जत पूर्व भागातून मजूर उसतोडीसाठी रवाना

सांगली : जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. जत पूर्व भागातील जनतेला पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड, वीटभट्टीवर काम करण्याशिवाय पर्याय नाही. पूर्व भागातील जनतेच्या नशिबी पुन्हा कोयता व पालच आले आहे.
The laborers from the eastern part of Jat left for Ustodi
The laborers from the eastern part of Jat left for Ustodi

सांगली : जत तालुका दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. जत पूर्व भागातील जनतेला पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड, वीटभट्टीवर काम करण्याशिवाय पर्याय नाही. पूर्व भागातील जनतेच्या नशिबी पुन्हा कोयता व पालच आले आहे. जत पूर्व भागातील २५ हजारांहून अधिक ऊसतोड मजूर पोटासाठी बिऱ्हाडासह जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह व कर्नाटकात ऊसतोडीसाठी स्थलांतरित होत आहेत. जत तालुक्यातील काही मजूर शाळकरी मुलांना घेऊन ऊसतोडीसाठी जाताना दिसत आहेत. यंदाही त्यांची दीपावली उसाच्या फडातच साजरी होणार आहे.

दुष्काळ जत तालुक्याच्या पाचवीला पुजल्यासारखा आहे. यंदा या भागात २५ हजारांहून अधिक लोक जिल्ह्याच्या पश्चिम भागात ऊसतोडीसाठी लहान मुलांसह स्थलांतरीत होत आहेत. काही मजूर कर्नाटकातसुद्धा ऊसतोडी जात आहेत. जत तालुका दुष्काळ असल्याकारणाने मजुरांना हाताला काम मिळत नाही. मुकादमाकडून आगाऊ उचल म्हणून एक लाख रुपये विना व्याज घेतले जातात. टोळीत १२ ते १५ मजूर असतात. सहा महिने ऊस तोडीच्या फडात तर व सहा महिने गावी, अशी त्यांची अवस्था आहे.

दिवाळीच्या तोंडावर ट्रॅक्टर व ट्रक ऊसतोड मजुरांच्या नेण्यासाठी उभे आहेत. पूर्व भागातील संख, तिकोंडी, करेवाडी (ति), आसंगी तुर्क, पांढरेवाडी, सोन्याळ, अंकलगी, अक्कलवाडी, खंडनाळ, मोठेवाडी, लवंगा, लकडेवाडी, बोरगी, हळ्ळी, गिरगाव, मोरबगी, सोनलगीसह अनेक गावांतील लोक सातारा, सांगली, कोल्हापूर, कराड, रेठरे (शिवनगर) व कर्नाटकातील नाद, रेणुका, केंपवाड या साखर कारखान्यांस ऊसतोडसाठी जात आहेत.

कोरोना, कामामुळे शाळेला दांडी

काही मजूर मुलांमुलींना शाळा अर्धवट सोडून सोबत घेऊन जात आहेत. कोरोना महामारीमुळे दोन वर्षे मुलांच्या शिक्षणावर परिणाम झाला आहे. कोरोनास्थिती सुधारत असल्याने कारखाने सुरू झाले आहेत. मजूर ऊसतोडीच्या ठिकाणी मुलांना सोबत घेऊन जात असल्याने त्यांचा शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com