष्मणराव इंगळे, माटेगाव, पो. कसाबखेडा, ता. कन्नड, जि. औरंगाबाद ६) प्रभावती, रेवणासिद्ध लामतुरे, तेर, ता. जि. उस्मानाबाद ७) उद्धव गुलाबराव फुटाणे, तिवसा घाट, वरूड, जि. अमरावती ८) चंद्रकलाबाई रेवाराम चक्रवर्ती, बच्छेरा, ता. पारशिवणी, जि. नागपूर ९) साधुराम शंकरजी पाटील, मोथा, ता. चिखलदरा, जि. अमरावती 

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार  १) कांतीलाल गजानन पवार, विभागीय सहायक साख्यिक, विभागीय कृषी सहसंचालक, पुणे विभाग, पुणे  २) संजय कोंडाजी फल्ले, कृषी पर्यवेक्षक, उपविभागीय, कृषी अधिकारी, राजगुरूनगर, ता. खेड, जि. पुणे 

कृषिभूषण (सेंद्रिय शेती) पुरस्कार  १ गोवर्धन इको व्हिलेज ट्रस्ट, अध्यक्ष संजय हेरंब नाईक, गालतरे, ता. वाडा, जि. पालघर. शहापूर, जि. ठाणे २) बुधाजी बाबु बंगाल, माणगाव, पो. बळेगाव, ता. मुरबाड, जि. ठाणे ३) एकनाथ लक्ष्मण कराळे, शेळपिंपळगाव, ता. खेड, जि. पुणे  ४) विक्रम सदाशिव कदम, मालगाव, ता. जि. सातारा ५) ओमकारनाथ आनंदराव शिंदे, सनपुरी, पो. नांदखेडा, ता. जि. परभणी ६) प्रभाकर विठ्ठल ठाकरे, शिवणी, ता. जि. यवतमाळ ७) शोभा झिबल गायधने, खैरगाव, ता. समुद्रपूर, जि. वर्धा 

राज्यस्तरीय पीकस्पर्धा खरीप भात (सर्वसाधारण गट)  प्रथमः धोंडिराम खानगोंडा करगर, सुळकूड, ता. कागल, जि. कोल्हापूर द्वितीयः अशोक गणपती देसाई, शेळोली, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर  तृतीयः कृष्णात महादेव जरग, म्हसवे, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर

राज्यस्तरीय पीकस्पर्धा खरीप सोयाबीन (सर्वसाधारण गट) प्रथमः संतोष बापूसाहेब शेळके, आळते, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर द्वितीयः प्रल्हाद कल्लापा चौगुले, गडमुडशिंगी, ता. करवीर, जि. कोल्हापूर तृतीयः मुधकर अण्णापा तेलवेकर, पिंपळगाव, ता. कागल, जि. कोल्हापूर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com