Agriculture news in Marathi Laboratory approval for 'corona' inspection in Akola | Agrowon

अकोल्यात ‘कोरोना’च्या तपासणीसाठी प्रयोगशाळेला मंजुरी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 एप्रिल 2020

अकोला ः ‘कोरोना’ विषाणूची चाचणी करण्यासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न व्हीआरडीएल प्रयोगशाळा (लॅब) उभारण्यात आली आहे. ही प्रयोगशाळा आता नमुने तपासणीसाठी सज्ज झाली असून या प्रयोगशाळेला नवी दिल्ली येथून आयसीएमआर मंजूरी मिळाली आहे. गुणवत्ता चाचणीची प्रक्रिया पार करावी लागेल. त्यानंतर प्रत्यक्ष चाचणीची परवानगी मिळणार आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोलाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे यांनी सांगितले. 

अकोला ः ‘कोरोना’ विषाणूची चाचणी करण्यासाठी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न व्हीआरडीएल प्रयोगशाळा (लॅब) उभारण्यात आली आहे. ही प्रयोगशाळा आता नमुने तपासणीसाठी सज्ज झाली असून या प्रयोगशाळेला नवी दिल्ली येथून आयसीएमआर मंजूरी मिळाली आहे. गुणवत्ता चाचणीची प्रक्रिया पार करावी लागेल. त्यानंतर प्रत्यक्ष चाचणीची परवानगी मिळणार आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोलाचे अधिष्ठाता डॉ. अपूर्व पावडे यांनी सांगितले. 

अकोल्यात अशा प्रकारच्या प्रयोगशाळेची निर्मिती ही केंद्र शासनाच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग योजनेअंतर्गत विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळा वैद्यकीय महाविद्यालयस्तरावर स्थापन करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत राज्यात सहा ठिकाणी या प्रयोगशाळा उभारण्यात येत असून त्यातील एक अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उभारण्यात येत आहे. 

अकोला येथील प्रयोगशाळेसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारतीत २०० चौरस मीटर जागा देण्यात आली आहे. या इमारतीचे बांधकाम हे जानेवारी महिन्यात पूर्ण झाले आहे. आयसीएमआर या संस्थेतर्फे या प्रयोगशाळा उभारणीसाठी ५० लाख रुपये बांधकाम व अन्य स्थापत्य कामांसाठी तसेच ९३ लाख रुपये यंत्रसामग्री, आवश्यक रसायने, किट्स, उपकरणे व फर्निचर यासाठी मंजूर करण्यात आले. 

या प्रयोगशाळेत बायोसेफ्टी कॅबिनेट, लॅमिनर एअर फ्लो, ऑटोमॅटिक सेंट्रिफ्युगर, डीप फ्रिजर इत्यादी आवश्यक साहित्यही प्राप्त होऊन बसविण्यात आले आहे. ‘कोरोना’ विषाणू चाचणीच्या अनुषंगाने आवश्यक असलेले आरटीपीसीआर हे मशीन आयसीएमआर या संस्थेतर्फे मार्च महिन्यात २४ तारखेला प्राप्त झाले आहे. प्रयोग शाळेचे आवश्यक काम ३० मार्चला पूर्ण झाले आहे. प्रयोगशाळेसाठी लागणारे आनुषंगिक यंत्रे, उपकरणे, रसायने प्राप्त झाली आहेत. आता ही प्रयोगशाळा नमुने तपासणीसाठी सज्ज आहे. 
 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...
नाशिकमध्ये वाटाण्याची आवक कमीच; दरात...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नागपूर जिल्ह्यात पुराचा २९ हजार...नागपूर : पुरामुळे जिल्ह्यात २९ हजार २६२...
सोलापुरात पितृपंधरवड्यामुळे गवार,...सोलापूर ः पितृपंधरवड्यामुळे सोलापूर कृषि उत्पन्न...
डाळिंब फळपिकातील तेलकट डाग व्यवस्थापनसोलापूर, सांगली, नाशिक आणि नगर यासारख्या...
औरंगाबादमध्ये मूग, उडीद, ज्वारी,...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गत...
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...