Agriculture news in marathi The Krushiratna 'foundation' help to children of suicidal farmers in `Adhartirtha` | Page 2 ||| Agrowon

कृषिरत्न फाउंडेशनची ‘आधारतीर्थ’तील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना मदत

टीम अॅग्रोवन
रविवार, 5 एप्रिल 2020

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर कसमादे पट्ट्यातील कृषिरत्न फाउंडेशनतर्फे त्र्यंबकेश्वर येथील आत्महत्याग्रस्त मुलांच्या 'आधारतीर्थ' आश्रमात किराणा व भाजीपाला देण्यात आला. 

नाशिक : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सध्या वाहतुकीची अडचण आहे. त्यामुळे अनेक घटकांना जीवनावश्यक गोष्टी उपलब्ध करण्यासाठी धावपळ करावी लागत आहे. या परिस्थितीत गरजूंच्या मदतीसाठी शेतकरी सरसावले आहेत. कसमादे पट्ट्यातील कृषिरत्न फाउंडेशनतर्फे त्र्यंबकेश्वर येथील आत्महत्याग्रस्त मुलांच्या 'आधारतीर्थ' आश्रमात किराणा व भाजीपाला देण्यात आला. 

‘आधारतीर्थ’ आश्रमात १७० मुले आश्रयास आहेत. त्यांची देखभाल, शिक्षण, कपडे आणि दोन वेळच्या जेवणाची सोय या आश्रमातर्फे केली जाते. परंतु, सध्या ‘कोरोना’चा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी काळजी घेतली आहे. या काळात मुलांच्या भोजनाची अडचण येऊ नये, यासाठी फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी तत्परतेने मदत करण्याचा निर्णय घेतला. 

फाउंडेशनचे मार्गदर्शक संजय हिरे व नवल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली किरण्यामध्ये चणाडाळ, बेसन पीठ, तेल, रवा, गहू, साखर, बाजरी, तांदूळ, तूरडाळ, पोहे, तर भाजीपाल्यामध्ये कारले, कोबी, मिरची, टोमॅटो, बटाटे, कांदा, फ्लॉवर, तर फळांमध्ये टरबूज देण्यात आले. योगेश सोनवणे यांनी रोजच्या व्यवसायाची पर्वा न करता स्वखर्चाने आपल्या वाहनातून मदत पोचविली. 

संस्थेचे संचालक शेखर पवार, संस्थापक योगेश पवार, अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष जगदीश गांगुर्डे, संघटक दर्शन पवार, निलेश जाधव, स्वप्नील पाटील व प्रवीण पवार या सर्वांनी माल पॅकिंग करून मदत पाठविण्याचे नियोजन केले. 
 


इतर ताज्या घडामोडी
अकोला जिल्हा परिषदेला जमीन...अकोला ः जिल्ह्यात दोन ठिकाणी परिषदेच्या मालकीची...
सात तालुक्‍यांतील अनुदान थकलेल्या...नगर ः पशुधन जगविण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या...
सांगलीत दोन हजार क्विंटल कापूस...सलगरे, जि. सांगली ः कापसाला शेजारच्या कर्नाटक...
मुंबई बाजार समितीतील २३ अधिकारी,...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाने...
एकात्मिक व्यवस्थापनातून वाढवा बीटी...अलीकडील वर्षांपासून कापूस पिकाचे उत्पादन घटत...
सोयाबीन उत्पादन वाढीचे व्यवस्थापन...सोयाबीन पिकाखालील क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. हे...
बीबीएफ टोकण यंत्राने करा पेरणीरुंद वरंबा सरी पध्दतीचा प्रमुख उद्देश म्हणजे...
नगर झेडपीची पहिल्यांदाच झाली लेखी...नगर : कोरोनामुळे लॉकडाउन असल्याने जिल्हा...
पिचकारी मारणाऱ्यांवर आता दंडात्मक...नगर : सार्वजनिक ठिकाणी पिचकारी मारणाऱ्यांवर...
'दोन वर्षांपर्यंतचे शेतकऱ्यांचे...नगर, : कोरोनामुळे सर्वच क्षेत्रांत गंभीर...
पुणे बाजार समितीत भाजीपाला, फळ विभाग...पुणे : कोरोनाचा प्रादुर्भाव बाजार समितीलगतच्या...
टोळधाड निर्मूलनासाठी कृषी विभागाचा...नगर : महाराष्ट्रात चार दिवसांपूर्वी टोळधाड...
नाशिक बाजार समितीचे कामकाज आजपासून सुरूनाशिक : स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया...
जळगाव ‘झेडपी’चे कामकाज रुळावर जळगाव : जिल्हा परिषदेचे कामकाज रुळावर येत आहे....
औरंगाबादमध्ये थेट फळे, भाजीपाला...औरंगाबाद : जिल्ह्यातील शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी...
जळगावात पीककर्जासाठी बॅंका पोटखराब...जळगाव : पीक किंवा शेती कर्ज देताना पोटखराब...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीची दुबार...परभणी : भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि कापूस...
यवतमाळ जिल्ह्यात ५० लाख क्विंटल कापसाची...यवतमाळ : जिल्ह्यात वैध नोंदणी केलेल्या...
रब्बी मका पाहून उताऱ्यावर नोंद करणार :...येवला : शासकीय हमीभावाने मका खरेदीसाठी रब्बी...
खारपाण पट्ट्यातील उत्पादकता वाढ याविषयी...अकोला ः राज्य शासन व जागतिक बँकेच्या...