Agriculture news in marathi Labor shortage for grape harvesting in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात द्राक्षाच्या खरड छाटण्यांसाठी मजुरटंचाई

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 14 एप्रिल 2020

चालू वर्षीच्या एप्रिल खरड छाटण्यांना उशीर झाला आहे. कामांचा वेग वाढवून नियोजन करावे लागणार आहे. अनेक भागात छाटणीनंतर काही भागात उडद्या, मिलिबग किडीचा प्रादुर्भाव नवीन फुटींवर दिसून येत आहे. त्यामुळे नियंत्रण करावे. शिफरशीनुसार खतांचे व्यवस्थापन करावे. 
- प्रा. तुषार उगले, के. के. वाघ कृषी महाविद्यालय, नाशिक 

नाशिक : जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम अंतिम टप्प्यात आला. मात्र, ‘कोरोना’मुळे व्यापारी व मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने काढणी हंगाम लांबणीवर गेला आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या बागा खाली झाल्या आहेत. त्यांनी पुढील हंगामाच्या नियोजनासाठी खरड छाटण्या सुरू केल्या आहेत. ज्यांच्या बागा काढणीविना आहेत, त्यांची लगबग सुरू आहे. मात्र, खरड छाटणीसाठी मजूर नसल्याने अडचणी येत आहेत. 

अतिवृष्टीमुळे सप्टेंबरमधील छाटण्या फुलोरा अवस्थेत घडकुज, घड जिरने, डाऊनी अशा समस्यांनी ग्रासल्या. अशा प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा शेतकऱ्यांनी उत्पन्न घेतले. मात्र, ‘कोरोना’मुळे उठाव नसल्याने दिंडोरी, निफाड, चांदवड, सिन्नर, नाशिक व येवला तालुक्यातील अनेक बागा काढणीविना आहेत. त्यामुळे माल स्थानिक व्यापाऱ्यांना दिला जातोय. तर, काहींचा बेदाणा करण्यात येत आहे. 

वेळेवर खरड छाटण्या न झाल्यास प्रकाश संश्लेषण, अन्नद्रव्य निर्मिती, यात अडचण येण्याची शक्यता आहे. गर्भधारणा अडचणीत येऊ शकते. त्यामुळे पुढील हंगामातील कामे लांबणीवर जाऊ नयेत, यासाठी आहे त्या दरात माल खाली करून छाटण्यां करणे सुरू आहे. द्राक्ष उत्पादक हंगामातील नियोजन बिघडणार नाही, यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र, अशा परिस्थितीत पेठ, सुरगाणा या भागातील मजूर गावी परतले आहेत. त्यामुळे कामांत अडचणी येत आहेत. आता स्थानिक मजुरांमार्फत कामे सुरू आहेत. मात्र, कामांची गती कमी झाल्याची स्थिती आहे. 

अशा आहेत अडचणी.. 

  • पेठ, सुरगाणा भागातील कुशल मजूर उपलब्ध नाहीत 
  • अपुऱ्या मनुष्यबळावर छाटण्या सुरू 
  • एकरी मजुरीत वाढ 
  • हंगामातील नियोजन कोलमडण्याची भीती 

 


इतर ताज्या घडामोडी
फूल उत्पादकांना आस दसरा, दिवाळीचीपुणे : टाळेबंदीत सर्वाधिक फटका बसलेल्या फूल...
लातूर विभागात २३ लाखावर शेतकऱ्यांना...उस्मानाबाद / लातूर : लातूर येथील विभागीय कृषी...
औरंगाबादमध्ये कांदा २०० ते ३२०० रूपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
पुणे जिल्ह्यात पीककर्जाची होणार सहा...पुणे :  नियमित कर्ज फेडणाऱ्या...
मूग, उडीद खरेदीसाठी सोलापूर, बार्शी,...सोलापूर  : मूग, उडदाच्या आधारभूत किंमती...
खानदेशातील दुष्काळी भागातील प्रकल्पांत...जळगाव  ः खानदेशातील दुष्काळी भागातील निम्मे...
वाशीम जिल्ह्यात पिकांच्या नुकसानीचे...वाशीम  : ‘‘जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत...
खानदेशात सोयाबीनची कापणी, मळणी लांबणीवर...जळगाव  ः खानदेशात काळ्या कसदार जमिनीत वाफसा...
हिंगोली, परभणीत एक लाख हेक्टर पिकांवर...हिंगोली, परभणी : अतिवृष्टी, ओढे - नाले, नद्यांचे...
साखर कारखान्यांचे वजनकाटे सुधारा, ‘...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या वजन काट्याबाबत...
सांगलीत मूग, उडीद खरेदीसाठी नोंदणी सुरूसांगली : बाजार समितीच्या आवारातील विष्णूअण्णा...
कृषी विधेयकाच्या समर्थणार्थ ‘रयत’ने...नाशिक  : केंद्र सरकारने कृषी विधेयकाच्या...
राज्यात ढगाळ हवामानाची शक्यताईशान्य मॉन्सून म्हणजेच परतीच्या मॉन्सूनला सुरुवात...
खानदेशात पाऊस थांबला, वाफशाची प्रतीक्षाजळगाव : खानदेशात गुरुवारी (ता.२५) पाऊस थांबला....
सांगलीत नियोजनाअभावी थेट शेतमाल विक्री...सांगली : लॉकडाउनच्या काळात संपूर्ण बाजारपेठा बंद...
सोलापुरातील उपबाजार समित्यांचा प्रस्ताव...सोलापूर ः सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या...
कोल्हापुरात शेतकरी संघटनांकडून कृषी...कोल्हापूर : राज्यसभेत मंजूर झालेल्या कृषी...
नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे...सोलापूर ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांचे प्रश्‍न शासनाकडे पोचवणार :...नाशिक : ‘‘मी देखील शेतकऱ्याचाच मुलगा आहे. कांदा...
मराठवाड्यात कृषी विधेयकांची होळीऔरंगाबाद / परभणी /  नांदेड :...