पूरग्रस्त शेतकऱ्यांना कुळीथ, वालाचे बियाणे मोफत

पूरग्रस्त शेतकऱ्यांना कुळीथ, वालाचे बियाणे मोफत
पूरग्रस्त शेतकऱ्यांना कुळीथ, वालाचे बियाणे मोफत

रत्नागिरी : या वर्षी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. याचा सर्वांधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तब्बल १९०० हेक्टरवरील भातशेती पाण्यात गेली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. मात्र त्यांना जिल्हा परिषदेने मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबार पेरणीसाठी मोफत कुळीथ व वालाचे बियाणे देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३२६४ शेतकरी बाधित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

पावसाने या वर्षी जिल्ह्यात हाहाकार माजवला. पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा हे तीन जिल्हे पाण्याखाली गेले. यामुळे अपरिमित हानी झाली. या जिल्ह्यांत सध्या सर्वच स्तरांतून मदतीचा ओघ सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा पावसाने यावर्षी धुमाकूळ घातला होता. चिपळूण, खेड, संगमेश्‍वर, रत्नागिरी व राजापूर या तालुक्यांत अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे.

जिल्ह्यातील ३२६४ शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. याह सर्वांची भातशेती पाण्यात गेल्याने त्यांची अवस्था बिकट बनली आहे. आता ही भातशेती दुबार करू शकत नसल्याने शेतकरी आणखी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने घेतला आहे.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती संतोष गोवळे यांच्या संकल्पनेतून बाधित शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी कुळीथ व वालाचे बियाणे देण्यात येणार आहे. यासाठी ९ लाखांची तरतूद जिल्हा परिषद सेसमध्ये करण्यात येणार आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान खेड, राजापूर व रत्नागिरी तालुक्यांत झाले आहे.

तालुकानिहाय नुकसानग्रस्त शेतकरी

मंडणगड  ९३
दापोली २५३
खेड ७२८
गुहागर २१
चिपळूण २७
संगमेश्‍वर १८७
रत्नागिरी ६५४
लांजा ३१३
राजापूर  ९८८

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com