agriculture news in marathi Lack of godown maize in Khandesh Possibility of delay in purchase | Agrowon

खानदेशात गोदामांअभावी मका खरेदीला विलंब लागण्याची शक्यता

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

जळगाव  ः खानदेशात मक्‍याच्या शासकीय केंद्रातील विक्रीसंबंधीच्या ऑनलाइन नोंदणीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, प्रशासनाकडून गोदामांची व्यवस्था अद्याप झालेली नाही. यामुळे खरेदी सुरू होण्यासंबंधी विलंब लागू शकतो, अशी स्थिती आहे. 

जळगाव  ः खानदेशात मक्‍याच्या शासकीय केंद्रातील विक्रीसंबंधीच्या ऑनलाइन नोंदणीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परंतु, प्रशासनाकडून गोदामांची व्यवस्था अद्याप झालेली नाही. यामुळे खरेदी सुरू होण्यासंबंधी विलंब लागू शकतो, अशी स्थिती आहे. 

शासनाच्या निर्देशानुसार मका, ज्वारी खरेदीसंबंधी शेतकऱ्यांकडून ऑनलाईन नोंदणी शासकीय केंद्रात सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात सर्व १५ तालुक्‍यांमध्ये खरेदी होणार आहे. तर, धुळे व नंदुरबारातही मिळून सात केंद्र असतील. ज्वारीला २५५०, तर मक्‍याला १७६० रुपये प्रतिक्विंटलचा दर हमीभावानुसार मिळेल. सध्या बाजारात लूट सुरू असून, मक्‍याची किमान ११०० ते कमाल १३०० रुपये प्रतिक्विंटलने खरेदी सुरू आहे. शेतकऱ्यांचे रोज लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. यामुळे शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी सुरू आहे. 

दरम्यान, शासकीय खरेदी गोदामे उपलब्ध झाल्याशिवाय सुरू होवू शकत नाही. अद्याप जळगाव, धुळे भागात गोदामे उपलब्ध झालेली नाहीत. ही जबाबदारी तहसिल प्रशासनाची आहे. तहसीलदारांकडे याबाबत जळगाव व इतर भागातील केंद्रधारक संस्थांनी पत्रव्यवहार केला आहे. परंतु, तहसिलदार यांच्याकडून प्रतिसाद नाही. 

सध्या हरभरा खरेदी सुरू आहे. ही खरेदी किमान १२ जूनपर्यंत सुरू राहील. मका खरेदी १२ जूननंतर सुरू होईल, असेही दबक्‍या आवाजात काही केंद्रधारक संस्था सांगत आहेत. परंतु, मका खरेदी १ जूनपासून सुरू करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यासंदर्भात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दखल घ्यावी, असा मुद्दा शेतकरी ज्ञानेश्‍वर चौधरी (आव्हाणे, ता.जळगाव) यांनी उपस्थित केला. 
 

 
 


इतर ताज्या घडामोडी
शैक्षणिक वर्ष जूनपासूनच : मुख्यमंत्री...मुंबई : ‘‘शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते...
राज्यात नवे २४८७ रुग्ण; सध्या ३४,४८०...मुंबई : राज्यात आज दिवसभरात २४८७ नवीन रुग्णांचे...
परवानगी नसलेल्या एचटीबीटी बियाण्यांचा...अमरावती ः घरपोच बियाणे वाटपाच्या माध्यमातून...
लोकांना पूर धोक्‍याची जाणीव करुन द्या ः...भंडारा ः वैनगंगा नदी तसेच इतर नदीकाठावरील खोलगट...
गोंधळी शिवारात ६२ हजारांचा एचटीबीटी...यवतमाळ ः कृषी विभागाच्या पथकाने अमरावती, यवतमाळ...
प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील यंत्रमाग...मालेगाव, जि. नाशिक : ‘‘लॉकडाऊनमुळे यंत्रमागाची...
टोळधाड प्रादुर्भावग्रस्त क्षेत्राला...भंडारा ः भंडारा जिल्ह्यातील टोळधाड...
शेतकऱ्यांनी डिजिटल व्यासपीठाचा वापर...पुणे ः कोरोनामुळे शेतीक्षेत्राचे चित्र बदलणार आहे...
नांदेड जिल्ह्यात पाच हजारावर...नांदेड : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गंत...
विदर्भ राज्य आंदोलन समितीचे ७ जूनला...अकोला ः कोरोनामुळे उद्योगधंदे, व्यापार, शेती,...
‘कुकडी’चे उन्हाळी आवर्तन सहा जूनला...नगर : ‘कुकडी’च्या उन्हाळी आवर्तनासाठी पुणे येथे...
नगर अर्बन बॅंकेला चाळीस लाखांचा दंडनगर : नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बॅंकेला रिझर्व्ह...
नांदेडमधील कापूस संशोधन केंद्रात...नांदेड : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
‘सोयाबीन लागवड तंत्रज्ञान व प्रक्रिये’...परभणी : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील...
दोन वाहनांतील कापूस घेण्याचे आदेश द्या...परभणी : भारतीय कापूस महामंडळाच्या (सीसीआय) मानवत...
दुग्ध व्यवसायाने घराला आधारशेतीपूरक व्यवसायामध्ये दुग्ध व्यवसाय पूर्वीपासूनच...
पंतप्रधान मोदी यांच्याकडून संशोधक...नाशिक : जिल्ह्यातील वऱ्हाणे (ता.बागलाण) येथील...
ग्रामविकास विभागामार्फत मोफत आर्सेनिक...कोल्हापूर  : नागरिकांची रोगप्रतिकारक शक्ती...
कापसाच्या वाती करून शासनाची आरती...अमरावती  ः पूर्व विदर्भातील पांढऱ्या...
एचटीबीटीबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा...नागपूर  ः एचटीबीटीचा विषय केंद्र सरकारच्या...