Agriculture news in Marathi In the lack of diesel, the kharipa prefix has been postponed | Agrowon

डिझेल अभावी खरिपाची पूर्वतयारी रखडली 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 11 एप्रिल 2020

आटपाडी, जि. सांगली : संचार बंदीमुळे ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेली शेती व्यवसायाशी संबंधित डिझेल अभावी खरीप पूर्वतयारी कामे पूर्ण ठप्प पडली आहेत. ट्रॅक्‍टर चालकांना वीस लिटर डिझेलसाठी ट्रॅक्‍टर घेऊन पंपावर वाऱ्या कराव्या लागतात. यामुळे जवळपास तालुक्‍यातील एक हजार वर ट्रॅक्‍टर पूर्ण विश्रांती घेत आहेत. दरम्यान, अत्यावश्‍यक सेवा समजून शेतीकामांसाठी लागणाऱ्या यंत्रणांना प्रशासनाने इंधन उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. 

आटपाडी, जि. सांगली : संचार बंदीमुळे ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा असलेली शेती व्यवसायाशी संबंधित डिझेल अभावी खरीप पूर्वतयारी कामे पूर्ण ठप्प पडली आहेत. ट्रॅक्‍टर चालकांना वीस लिटर डिझेलसाठी ट्रॅक्‍टर घेऊन पंपावर वाऱ्या कराव्या लागतात. यामुळे जवळपास तालुक्‍यातील एक हजार वर ट्रॅक्‍टर पूर्ण विश्रांती घेत आहेत. दरम्यान, अत्यावश्‍यक सेवा समजून शेतीकामांसाठी लागणाऱ्या यंत्रणांना प्रशासनाने इंधन उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. 

आटपाडी तालुक्‍यात रब्बीचा हंगाम संपला आहे. ज्वारीची काढणी झाली आहे. अनेक शेतात कडबा तसाच पडून आहे. हंगाम संपल्यानंतर शेतकरी खरीप पूर्वतयारीच्या कामाला लागतात. अनेक शेतकरी नांगरणी आणि खुरटणी करतात. तसेच शेणखत शेतात सोडले जाते. माॅन्सूनचा पाऊस झाल्यानंतर शेतकरी बाजरी, मका, भुईमूग याची पेरणी करतात पण त्यासाठीची करावी लागणारी तयारी सध्या पूर्ण ठप्प आहे. 

तालुक्‍यात छप्पन गावात एक हजारावर ट्रॅक्‍टर आहेत. लहान गावातही दहा-पंधरा ट्रॅक्‍टर सहज आढळतात. शेतकऱ्याची कडबा घरी आणून नांगरट आणि मशागत करण्यासाठी धडपडत चालली आहे. पण ट्रॅक्‍टर मिळत नाहीत तर ट्रॅक्‍टर चालकांना अपेक्षित डिझेल मिळत नसल्यामुळे ट्रॅक्‍टर धक्‍याला लावले आहेत. ट्रॅक्‍टरला डिझेल देण्याचा प्रशासनाने फतवा काढला. तलाठी आणि ग्रामसेवकाच्या सहीचे पत्र आणि सोबत ट्रॅक्‍टर घेऊन गेल्यानंतरच पंप चालक जेमतेम वीस लीटर तेल देतात. 

खेडेगावातून तालुक्‍यात पंपावर ये-जा करण्यासाठी पाच-सात लीटर तेल जाते. राहिलेल्या तेलातून एक दिवस ही मशागत होत नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी ग्रामसेवक तलाठी यांचे नवीन पत्र आणि पंपाची वारी करावी लागते. यामुळे ट्रॅक्‍टर उभा करणे पसंत केले आहे. 

तालुक्‍यात ५६ गावे असून करगणी, आटपाडी, दिघंची, झरे आणि खरसुंडी या पाच ठिकाणीच पंप आहेत. येथून ग्रामीण गावे आठ, दहा, पंधरा वीस किलोमीटर अंतरावर आहेत. डिझेलसाठी रोजचा प्रवास परवडत नाही. ज्या गावात पंप आहेत तेथील प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. इतर पन्नास गावांत मात्र डिझेल अभावी शेती कामे ठप्प आहेत. पूर्वतयारीच नसल्यामुळे पुढच्या पेरणी होतील का याबद्दल साशंकता आहे. 

पालकमंत्री यांच्या आढावा बैठकीत हा प्रश्न मांडला होता. यावर ट्रॅक्‍टरना ज्यादा आणि आणि केडात तेल देण्याचा सूचना पालकमंत्री केल्या आहेत 
- वृषाली पाटील, सरपंच, आटपाडी. 

पात्रेवाडी पासून आटपाडी १८ किलोमीटर आहे. वीस लीटर तेलासाठी तेवढा ट्रॅक्‍टर घेऊन जाण परवडत नाही. त्यामुळे ट्रॅक्‍टर उभा केला आहे. दुसरा पर्याय नाही. 
- भीमराव जाधव, शेतकरी पात्रेवाडी. 


इतर ताज्या घडामोडी
बार्शी तालुक्यात सहा स्वस्त धान्य...सोलापूर : बार्शी तालुक्यातील सहा स्वस्त...
फालसापासून जाम, जेली, चटणीफालसा हा एक रानमेवा आहे. फालसा फळामध्ये प्रथिने,...
सोलापूर जिल्ह्यात पिकांच्या...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सलग...
परभणी, हिंगोलीत सोयाबीन, तुर, कपाशीचे...परभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील मंडळांत...
परभणी जिल्ह्यात पावसाचा सोयाबीन पिकाला...परभणी : जिल्ह्यात दीर्घ खंडानंतर पावसाचे आगमन...
विष्णुपुरी प्रकल्पाचे सहा दरवाजे उघडलेनांदेड : गोदावरी नदीवरील विष्णुपुरी...
खानदेशात नुकसानीबाबत सोयाबीनचेही...जळगाव ः मूग, उडीद नुकसानीसंबंधी गेल्या...
जळगाव जिल्ह्यात बाजार समित्यांकडून...जळगाव ः जिल्ह्यात काही बाजार समित्यांचा...
परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील...जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा...
पंजाब, हरियानात शेतकऱ्यांची आंदोलने नवी दिल्ली : केंद्र सरकारने आणलेल्या कृषिविषयक...
चक्रीवादळाची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई...सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळातील नुकसानीकरिता...
नगर जिल्ह्यात मूग उत्पादकतेत यंदा...नगर ः नगर जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस झाल्याने...
मुळा धरणातून वीस हजार क्युसेक विसर्गनगर ः नगर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून जोरदार...
पावसाने सोयाबीनला फुटले कोंबवाशीम ः जिल्ह्यात काही भागात सततच्या पावसामुळे...
औरंगाबाद, लातूरमध्ये पावसाचा धुमाकूळऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच...
पोषणयुक्त आहार घेण्यावर भर द्या : पाटीलनाशिक : ‘‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने...
कांदा निर्यातबंदी विरोधात ‘सोशल मीडिया...नाशिक : २०१३-१४ मध्ये सोशल मीडियाचा मोठ्या...
कारखान्यांना २५ बेडचे हॉस्पिटल बंधनकारकसोलापूर : राज्यातील ऊस गाळप हंगाम १५ ऑक्‍...
निर्यात अडथळे, बियाणे दराचा कांदा...जळगाव ः खानदेशात प्रतिकूल वातावरणामुळे खरिपातील...
परभणीत भेंडी १००० ते १५०० रूपये क्विंटल परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...