agriculture news in marathi In Kumbhar Pimpalgaon, four acres of sugarcane were destroyed by fire | Agrowon

कुंभार पिंपळगावात आगीत चार एकर ऊस खाक

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 नोव्हेंबर 2020

कुंभार पिंपळगाव, जि.जालना : तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले. एक तार उसाच्या पिकावर पडली. त्यामुळे आग लागून चार एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. 

कुंभार पिंपळगाव, जि.जालना : राजाटाकळी- अरगडे गव्हाण मुख्य वीज वाहिनीच्या लोंबकळलेल्या तारांचे घर्षण होऊन शॉर्टसर्किट झाले. एक तार उसाच्या पिकावर पडली. त्यामुळे आग लागून चार एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झाला. यामुळे शेतकरी जगन बन्सीधर कंटुले (गट क्रमांक ४२२) यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले.

कंटुले यांच्या शेतातून राजाटाकळी-अरगडे गव्हाण मुख्य वीज वाहिनी गेली आहे. या वाहिनीच्या जीर्ण झालेल्या तारा लोंबकळलेल्या आहेत. खांबावर तारा बांधलेल्या चिनी मातीच्या चिमण्या फुटलेल्या आहेत. यामुळे तारांना धर राहिलेला नाही. त्या मोकळ्या झाल्या आहेत. शुक्रवारी (ता.२७) दिवसभर वारे असल्याने या तारांचे घर्षण झाले. यामुळे एक तार खांबावर असलेल्या चिमणीतुन निसटून उसावर पडली. त्यामुळे उसाने पेट घेतला. वारे असल्यामुळे आग भडकली. नजीकच्या शेतकऱ्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यात यश आले नाही. पूर्ण ऊस जळून खाक झाला. 

परतीच्या पावसाने शेतशिवारातील अनेक विजेचे खांब वाकले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जीर्ण झालेल्या तारा लोंबकळलेल्या आहेत.  खांबावरील चिमण्या फुटलेल्या आहेत. यामुळे तारा निसटून खाली येतात. वीज वितरण कंपनीने दुरुस्तीची कामे केली नाहीत. संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा सांगितले. मात्र, याकडे दुर्लक्ष केले. यामुळे हे नुकसान झाले.
- जगन कंटुले, नुकसानग्रस्त शेतकरी.
 


इतर ताज्या घडामोडी
गहू संशोधनात सर्वांचाच वाटा ः डाॅ. ढवणनाशिक :  येथील गहू संशोधन केंद्रास डॉ....
कोल्हापुरात सकाळपासूनच मतदारांच्या...कोल्हापूर : जिल्ह्यात ग्रामपंचायतीसाठी चुरशीने...
पीककर्जापासून वंचित शेतकरी सावकारांच्या...अकोला : वऱ्हाडातील प्रत्येक जिल्ह्यांत सावकारी...
वऱ्हाडात ८९३ ग्रामपंचायतींसाठी झाले...अकोला : गेल्या काही दिवसांपासून गावांमध्ये...
सिंधुदुर्गमध्ये चुरशीने मतदान; मतदान...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ६६ ग्रामपंचायतीच्या...
मराठवाड्यात मतदानासाठी मोठी चुरस औरंगाबाद : मराठवाड्यातील ४१३३ ग्रामपंचायतींचे...
सोलापुरात ग्रामपंचायतींसाठी चुरशीने...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील ५९०...
सांगलीत १४३ गावांत कारभाऱ्यांसाठी...सांगली : जिल्ह्यातील १४३ गावांतील कारभारी...
आठ वर्षांपूर्वीच्या आंदोलनाच्या...कऱ्हाड, जि. सातारा : ऊस दरासाठी येथील पाचवड फाटा...
विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी...नागपूर : विदर्भात ग्रामपंचायतींसाठी सरासरी पन्नास...
जळगावात मदतनिधीपासून ३५ टक्के शेतकरी...जळगाव ः जिल्ह्यात अतिपावसात कापूस, उडीद, मूग,...
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात...परभणी ः हिंगोली जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी...
जळगावात कापसाच्या चुकाऱ्यांची प्रतीक्षाजळगाव ः जिल्ह्यात बहुसंख्य शेतकऱ्यांनी कापसाची...
‘बाधित कुक्कुटपालकांना नुकसानभरपाई...परभणी ः ‘‘‘बर्ड फ्लू’मुळे मुरुंबा (ता. परभणी)...
राज्यभरात ग्रामपंचायतींसाठी शांततेत...पुणे : राज्यात ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी (ता....
‘परभणी विभागाअंतर्गत पाच जिल्ह्यांत...परभणी ः ‘‘महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या (...
नाशिक जिल्ह्यातील ४,२२९ उमेदवारांचे...नाशिक : जिल्ह्यातील ६२१ पैकी ५६५...
गिरणा प्रोड्यूसर कंपनीचा टस्काबेरी...देवळा, जि. नाशिक : तालुक्यातील गिरणा खोरे...
पुणे जिल्ह्यात चारपर्यंत ५० टक्के मतदानपुणे ः जिल्ह्यातील सुमारे ७४६ ग्रामपंचायतींसाठी...
पुणे जिल्ह्यात ‘महाडीबीटी’चे ६५ हजार...पुणे ः कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टलवर...