द्राक्षाच्या छाटणीला मजुरांची टंचाई

जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे द्राक्षाची सुरू होणारी फळ छाटणी तब्बल तीन महिन्यांनी उशिरा सुरू झाली.
grapes chopping
grapes chopping

सांगली : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस सुरू होता. त्यामुळे द्राक्षाची सुरू होणारी फळ छाटणी तब्बल तीन महिन्यांनी उशिरा सुरू झाली. द्राक्ष बागेच्या कामासासाठी गतवर्षी स्थानिक २५ हजार, तर परराज्यांतून २५ हजार असे मजूर येतात. यंदा परराज्यांतून १५ हजार मजूर आले आहेत. परराज्यांतील मजुरांची संख्या कमी आहे. जिल्ह्यात द्राक्षाची एकाच वेळी फळ छाटणी आणि इतर कामे सुरू झाल्याने मजुरांची टंचाई भासू लागली आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यापासून द्राक्षाची फळ छाटणी सुरू होते. द्राक्ष बागेच्या कामासाठी दरवर्षी ५० हजार मजूर चार महिने काम करतात. परंतु यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत पाऊस असल्याने द्राक्ष उत्पादकांना फळ छाटणी घेता आली नाही. सध्या द्राक्ष पट्ट्यात फळछाटणी आणि द्राक्ष बागेतील अन्य कामे मोठ्या प्रमाणात सुरू झाली आहेत. पावसामुळे एकाच वेळी छाटण्या घ्यावा लागल्या आहेत. कामे सुरू झाली मात्र मजुरांची शोधाशोध करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू झाली आहे. एकाच वेळी सर्वत्र कामे सुरू झाल्याने इतके मजूर आणायचे कोठून, हा प्रश्‍न आहे. जादा क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांकडे बिहार, पश्‍चिम बंगालमधील शेतमजूर वार्षिक मजुरीवर असतात. त्यापैकी परराज्यांतील मजूर लॉकडाउनच्या काळात परत गेले होते. त्यामुळे सुरुवातील स्थानिक मजुरांकडून द्राक्ष फळछाटणी सुरू करण्यात आली. स्थानिक मजुरांवर कामाचा ताण पडत आहे. स्थानिक मजुरांचे एक टीम आहेत. ते एकाच शेतकऱ्यांचे वर्षभरातील सर्व बागेतील कामे घेत असतात. त्याचा परिणाम मजूर न मिळण्यावर झाला आहे. दरम्यान, बिहार, उत्तर प्रदेशसह अन्य ठिकाणचे मजूर परत आणण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला होता. परंतु कोरोना विषाणू संसर्गाच्या भितीने परराज्यांतून मजूर आले नाहीत. त्यामुळे मजुरांची कमतरता भासू लागली असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया यंदा पाऊस उशिरापर्यंत असल्याने फळछाटण्या लांबणीवर पडल्या. स्थानिक मजुरांची संख्या पुरेशी आहे. परंतु परराज्यांतून येणारे मजूर कोरोना विषाणूच्या भीतीने आले नाहीत. त्यातच द्राक्ष फळछाटण्या एकाच वेळी आल्या आहेत. त्यामुळे मजुरांची टंचाई भासते आहे. - महादेव लाड, द्राक्ष उत्पादक, कुंडल, ता. पलूस

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com