agriculture news in marathi Lack of funds for well, micro irrigation schemes in Jalgaon ‘ZP’ | Agrowon

जळगाव ‘जि.प.’त विहीर, सूक्ष्मसिंचन योजनांसाठी निधीचा अभाव

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 जानेवारी 2021

जळगाव ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे विहीर, सूक्ष्मसिंचन, वीजजोडणी, कृषिपंप यांचे पॅकेज किंवा अभिसरण करून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सूक्ष्मसिंचन योजना मागासवर्गीय व अनुसूचित जमाती संवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत होती. परंतु यंदा या योजनेसाठी निधी नसल्याची माहिती आहे. 

जळगाव ः जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे विहीर, सूक्ष्मसिंचन, वीजजोडणी, कृषिपंप यांचे पॅकेज किंवा अभिसरण करून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सूक्ष्मसिंचन योजना मागासवर्गीय व अनुसूचित जमाती संवर्गातील शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत होती. परंतु यंदा या योजनेसाठी निधी नसल्याची माहिती आहे. 

तीन वर्षे ही योजना राबविण्यात आली. यातून लाभार्थी शेतकऱ्याला विहिरीसोबत सूक्ष्मसिंचन संच, कृषिपंप व वीज संयोजन किंवा वीज जोडणी उपलब्ध करून दिली जात होती. या योजनेस आदिवासी क्षेत्रातील चोपडा, रावेर, यावल, जामनेर आदी भागातूनही प्रतिसाद मिळत होता. या योजनेसाठी दोन वर्षे निधी वाढवून मिळाला.

राज्य शासन जिल्हा नियोजन समितीद्वारे निधी उपलब्ध करून देत होते. त्यासाठी शासनाने ऑनलाइन अर्ज मागविले होते. दोन्ही योजनांसाठी मिळून सलग दोन वर्षे पाच कोटी रुपयांवर निधी प्राप्त झाला. सुमारे ५०० शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोचविता आली. मध्यंतरी पाण्याचा अतिउपसा, दुष्काळी क्षेत्रातील गावांमधील लाभार्थींना या योजनेसंबंधी वीज संयोजन देण्यास वीज कंपनीने नकारले.  या योजनेसाठी गेल्या वर्षी निधी उपलब्ध करून देण्यात आला नाही. 

सदस्यांकडून नाराजी व्यक्त

विविध योजना पॅकेज स्वरूपात या योजनांमधून राबविल्या जात होत्या. जुन्या विहिरींची दुरुस्तीदेखील करण्याची कार्यवाही या योजनांमधून करण्याची तरतूद होती. परंतु, योजनांसाठी वित्तीय तरतूद नसल्याने जिल्हा परिषदेतील सदस्यांनीदेखील नाराजी व्यक्त केली.


इतर बातम्या
केंद्र सरकारकडून कृषी कायदांना...नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी...
जळगावात हरभरा आला कापणीलाजळगाव ः जिल्ह्यात रब्बीची पेरणी २००...
प्रदर्शनातील कृषी ज्ञानाचा खजाना पाहून...माळेगाव, जि. पुणे ः कृषिक २०२१- कृषी तंत्रज्ञान...
पुणे विभागात उसाच्या ५५ टक्के लागवडीपुणे ः यंदा पावसाळ्यात झालेल्या दमदार पावसामुळे...
देवना साठवण तलावाचा प्रलंबित प्रश्न...नाशिक : येवला तालुक्यातील अवर्षणप्रवण उत्तरपूर्व...
‘बर्ड फ्लू’ रोखण्यासाठी ९० दिवस...परभणी ः जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार आणि संसर्ग...
ग्रामसभांना ३१ मार्चपर्यंत परवानगी...अकोला : राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये कोविड-१९च्या...
अतिवृष्टीचा मदत आठवड्यात मिळणारसोलापूर : गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
महावितरणच्या आदेशामुळे वीज ग्राहक...सोलापूर : कोरोनाच्या साथीमुळे घटलेले आर्थिक...
भंडारा जळीत प्रकरणाचा अहवाल शासनाकडे नागपूर : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील शिशू...
उन्हाळी सोयाबीन लागवडीस गतीअकोला : यंदाच्या खरीप सोयाबीन काढणीच्या वेळेस...
वारणेत उभारणार पशुवैद्यकीय महाविद्यालय...वारणानगर, जि. कोल्हापूर : येथील वारणा सहकारी...
राज्यात साडेचार लाख क्‍विंटल मका...औरंगाबाद : बंद पडलेली मका खरेदी जवळपास एका...
यवतमाळ : पोल्ट्रीत चार हजार कोंबड्यांचा...यवतमाळ : कोरोनाच्या संकटातून सावरू पाहणाऱ्या...
शेतकऱ्यांच्या भूमिकेवर न्यायालयाची...नवी दिल्ली ः कृषी कायद्यांवरून निर्माण झालेल्या...
तूर खरेदीसाठी जिल्हानिहाय उत्पादकता...परभणी ः केंद्र शासनाच्या किमान आधारभूत किंमत...
कांदा निर्यातदारांसाठी आता ‘ओनियन नेट’ नागपूर : कांदा उत्पादनाच्या बाबतीत जागतीक स्तरावर...
खानदेशात गारठा वाढला पुणे ः उत्तर भारतातील काही राज्यात थंडीची लाट आली...
खानदेशातून थंडी गायबजळगाव ः खानदेशात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
परभणी जिल्ह्यात रब्बीत २४.०६ टक्के...परभणी ः जिल्ह्यात यंदाच्या रब्बी हंगामात...