Agriculture news in Marathi Lack of grants will benefit limited beneficiaries | Page 2 ||| Agrowon

अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना मिळणार लाभ

टीम अॅग्रोवन
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या बजेटला ५० कात्री लावली आहे. त्याचा परिणाम वैयक्तिक लाभांच्या योजनावर होणार असून अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना लाभ मिळणार असल्याची खंत पशुसंवर्धन समिती सभापती तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी दिली.

सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या बजेटला ५० कात्री लावली आहे. त्याचा परिणाम वैयक्तिक लाभांच्या योजनावर होणार असून अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना लाभ मिळणार असल्याची खंत पशुसंवर्धन समिती सभापती तथा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी दिली.

जिल्हा परिषद पशुसंवर्धन समितीची सभा श्री. म्हापसेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेत समिती सदस्या स्वरूपा विखाळे यांनी पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक लाभांच्या योजनांचा जिल्ह्यातील किती शेतकऱ्यांना लाभ मिळणार असा प्रश्न उपस्थित केला. त्यावेळी श्री. म्हापसेकर यांनी कृषी आणि पशुसंवर्धन हे दोन्ही विभाग शेतकऱ्यांशी निगडीत आहेत. त्यामुळे या दोन्ही विभागाचे बजेट पूर्वीप्रमाणे कायम ठेवावे, अशी मागणी करण्यात आली होती. प्रत्यक्षात जिल्हा परिषदेच्या संपूर्ण बजेटलाच ५० टक्के कात्री लावण्यात आली आहे.

पशुसंवर्धन विभागाला देखील ५० टक्केच निधी मिळणार आहे. वैयक्तिक लाभांचे ढीगभर प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत. परंतु निधी अभावी मर्यादित लाभार्थ्यांना लाभ देता येणार आहे. वैयक्तिक लाभाचे प्रस्ताव निश्चित करण्यात आलेले नाहीत. १५ ऑक्टोबर पूर्वी लाभार्थी निवड करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या सभेत १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात आलेल्या राष्ट्रीय लसीकरण मोहिमेचा आढावा घेण्यात आला. पशुसंवर्धन विभागात जिल्ह्यात ज्या ठिकाणी रिक्त पदे आहेत. त्याठिकाणी कंत्राटी पद्धतीने खासगी सेवा देणारे डॉक्टर किंवा निवृत्त डॉक्टर घेण्यास परवानगी मिळाली असून एका जनावरांच्या टॅगिंगला ५ रुपये शासन देणार आहे. ३० सप्टेंबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. दिलीप शिंपी यांनी सभेत दिली.


इतर ताज्या घडामोडी
काजूसाठी हवामान आधारित फळपीक विमा योजना...ही योजना काजू पीक विम्यासाठी अधिसूचित कोल्हापूर,...
नाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
संरक्षित शेतीचे महत्त्वसंरक्षित शेतीमध्ये हरितगृह किंवा शेडनेटगृहाचा...
पोषक आहारासाठी बियाणे स्वावलंबन...येत्या काळात कमी पाण्यावर येणारी पिके बाजरी,...
सब्जा बियांचे आरोग्यदायी फायदे सब्जामध्ये प्रथिने तसेच आरोग्याच्या दृष्टीने...
सांगली जिल्ह्यातील भाजीपाला पिके...सांगली ः सांगली जिल्ह्याची ओळख भाजीपाला...
सणासुदीत निष्काळजीपणा नको ः पंतप्रधान...नवी दिल्ली ः देशातील लॉकडाउन संपला तरी कोरोनाचा...
कांदा बियाण्यांचा काळाबाजार सुरूचनाशिक : मागील वर्षी उन्हाळ कांदा बीजोत्पादनावेळी...
लाचखोर तलाठ्यास कारावासवर्धा : सातबारावरील चूक दुरुस्तीसाठी पंधरा...
‘गोकूळ’ देणार दूध संस्‍थांना दरफरकापोटी...कोल्‍हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध...
केंद्राने महाराष्ट्राच्या हक्काचे ३०...मुंबई : कोरोना संकटामुळे महाराष्ट्रासमोर आर्थिक...
बिहारला मदत, मग महाराष्ट्राला का नाही?...मंगळवेढा, जि. सोलापूर : केंद्र शासनाने बिहारमध्ये...
शेतकऱ्यांशी सरकारला देणेघेणे नाही ः...करमाळा, जि. सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे...
पिकांचे पंचनामे करून प्रस्ताव तातडीने...सोलापूर : नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या जीवनाला...
सोलापूर जिल्ह्यातील तब्बल ७५ महसूल...सोलापूर :  जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा...
सांगली जिल्ह्यात कृष्णाकाठावरील कृषिपंप...सांगली : जिल्ह्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली...
रत्नागिरीत भातशेतीवर अस्मानी संकटरत्नागिरी : ‘‘ऑक्टोबर महिन्यातील मुसळधार...
नाशिक जिल्ह्यात मका विक्रीत...येवला, जि. नाशिक : सध्या बाजार समित्यांसह खासगी...
नुकसानपातळी अधिक, केंद्रानेही मदत करावी...नाशिक : ‘‘परतीच्या पावसामुळे कापणी योग्य झालेली...
रिसोड तालुक्यात सोयाबीनची हेक्टरी अडीच...रिसोड, जि. वाशीम ः  सततच्या पावसाने सोयाबीन...