खानदेशात मजूरटंचाई वाढली

खानदेशात पूर्वहंगामी कापूस पीक जोमात आहे. लागवड यंदा बऱ्यापैकी झाली आहे. परंतु पिकांत तणही वाढले आहे, पण उष्णता व इतर कारणांमुळे मजूर टंचाई जाणवू लागली आहे. शेतकरी तणनाशकांचा वापर यंदा वाढवतील.
खानदेशात मजूरटंचाई वाढली Labor shortage increased in Khandesh
खानदेशात मजूरटंचाई वाढली Labor shortage increased in Khandesh

जळगाव : खानदेशात पूर्वहंगामी कापूस पीक जोमात आहे. लागवड यंदा बऱ्यापैकी झाली आहे. परंतु पिकांत तणही वाढले आहे, पण उष्णता व इतर कारणांमुळे मजूर टंचाई  जाणवू लागली आहे. शेतकरी तणनाशकांचा वापर यंदा वाढवतील. तसेच मजुरी दर कमी करावेत, प्रशासनाने यात हस्तक्षेप करावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.    कोविडमुळे शेती संकटात आहे. पिकांचे हमीभाव जाहीर झाले. हमीभाव जाहीर झाले, पण तेवढे दर शेतकऱ्यांना मिळतच नाहीत. पण हमीभाव वाढले की, मजुरीचे दरही वाढवा, अशी मागणी ग्रामीण भागात सुरू होते. मजूर टंचाईतच ही मागणी घेऊन अलीकडेच यावल तालुक्यातील शेतमजुरांनी प्रशासनाकडे मजुरी दर वाढविण्याची मागणी करून शेतकऱ्यांची कोंडी केली. पण कापूस किंवा इतर पिकांचे दर गेले दोन वर्षे अपवाद वगळता सर्वच शेतकऱ्यांना हवे तसे मिळालेच नाहीत. कापसाचे दर गेले दोन वर्षे सरासरी पाच हजार रुपये प्रतिक्विंटल मिळाले. कापसाचा हमीभाव गेल्या वर्षी ५८२५ होता, यंदा हा हमीभाव सहा हजार रुपयांवर आहे. पण हा हमीभाव शेतकऱ्यांच्या पदरात पडत नसल्याने मजुरांनी शेतकऱ्यांची कोंडी करणे योग्य नाही, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.  सध्या पूर्वहंगामी कापूस पिकात तण वाढत आहे. पाऊस सुरू झाल्यास तण वाढेल, वाफसा राहणार नाही. यात पिकाची स्थिती बिकट होईल. मजूर टंचाईंमुळे तण नियंत्रणासाठी मजूर मिळत नसल्याची स्थिती आहे. शेतकरी लगतच्या गावातून किंवा इतर गावांमधून मजूर उपलब्ध करून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. १०० ते १२० रुपये रोज, अशी मजुरी कापूस पिकात तण नियंत्रणासाठी आहे. मजुरी दर वाढल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे. या स्थितीत १५ ते २० दिवसांच्या कापूस पिकात तणनाशकांचा वापर करण्याची तयारी शेतकरी करीत आहेत. कारण त्याशिवाय पर्याय नाही. अन्यथा पीक सोडून द्यावे लागेल व मोठे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागेल, अशी स्थिती आहे. जिल्ह्यात यंदा किमान पाच ते सहा लाख लिटर तणनाशकांचा वापर होऊ शकतो. ही बाब लक्षात घेता विविध कंपन्यांनी देखील तणनाशक पुरवठ्यावर भर दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com