टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला केव्हीके तज्ज्ञांची भेट

भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड प्रादुर्भावग्रस्त परिसराला कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी भेट देत पूरक उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये केव्हीकेचे पथक पोचले.
KVK experts visit locust infested area
KVK experts visit locust infested area

भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड प्रादुर्भावग्रस्त परिसराला कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी भेट देत पूरक उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये केव्हीकेचे पथक पोचले.

अमरावती, नागपूर नंतर भंडारा जिल्ह्याच्या सीमेपर्यंत टोळधाड पोचली. कृषी विभागाकडून त्यांना हुसकावण्याचे प्रयत्न झाले. त्या पार्श्‍वभूमीवर टोळधाड प्रादुर्भावग्रस्त शिवार व परिसराला केव्हीकेच्या पथकाने भेट दिली. मोहाडी तालुक्‍यातील सालई, आंधळगाव, पाळमेंगरी, उसेरा तसेच तुमसर तालुक्‍यातील धनेगाव, चांदपूर, मुर्री, मांगली या गावांचा त्यामध्ये समावेश आहे. केव्हीकेचे कार्यक्रम समन्वयक डॉ. निलेश वझीरे, विषय विषयतज्ज्ञ प्रमोद पर्वते, डॉ. बी. एन. चौधरी यांचा पथकात समावेश होता. टोळधाडग्रस्त शिवाराची पाहणी करण्यात आली.

यावेळी आंबा, साग, किनी या झाडांवर प्रादुर्भाव दिसून आला. त्यासोबतच किडनियंत्रण विषयक माहिती यावेळी देण्यात आली. ज्या ठिकाणी किडीचा समूह स्थिरावण्याची शक्‍यता आहे. त्या ठिकाणी मशाल, पुंजे जाळणे, ढोल ताशे, डब्बे जोरजोरात वाजविणे, शेताच्या आजुबाजूला चर खोदणे, विषारी आमिश वापर करणे, कीटकनाशके फवारणी करुन तत्काळ व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले.

टोळधाड किडीचे थवे आढळून आल्यास तत्काळ उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे आहे. अन्यथा पिकांचे नुकसान होवू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने सरपंच, कृषीमित्र तसेच कृषी सहायक यांना तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहनही केव्हीके साकोलीकडून करण्यात आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com