सांगलीत खतांची कमतरता

सांगली ः जिल्ह्यात ८० टक्के खतांचा पुरवठा केला असल्याचा दावा कृषी विभाग करतो आहे. परंतु, जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून रासायनिक खतांची कमतरता भासू लागली आहे. खते वेळेत मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.
Lack of fertilizers in Sangli
Lack of fertilizers in Sangli

सांगली ः जिल्ह्यात ८० टक्के खतांचा पुरवठा केला असल्याचा दावा कृषी विभाग करतो आहे. परंतु, जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपासून रासायनिक खतांची कमतरता भासू लागली आहे. खते वेळेत मिळत नसल्याचे शेतकरी सांगत आहेत.

जिल्ह्यात कृषी विभागाने १ लाख २४ हजार टन रासायनिक खतांचे आवकंट केले होते. गतवर्षीचे २० हजार टन शिल्लक होते. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर खतांचे वाटप केले. जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांची चांगली वाढ झाली आहे. सध्या शेतकरी पिकांना रासायनिक खते देण्याचे नियोजन करू लागला आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर खते दिल्याने विक्रीचा ताण कमी झाला. परंतु खतांची दररोज रॅक येतात. त्यामुळे खतांची कमतरता पडत नाहीत.

शेतकऱ्यांना वेळेत खतांची उपलब्धता होते. परंतु गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात खतांची रॅक वेळेत येत नसल्याचे काही जाणकारांनी सांगितले. तीन ते चार दिवसांतून रॅक येतात. त्यानंतर कृषी सेवा केंद्रापर्यंत आलेली खते पोचविण्यासाठी पाच दिवसाचा कालावधी लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत खते मिळत नाही.

सध्या जिल्ह्यात खरीप हंगामासह ऊस पिकांना वाढीसाठी खतांची आवश्यकता आहे. त्यामुळे खतांची खरेदी करण्यासाठी शेतकरी कृषी सेवा केंद्राकडे धाव घेतो. परंतु खतांची उपलब्धता कमी असल्याने शेतकऱ्यांना खत मिळत नसल्याने रिकाम्या हाताने परतावे लागते. वेळेत खतांची उपलब्धता झाली नाही, पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे खते वेळेत उपलब्ध करावे, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत.

दरम्यान, जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाशी संपर्क केला असता, संबंधित अधिकारी म्हणाले, की आम्ही खरीप हंगामातील खतांचे ८० टक्के वितरण केले आहे. सध्या खतांची कमतरता नाही. कृषी सेवा केंद्राकडे खतांबाबत माहिती घेतली असता, कृषी दुकानदार म्हणाले, रेल्वेच्या माध्यमातून खतांची रॅक येत नाहीत. त्यामुळे अजूनही वाहतूक व्यवस्था सुस्थितीत नसल्याने त्यामुळे खते येण्यास विलंब होत असल्याने काही प्रमाणात खतांचा तुटवडा जाणवतो आहे. त्यामुळे नक्की काय प्रकार आहे, याची शहानिशा होणे आवश्यक असल्याचे दिसते आहे.

सध्या सुगीचे दिवस आहेत. पिकांना खताची मात्रा देणे फार गरजेचे आहे. परंतु खतांची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे वेळेत खते मिळत नाहीत.   - संदीप पाटील, गोटखिंडी, ता. वाळवा

आमच्या परिसरात आम्हाला हवी ती खते उपलब्ध होत असून बिले ही दिली जात आहेत. त्यामुळे आमच्याकडे खतांची कमतरता नाही. - विनायक पाटील, शिरढोण, ता. कवठेमहांकाळ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com