Agriculture news in marathi, Labor scarcity in agriculture in Khandesh | Agrowon

खानदेशात शेतीकामात मजूरटंचाई
टीम अॅग्रोवन
बुधवार, 21 ऑगस्ट 2019

वाफसा आहे, परंतु मजूर पुरेसे मिळत नाहीत. मजुरीचे दर स्थिर नाहीत. अधिकचा खर्च मजुरीवर या हंगामात लागत आहे. शेतीकामे २० ते २२ दिवस ठप्प राहिली. सध्या वाफसा असल्याने एकाच वेळी सर्वच शेतकऱ्यांनी शेतीकामे हातात घेतली आहेत. 
- आत्माराम पाटील, शेतकरी, कापडणे, (जि. धुळे)

जळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व ऑगस्टच्या सुरवातीचे १० दिवस बऱ्यापैकी पर्जन्यमान राहिले. पण, यामुळे शेतांमध्ये तण वाढले. शिवाय आंतरमशागती व इतर कामे ठप्प राहिली. आता एकाच वेळी शेती कामांना वेग आला आहे. त्यामुळे मजूरटंचाई वाढली आहे. परिणामी, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वाढ झाल्याची स्थिती आहे. 

सततच्या पावसाने मुरमाड जमिनी वगळता मध्यम व काळ्या कसदार जमिनीत वाफसा नव्हता. तापी, गिरणा व पांझरा काठावरील काही काळ्या कसदार जमिनीत अजूनही हवा तसा वाफसा नाही. यातच मध्येच सरी कोसळत असल्याने वाफसा राहत नाही. यामुळे कापूस, कडधान्य, तृणधान्याच्या शेतात तण वाढले. अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन, कापूस पिकांत तणनाशकांचा उपयोग केला. पण कडधान्य, तृणधान्य पिकात तणनाशके वापरूनही तण नष्ट झाले नाही. अशा सगळ्या स्थितीत शेतीकामे ठप्प राहिली. 

मागील पाच-सहा दिवसांमध्ये खानदेशातील धुळे भागातील शिंदखेडा, धुळे, शिरपूर, जळगावमधील चोपडा, यावल, धरणगाव, एरंडोल, पाचोरा, चाळीसगाव, भडगाव, बोदवड, जामनेर, जळगाव, भुसावळ, यावल आदी भागात बऱ्यापैकी वाफसा तयार झाला आहे. शेतीकामांना वेग आला आहे. परंतु, एकाच वेळी सर्वच भागात, बहुतांश शेतकऱ्यांनी तणनियंत्रण, फवारणी, आंतरमशागत आदी कामे हाती घेतली. यामुळे सर्वत्र मजूरटंचाई वाढली आहे. 

मजुरी अधिकची देऊन तणनियंत्रण, आंतरमशागतीची कामे शेतकऱ्यांना करून घ्यावी लागत आहेत. भाडेतत्त्वावर औत व मजूर हवा असल्यास किमान एक हजार रुपये रोज, अशी मजुरी लागत आहे. एकरभर कापूस, सोयाबीन, उडीद, ज्वारी, मूग, ताग आदी पिकातील तणनियंत्रणासाठी किमान ७०० ते ८०० रुपये मजुरी शेतकऱ्यांना मोजावी लागत आहे. तणनियंत्रण करून लागलीच आंतरमशागतही शेतकरी मंडळी उरकून घेत आहेत. तणाचा बिमोड करण्यासाठी अधिकचे श्रम व मजुरी लागत आहे. 

फवारणीची कामेही गतीने सुरू असून, दोन एकर कापूस पिकाच्या शेतात फवारणीसाठी किमान २५० रुपये मजुरी लागत आहे. पुढे पोळा सण असून त्यापूर्वी फवारणी, आंतरमशागती, तणनियंत्रणाची कामे उरकून घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल आहे. 

इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...