गुऱ्हाळघरांवरील मजुर मात्र अडकले 

गुऱ्हाळघरे महिन्यापासुन बंद आहेत. त्यातच ऊसतोड मजुरांना घरी जाण्यासाठी परवानगी मिळत नाही. त्यांच्याकडे रेशनिंगकार्ड नसल्याने रेशनिंगही देण्यात आलेले नाही. त्यामुळे त्यांच्यासमोर पोटापाण्याचा प्रश्न आहे. - साहेबराव गायकवाड, गुऱ्हाळ मालक
gurhalghar
gurhalghar

कऱ्हाड ः गुऱ्हाळघरावरील मजुर महिन्याहुन अधिक काळ बसून आहेत. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यांच्या सीमा सील केल्याने त्यांना घरी जाता येईना अन् हाताला काम नसल्यामुळे खायचेही वांदे संपेनात. कारखान्याचे ऊसतोड मजुर घरी गेले, मग गुऱ्हाळावरील मजुरांवर अन्याय का? असा सवाल त्यांच्यातुन उमटत असुन त्यांच्या जीवाची घरी जाण्यासाठी घालमेल सुरु आहे.  दरवर्षी विदर्भ, मराठवाड्यासह कर्नाटकातुनही सातारा जिल्ह्यातील साखर कारखाने आणि गुऱ्हाळघरांच्या परिसरात येतात. यंदाही हजारो मजुर आले आहेत. पहाटेपासून रात्रीपर्यंत त्यांच्या हातातील कामाला खंड नसतो. चार-पाच तासांची झोप सोडली तर ते सातत्याने काम करत असतात. त्यांच्या माध्यमातुन शिवारातील ऊस कारखान्याला, गुऱ्हाळघरांना जातो. यंदाचा हंगाम संपत आला असतानाच कोरोनाचे ग्रहण लागले. मजुर कारखाना कार्यक्षेत्रात अडकुन पडले. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय झाली. त्याचा विचार करुन मंत्रालय स्तरावर साखर काराखान्याच्या परिसरात अडकलेल्या ऊसतोड मजुरांना त्यांच्या घरी सोडण्याचा निर्णय झाला. त्यानुसार त्यांना घरीही सोडण्यात आले. मात्र त्यातुन गुऱ्हाळावरील काम करणाऱ्या मजुरांना सोडण्याचा प्रश्न अनुत्तरीतच राहिला आहे.  परवड आणि संघर्ष त्यांच्या पाचवीला पुजलेला असल्याने त्यांना महिन्यापासून बंद असलेल्या गुऱ्हाळाच्या परिसरातच थांबायची वेळ आली आहे. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यांच्या सीमा लॉक आहेत. मजुरांना घरी जाण्यासाठी परवानगी मिळत नाही असे त्यांना सांगण्यात आले आहे. त्यासाठी गुऱ्हाळमालकांनी शासन दरबारी प्रयत्नही केले. मात्र त्यांना परवानगी मिळाली नाही. कारखान्याचे ऊसतोड मजुर घरी गेले मग गुऱ्हाळावरील मजुरांवर अन्याय का ? हा सवाल त्यांच्यातुन उमटत असुन घरी जाण्यासाठी त्यांच्या जीवाची घालमेल सुरु आहे.  रेशनगही नाही अन् कामही  गुऱ्हाळावरील मजुर महिन्यापासुन बसुन आहेत. त्यामुळे त्यांच्या हाताला काम नसल्याने आणि सरकारकडुन त्या कुटुंबांना रेशन मिळत नसल्याने त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. त्यामुळे लहान मुलांना कसं जगवायचं हा यक्षप्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे शासनाने आम्हाला लवकर घरी सोडावे आणि इकडे आहे तोपर्यंत खाण्याची व्यवस्था होण्यासाठी किमान रेशनिंग तरी द्यावे, अशी मागणी मजुरांनी केली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com