agriculture news in Marathi, krushna river water reached to Dighanchi, Maharashtra o | Agrowon

‘कृष्णा’ आली दिघंचीच्या अंगणी
टीम अॅग्रोवन
शनिवार, 25 मे 2019

आमदार अनिल बाबर व तानाजीराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे व ग्रामस्थांच्या सहकाऱ्याने आज दिघंची गावाला टेंभूचे पाणी मिळाले. आजचा हा गावच्या दृष्टीने ऐतिहासिक दिवस आहे.
- अमोल मोरे, सरपंच, दिघंची

दिघंची, जि. सांगली ः  अनेक वर्षे दिवास्वप्न वाटणारी कृष्णामाई दिघंची गावच्या अंगणी आली व निंबाळकर तलावात अवतरली. ग्रामस्थांच्या आनंदाला उधाण आल्याने फटाक्‍यांची आतषबाजी करून, पेढे व मिठाई सरपंच अमोल मोरे यांना भरवित जल्लोषात स्वागत केले. 

चातकासारखी कृष्णेच्या पाण्याची ग्रामस्थ वाट पाहत होते. कुरुदवाडीपासून १९ एप्रिलला पाणी सोडण्यात आले होते. तेथून डाव्या कालव्याद्वारे बंद पाइपमधून व पुढे ओढे, बंधारे भरत तब्बल एक महिन्याने वाट करून जणू अडथळ्यांची शर्यत पार करीत गावच्या अंगणी आली आहे. दिघंची गावाला असणारी भारत निर्माण पाणीपुरवठा योजना ही योजना ही महाडिकवाडी तलावावर तर जुनी निंबाळकर तलावावर आहे. परिसारत पाऊसच न झाल्याने दोन्ही तलाव कोरडे ठणठणीत आहेत. येथील असणारे विहिरीचे स्रोत पूर्णपणे संपुष्टात आल्याने पाणी योजना कोलमडून पडली. गावाला पाणीपुरवठा करणे अश्‍यक्‍य होऊ लागले. 

सध्या वीस हजार लोकसंख्या असणारे गाव व वाड्यावस्त्या टॅंकरवर अवलंबून आहेत. गावचा पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळित होऊन बारा ते तेरा दिवसांतून पाणी मिळत होते. मात्र या सर्व पाणीप्रश्नावर येणारे टेंभू पाणी हाच आशेचा किरण होता. गावाला पाणी तातडीने येण्यासाठी व शेतीला कोणी वापर करू नये म्हणून प्रशासनाबरोबर सरपंच अमोल मोरे यांनी गावातील युवकांची कुमक तयार केली. रात्री तीन ते चार वॉलच्या ठिकाणी हे युवक रात्रीचा ठेवून आहेत. तर ओढा व बंधारा पत्रात झाडे झुडपे काढण्यासाठी व अडचणीच्या ठिकाणी पाण्याला वाट करून देण्यासठी जेसीबी मशिनची मदत घेतली. 

 

इतर अॅग्रो विशेष
राज्य बॅंकेच्या दारात जिल्हा बॅंकांचे...सोलापूर : राज्यात १९७२ ची आठवण करून देणारा भयावह...
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी...पुणे  : कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मध्य...
पूर संकटाचा नव्याने अभ्यास पुणे  : कृष्णा व भीमा खोऱ्यात यंदा आलेल्या...
शेतजमीन मोजणीचा गोंधळ सुरूचपुणे : ड्रोनच्या माध्यमातून गावांचे डिजिटल नकाशे...
तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापराने शेतकरी...नागपूर ः ‘संकरित बियाण्यांचा करा पेरा, लक्ष्मी...
जलसमस्येच्या आढाव्यासाठी औरंगाबादेत...औरंगाबाद  : मराठवाडा आणि संपूर्ण...
कृषिसेवक भरती प्रक्रियेवरील बंदी...अकोला ः कृषी खात्याने १४१६ जागांसाठी राबवलेल्या...
यंदा ५० साखर कारखाने बंद राहण्याची...पुणे ः राज्यातील उसाचे क्षेत्र आधीच्या...
पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यात २४...मुंबई : शेतकऱ्यांना दुष्काळाच्या चक्रातून बाहेर...
कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक...पुणे  : ओडिशाच्या किनाऱ्यालगत तयार झालेल्या...
झाडांच्या गोलाईच्या आकारानुसार...पुणे: दुष्काळावर मात करण्यासाठी शेतातील आणि...
राज्य बँक घोटाळाप्रकरणी दोषींवर कारवाई...जळगाव  ः महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
पीकविमा योजनेतील झारीतील ...मुंबई : शेतकऱ्यांसाठीच्या पीकविमा योजनेवरून...
मध्य प्रदेश भावांतर योजना बंद करणारनवी दिल्ली : शेतीमालाचे दर कमी झाल्यानंतर...
वाशीम बाजारपेठेत डंका मापारी यांच्या...वाशीम जिल्ह्यातील सोमठाणा येथील विश्वनाथ मापारी...
बोगस खतप्रकरणी ‘लोकमंगल’वर गुन्हापुणे : राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना...
कोकण, विदर्भात पावसाची शक्यतापुणे : तापमानात झालेली वाढ आणि ढगाळ हवामान...
डाळी, प्रक्रिया उद्योगातील ‘यशस्विनी’...बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) परिसरातील तब्बल ८८५...