onion_crop_1.jpg
onion_crop_1.jpg

कांदा काढणीसाठी मजूर मिळेना

लॉकडाऊन असल्याने मजूर बाहेर पडण्याचे नाव घेईनात. त्यामुळे शेतकऱ्यांना कांदा काढणीसाठी अडचणी येत आहेत. काही ठिकाणी घरातीलच व्यक्ती कांदा काढणी करू लागले आहेत. - संदीप सुक्रे, शेतकरी, केंदूर, ता. शिरूर

पुणे ः लॉकडाऊनमधून शेतीकांमाना वगळण्यात आले आहे. तरीही वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे ग्रामीण भागातील महिलांमध्ये भितीचे वातावरण तयार झाले आहे. यामुळे कांदा काढणीसाठी मजूर मिळेनासे झाले असल्याने अनेक शेतकऱ्यांचा अजूनही शेतातच असल्याचे चित्र आहे. यंदा लेट खरीप आणि रब्बी हंगामात पुणे जिल्ह्यात सुमारे ६० हजार ५२२  हेक्टरवर कांदा लागवड झाली होती. साधारणपणे लागवडीनंतर तीने ते चार महिन्यांनी काढणी होते. रब्बी हंगामात लागवड केलेल्या कांद्याची काढणी सुरु झाली आहे. मात्र, कोरोनामुळे शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यातच गावागावात नागरिकांनी पुढाकार घेऊन गावे सील केली आहेत. त्यामुळे मजुरांना घराबाहेर पडले अशक्य झाले आहे. २० एप्रिलपासून सरकारने शेतीकामे करण्यासाठी परवानगी दिली आहे. परंतु कोरोनाची भिती नागरिकांमध्ये असल्याने महिला मजूर घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत असून अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कांदा अजूनही तसाच पडून असल्याची स्थिती आहे. कांद्यासाठी शिरूर तालुका प्रसिद्ध आहे. त्यापाठोपाठ खेड, जुन्रर, आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड झाली आहे. पुरंदर, इंदापूर, दौड, बारामती, हवेली, मुळशी, भोर, वेल्हा, मावळ या तालुक्यातही कांदा लागवड झाली आहे. सध्या कोरोनामुळे अनेक मजूर परराज्यात निघून गेल्याने अनेक शेतकऱ्यांना शेती कामासाठी मंजुरांची टंचाई भासू लागली आहे. त्यातच कांदा काढणीसाठी मजुरांचा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे. काही ठिकाणी मजुरांची चांगलीच अडचण भासत असल्याने शेतकरी कुटुंबातील व्यक्तीनींच कांदा काढणीसाठी पुढाकार घेतला आहे.  शिरूर तालुक्यातील कर्डे येथील भाऊसाहेब पळसकर म्हणाले, की जिल्ह्यात सर्वाधिक कांदा लागवड शिरूर तालुक्यात होते. यंदा मी सुद्धा जवळपास दीड एकरावर उशिराने लागवड केली होती. त्याची काढणी नुकतीच चार ते पाच दिवसांपूर्वी झाली आहे. कांदा काढणीसाठी मजुरांची मोठी अडचण आल्याने आम्ही कुटुंबांतील व्यक्तींनी सगळा कांदा काढून चाळीमध्ये ठेवला आहे. अनेक शेतकऱ्यांना मजुरांच्या अडचणी येऊ लागल्या आहेत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अजून कांदा पडून आहे. काही व्यापारी कांदा खरेदीसाठी येतात. मात्र, ते चार, पाच रूपये किलोने मागतात.  पुणे जिल्हयात झालेली कांदा लागवड (हेक्टरमध्ये) हवेली २६८८, मुळशी २०९, भोर ७८०, मावळ ३२१, वेल्हे २६, जुन्नर ७६२०, खेड ७८८१, आंबेगाव ६९४५, शिरूर १२,७७३, बारामती ४८१७, इंदापूर १९७२, दौंड ३३४, पुरंदर ६२८५.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com