Agriculture news in marathi, Kulith, Walla seeds free to flood-affected farmers | Agrowon

पूरग्रस्त शेतकऱ्यांना कुळीथ, वालाचे बियाणे मोफत

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑगस्ट 2019

रत्नागिरी : या वर्षी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. याचा सर्वांधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तब्बल १९०० हेक्टरवरील भातशेती पाण्यात गेली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. मात्र त्यांना जिल्हा परिषदेने मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबार पेरणीसाठी मोफत कुळीथ व वालाचे बियाणे देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३२६४ शेतकरी बाधित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

रत्नागिरी : या वर्षी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली. याचा सर्वांधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. तब्बल १९०० हेक्टरवरील भातशेती पाण्यात गेली आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. मात्र त्यांना जिल्हा परिषदेने मदतीचा हात पुढे करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबार पेरणीसाठी मोफत कुळीथ व वालाचे बियाणे देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ३२६४ शेतकरी बाधित असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

पावसाने या वर्षी जिल्ह्यात हाहाकार माजवला. पश्‍चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, सातारा हे तीन जिल्हे पाण्याखाली गेले. यामुळे अपरिमित हानी झाली. या जिल्ह्यांत सध्या सर्वच स्तरांतून मदतीचा ओघ सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा पावसाने यावर्षी धुमाकूळ घातला होता. चिपळूण, खेड, संगमेश्‍वर, रत्नागिरी व राजापूर या तालुक्यांत अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. यामुळे कोट्यवधी रुपयांची हानी झाली आहे.

जिल्ह्यातील ३२६४ शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे. याह सर्वांची भातशेती पाण्यात गेल्याने त्यांची अवस्था बिकट बनली आहे. आता ही भातशेती दुबार करू शकत नसल्याने शेतकरी आणखी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांना मदतीचा हात देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने घेतला आहे.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा कृषी सभापती संतोष गोवळे यांच्या संकल्पनेतून बाधित शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी कुळीथ व वालाचे बियाणे देण्यात येणार आहे. यासाठी ९ लाखांची तरतूद जिल्हा परिषद सेसमध्ये करण्यात येणार आहे. या मदतीमुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान खेड, राजापूर व रत्नागिरी तालुक्यांत झाले आहे.

तालुकानिहाय नुकसानग्रस्त शेतकरी

मंडणगड  ९३
दापोली २५३
खेड ७२८
गुहागर २१
चिपळूण २७
संगमेश्‍वर १८७
रत्नागिरी ६५४
लांजा ३१३
राजापूर  ९८८

 


इतर ताज्या घडामोडी
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
सकाळी सौम्य थंडी तर दुपारी उष्ण हवामानमहाराष्ट्रावर आठवड्याच्या सुरुवातीला १०१४...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...
खानदेशात कांदा दरातील चढउतारामुळे...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
पूरक अन् प्रक्रिया उद्योगावर जर्मनीचा भरउत्तर जर्मनीतील सपाट भूप्रदेश आणि पूर्व...
जालन्यात कांदा २२०० ते २५०० रुपये...जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
हुंडी चिठ्ठी, मायक्रो फायनान्स...अकोला  ः जिल्ह्यात हुंडी चिठ्ठी तसेच मायक्रो...
नाशिक येथे तीनदिवसीय पुष्पोत्सवाला...नाशिक  : प्रत्येकाच्या हक्काची तीन झाडं हवी...
न्हावी परिसरात मका पिकावर लष्करी अळीचा...न्हावी, जि. जळगाव ः न्हावीसह परिसरात मक्‍याची...