agriculture news in Marathi labor will sent after permission of RajsthanMaharashtra | Agrowon

राजस्थानकडून परवानगी मिळाल्यावर कामगारांना रेल्वेने पाठवणार

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 मे 2020

राजस्थान शासनाकडे ११९७ कामगारांची यादी परवानगीसाठी पाठविली आहे. अद्याप त्यांच्याकडून परवानगी आली नाही.

कोल्हापूर: राजस्थान शासनाकडे ११९७ कामगारांची यादी परवानगीसाठी पाठविली आहे. अद्याप त्यांच्याकडून परवानगी आली नाही. ती आल्यास या सर्व कामगारांना रेल्वेने पाठविण्यात येईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी दिली. 

कोल्हापूर जिल्ह्यात येण्यासाठी ३४ हजार ३६२ जणांनी तर जिल्ह्यातून बाहेर जाण्यासाठी १७ हजार ४२ अशा एकूण ५१ हजार ४०४ जणांनी आॕनलाइन नोंद केली आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, राजस्थानमधील एकूण १७०० कामगार जिल्ह्यात आहेत. रेल्वेच्या क्षमतेनुसार ११९७ कामगारांची यादी राजस्थान शासनाकडे परवानगीसाठी पाठविण्यात आली आहे. अद्याप परवानगी मिळाली नाही. ती मिळाल्यास कोल्हापुरातून रेल्वेने या कामगारांना राजस्थानकडे पाठविण्यात येईल. 

त्याच पद्धतीने बिहारमधील २१६५ कामगारांनीही आॕनलाइन अर्ज केले आहेत. त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत असून, त्यांच्या परवानगीसाठीही बिहार शासनाला संपर्क केला जाईल. गेले दीड महिना कोल्हापुरकरांनी अत्यंत चांगला पद्धतीने सहकार्य केले आहे. तशाच पद्धतीने इथून पुढेही लॉकडाऊनमध्ये सहकार्य करावे.

बाहेरुन जिल्ह्यात येणाऱ्या प्रत्येकाची वैद्यकीय तपासणी होणार असून तसे नियोजन केले आहे. निकषानुसार ज्यांची घरात रहायची व्यवस्था नाही त्यांना संस्थात्मक अलगीकरण करणार आहोत. तशा सूचना तहसीलदारांना दिल्या आहेत, असे श्री. पाटील यांनी सांगितले. 


इतर ताज्या घडामोडी
काही भागात पावसाच्या उघडिपीची शक्यता महाराष्ट्रावर बुधवार (ता.२३) पर्यंत  १००४...
राज्य द्राक्ष बागायतदार संघाची ...नाशिक: महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार...
पांगरी परिसरात पिकांवर आस्मानी संकटपांगरी, जि. सोलापूर ः पांगरी (ता. बार्शी) परिसरात...
शेतमाल स्थानिक भागात विकला जाणार : भुजबळनाशिक : त्र्यंबकेश्वर तालुक्यात आदिवासी समाज...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पावसाचे थैमाननांदेड : मराठवाड्यातील परभणी, हिंगोली जिल्ह्यात...
नाशिक विभागात कांदा लागवडीत ८ हजार...नाशिक : चालू वर्षी खरीप कांद्याच्या लागवडीपूर्वी...
रावेर तालुक्यात सीएमव्ही नुकसानीचे...जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही)...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या पिकाला...हिंगोली : जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसांपासून...
मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या...औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून...
धुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक...धुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत...
पावसाचा डाळींब पिकाला तडाखाआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी...
मायक्रो फायनान्सचे चक्रव्यूह...मुंबई : ग्रामीण भागातील सूक्ष्म वित्त पुरवठा...
नगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार...नगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला...
कोकण कृषी विद्यापीठात बांबू कार्यशाळेचे...दापोली, जि. रत्नागिरी : जगभरात दरवर्षी १८...
अकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे...अकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात...
सदोष बियाणेमुळे भेंडी बीजोत्पादक अडचणीतबुलडाणा ः लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांनी या...
भातपीक कापणीत पावसाचा अडसररत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने...
ठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला...मुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान...
औरंगाबादमध्ये कांदा ३०० ते २३०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
आरोग्यदायी विड्याचे पानकोणत्याही धार्मिक कार्यात, पूजेच्या ठिकाणी...