agriculture news in Marathi labor got employment from girnare labor market Maharashtra | Page 2 ||| Agrowon

गिरणारे मजूर बाजारामुळे मिळाला रोजगाराचा आधार 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020

पेठ, त्र्यंबकेश्‍वरसह नाशिकच्या पश्‍चिम आदिवासी पट्ट्यातील पाच तालुक्यांतील मजुरांना गिरणारे येथील मजूर बाजाराने तब्बल सहा महिने अखंड रोजगार पुरवला आहे. 

गिरणारे, जि. नाशिक : पेठ, त्र्यंबकेश्‍वरसह नाशिकच्या पश्‍चिम आदिवासी पट्ट्यातील पाच तालुक्यांतील मजुरांना गिरणारे येथील मजूर बाजाराने तब्बल सहा महिने अखंड रोजगार पुरवला आहे. दहा हजारांहून अधिक शेतमजुरांना येथे वर्षातील सहा महिने रोजगार मिळाल्याने अडचणीच्या काळात हा बाजार आधार ठरला आहे. 

गिरणारेत हरसूल रस्त्यावरील ईश्‍वर मंदिराजवळ दोन दशकांपासून भरणाऱ्या बाजारात शेतकरी स्वतः मजुरांना रोजंदारीने घेऊन जातात. सकाळी सहापासूनच गिरणारे बाजारात मजूर जमतात. प्रत्येकाला हमखास रोजगार मिळत असल्याने आदिवासी भागातील नागरिकांची रोजगाराची गरज भागते. महिलांना २०० ते ३०० रुपये, तर पुरुषांना २५० ते ४०० रुपये रोजंदारी मिळते.

रोजंदारी किंवा एकत्रित मजुरी ठरवून नाशिक, निफाड, सिन्नर, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यांतील शेतकरी स्वतःच्या वाहनातून शेतकरी घेऊन जातात. सालकरी व कामापर्यंत राहण्यासाठी मजुरांची शेतातच सोय केली जाते. टोमॅटो लागवडीपासून तर द्राक्ष काढणीपर्यंत सहा महिने मजुरांना खात्रीने रोजगार मिळतो. 

नाशिक, निफाड, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यांतील मुख्य नगदी पीक असलेल्या टोमॅटोच्या लागवडीपासून द्राक्ष काढणीपर्यंत सहा महिन्यांच्या काळात गिरणारेतील मजूर बाजारातील हजारो मजुरांना हमखास रोजगार मिळतो. 

ना नोंदणी, ना रोजगार कार्ड 
फेब्रुवारीपासून कोरोना लॉकडाउनमध्ये शेतीला मजूर मिळणे दुरापास्त झाले होते. अनलॉक सुरू होताच सप्टेंबरपासून पुन्हा मजूर बाजार गजबजू लागला आहे. स्थलांतरित व रोजंदारी मजुरांची संख्या वाढली आहे. पण येथे कामगार कल्याण विभागाने साधी नोंदणी किंवा रोजगार कार्ड देण्याची सोयही केलेली नाही. 

प्रतिक्रिया 
रोज दहा हजारांहून अधिक मजुरांमुळे शेतीची सोय होते. मात्र मजुरांच्या आरोग्य, निवारा, पिण्याच्या पाण्यापासून, तर मजूर नोंदणीचीही साधी सोय नाही. राजकीय-प्रशासकीय यंत्रणा आदिवासी भागात रोजगार देण्यात अपयशी ठरत असताना, जिथे रोजगार मिळतो तेथे किमान सुविधा पुरवत नाही. ही मोठी अनास्था आहे. 
- विष्णू माळेकर, कृषी मित्र, वाघेरा, ता. त्र्यंबकेश्‍वर 

पावसाळ्यात शेती, तर इतर वेळी मजुरी करतो. आदिवासी गावांत रोजगाराची सुविधा नाही. गावात रोजगारसेवक कोण माहिती नाही. मनरेगा कागदावर आहे. त्यामुळे मजूर बाजारात रोजंदारी मिळते. शेतीत रोजगार आहे, हे सरकार समजून कधी सुविधा देईल? 
- दत्तू कडाळी, शेतमजूर, मुंगसरे, ता. जि. नाशिक. 
 


इतर ताज्या घडामोडी
देवना साठवण तलावाचा प्रलंबित प्रश्न...नाशिक : येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व...
‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी ९० दिवस...परभणी ः जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार आणि संसर्ग...
अतिवृष्टीचा मदत आठवड्यात मिळणारसोलापूर : गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
महावितरणच्या आदेशामुळे वीज ग्राहक...सोलापूर : कोरोनाच्या साथीमुळे घटलेले आर्थिक...
भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल शासनाकडे नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू...
उन्हाळी सोयाबीन लागवडीस गतीअकोला : यंदाच्या खरीप सोयाबीन काढणीच्या वेळेस...
वारणेत उभारणार पशुवैद्यकीय महाविद्यालय...वारणानगर, जि. कोल्हापूर : येथील वारणा सहकारी...
बेदाणा पॅकिंगसाठीच्या बॉक्सच्या दरात...सांगली ः बेदाणा, डाळिंबासह अन्य फळभाज्यांच्या...
यवतमाळ : पोल्ट्रीत चार हजार कोंबड्यांचा...यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या...
रिसोडमध्ये कांदा बीजोत्पादनाकडे कल रिसोड, जि. वाशीम : तालुक्यात यंदा कांदा...
औरंगाबादेत सर्वच पक्षांकडून गुलालाची...औरंगाबाद : मतदानाची प्रक्रिया शांततेत पार...
पुणे जिल्ह्यात संमिश्र निकाल; दावे-...पुणे ः जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये...
साताऱ्यात स्थानिक आघाड्यांचा जल्लोषसातारा ः दोन दिवसांपूर्वी मतदान झाले. गेले दोन...
नांदेड जिल्ह्यात प्रस्थापितांनी सत्ता...नांदेड : नांदेड जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे...
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्कानाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या...
माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या...यवतमाळ : माजी मुख्यमंत्री व जलक्रांतीचे प्रणेते...
परभणी जिल्ह्यात संमिश्र यशपरभणी ः परभणी जिल्ह्यातील मतदान झालेल्या ४९८...
भाजपचे ४४, शिवसेनेचे २२ ग्रामपंचायतीवर...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी...
नागपुरात संत्रा दरात तेजीनागपूर ः आंबिया बहाराचा हंगाम अंतिम टप्प्यात...
सांगलीत भाजपला धक्का;  महाविकास आघाडीला...सांगली : ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकालात...