सिंचनासाठी पाण्याच्या कमतरतेसह प्रतिकूल परिस्थितीवर मात करण्यासाठी शेतकरी विविध पर्यायांच
बातम्या
रब्बी हंगामासाठी कुळीथ, हरभरा बियाणे अनुदानावर
रत्नागिरी ः अतिवृष्टी आणि अवकाळी पावसामुळे भातशेतीचे मोठे नुकसान झाले. त्यातून सावरण्यासाठी शासनाकडून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी कृषी विभागाकडून कुळीथ आणि हरभरा बियाणे अनुदानावर उपलब्ध करून दिले आहे. खरीप हंगामात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी हंगामाकडे शेतकऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. रब्बी हंगामात जिल्ह्यात साडेपाच हजार हेक्टरवर भाजीपाला, कडधान्य आणि भाताची लागवड केली जाते.

अतिवृष्टी आणि अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. लष्करी अळीमुळे त्यात भर पडली. या परिस्थितीत खरिपातील नुकसानीचे ओझे पाठीवर घेऊन शेतकरी रब्बी हंगामासाठी सज्ज झाली आहे. रब्बी हंगामात भातशेतीच्या मशागतीची ठिकठिकाणी शेतांवर जोरात लगबग सुरू झाली आहे.
कुळीथ, संकरीत मका, कडधान्य, पावटा, मूग यांसारख्या विविध प्रकारच्या भाज्यांच्या बियाण्यांची पेरणी करतात. जमिनीत असलेल्या ओलाव्याचा फायदा रब्बीत लागवडीला होणार आहे. कृषी विभागाकडे कुळीथ आणि हरभऱ्याचे बियाणे उपलब्ध झाले आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागाने हरभरा लागवडीला प्रोत्साहन दिले आहे. कोकणात हरभरा होत नसला तरीही अतिपावसामुळे तशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचा फायदा हरभरा लागवडीला होईल. त्यासाठी यंदा हा प्रयोग राबवण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
याबाबत जिल्हा परिषद उपाध्यक्ष संतोष गोवळे म्हणाले, ‘‘रब्बी हंगामात शेतकऱ्यांना भाजीपाला उत्पादन करण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने नियोजनही केले आहे. अनुदानावर बियाणे उपलब्ध करून दिले आहे.’’
रब्बी हंगामात केलेली लागवड | |
तालुका | रब्बीखालील क्षेत्र (हेक्टरी) |
रत्नागिरी | ११५१.७ |
लांजा | ८२७.५ |
राजापूर | ५१७.२ |
चिपळूण | ८२८.१ |
गुहागर | १९५.० |
संगमेश्वर | ७२५.६ |
दापोली | २६२.२ |
खेड | ४५६.५ |
मंडणगड | ६३८.० |