Agriculture news in marathi Lack of manpower for onion harvesting, harvesting delayed | Agrowon

कांदा काढणीसाठी मनुष्यबळाची टंचाई, काढणी लांबणीवर 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 30 एप्रिल 2020

नाशिक : जिल्ह्यातील कांदा उत्पादक पट्ट्यात १ लाख ७१ हजार ३९० उन्हाळ कांदा लागवड झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे क्षेत्र ६९ हेक्टरने वाढलेले आहे. आता सध्या उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे मनुष्यबळाची टंचाई असल्याने कांदा काढणीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी कांदा काढणीसाठी तयार होऊन पडून आहे. काहीजण अधिक पैसे देऊन तर काही तर ठिकाणी घरच्या घरी काढणीवर भर दिला जात आहे. 

नाशिक : जिल्ह्यातील कांदा उत्पादक पट्ट्यात १ लाख ७१ हजार ३९० उन्हाळ कांदा लागवड झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत हे क्षेत्र ६९ हेक्टरने वाढलेले आहे. आता सध्या उन्हाळी कांदा काढणीचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, लॉकडाऊनमुळे मनुष्यबळाची टंचाई असल्याने कांदा काढणीसाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे काही ठिकाणी कांदा काढणीसाठी तयार होऊन पडून आहे. काहीजण अधिक पैसे देऊन तर काही तर ठिकाणी घरच्या घरी काढणीवर भर दिला जात आहे. 

नाशिक जिल्ह्यात प्रामुख्याने कळवण, सटाणा, देवळा, मालेगाव, येवला, निफाड, सिन्नर, चांदवड या तालुक्यामध्ये कांद्याच्या लागवडी मोठ्या प्रमाणावर आहेत. दरवर्षी गुजरात व मध्य प्रदेशच्या सीमाभागातील मजुरांसह जिल्ह्यातील आदिवासी भागातील २० हजारांहून अधिक शेतमजूर कांदा काढणीसाठी दाखल होत असतात. मात्र, लॉकडाऊन झाल्याने दरवर्षी सहज उपलब्ध होणारे मनुष्यबळ उपलब्ध होईना. त्यामुळे एवढे येथेच स्थिरावलेले अवघे ५ टक्के मजूर शेतात दिसत आहेत. 

मागील वर्षी पाण्याची अडचण असल्याने कांदा लागवडी मर्यादित होत्या. मात्र, चालू वर्षी पाणी उपलब्ध असल्याने लागवडी वाढल्या. मात्र, चालू वर्षी काढणीसाठी मनुष्यबळाची कमतरता व वाढलेले काढणी दर शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे अधिक वेळ व पैसा खर्च न करता घरच्या घरी काढणीवर अनेकांनी जोर दिला आहे. 

या आहेत प्रमुख अडचणी 

  • उन्हाळ्याचे दिवस असल्याने कांदा पात खराब 
  • लागवडीखालील क्षेत्र वाढले, त्या तुलनेत मजूर उपलब्ध नाही 
  • काही ठिकाणी मजूरांना बाहेर कामासाठी जाण्यास अडचणी 
  • संचारबंदी असल्याने मजूर वाहतुकीत अडथळा 
  • कोरोनाची मजुरांमध्ये भीती कायम 

मजूर नसल्याने स्थानिक मजुरांकडून काढणी सुरू आहे. कोरोनामुळे संचारबंदीमुळे मजूर मिळत नाहीत. त्यामुळे कामाचे नियोजन कोलमडले. मजुरांचे दर वाढले आहेत. म्हणून शेतकरी आपल्या बायका मुंलासह शिवारात कांदा काढणी करताना दिसत आहे. 
- कुबेर जाधव, कांदा उत्पादक, विठेवाडी, ता. देवळा 

कांदा काढणीसाठी मजुरांच्या टोळ्या उपलब्ध नसल्याने जास्त पैसे देऊन कांदा काढावा लागला. यावर्षी उत्पादन खर्च वाढून गेला आहे. कोरोनामुळे नियमित कामे अडचणीत सापडल्याने अडचणींचा सामना करावा लागला. 
- ज्ञानेश्वर कांगुणे, कांदा उत्पादक, दरसवाडी, ता. चांदवड 
 


इतर ताज्या घडामोडी
दहा हजाराची लाच स्वीकारणारा हुलजंतीचा...सोलापूर ः खरेदी केलेल्या जमीन दस्तावर दाखल...
`जतमध्ये मूग, उडीद खरेदी केंद्र सुरू...सांगली :जिल्ह्यात मूग व उडीद हमीभावाने खरेदी...
सांगलीत २८ टक्क्यांवरच ऊस लागवडसांगली :  जिल्ह्यात गेल्या आठवड्यापूर्वी...
खानदेशातील बाजारात उडदाच्या आवकेत घटजळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
नाशिकमध्ये खासदारांच्या घरासमोर  'राख...नाशिक : केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने...
नगर जिल्ह्यात कांदा बियाणे गरज,...नगर ः जिल्ह्यात दरवर्षी सुमारे एक लाख...
अकोटमध्ये अतिवृष्टीने कपाशी पाण्याखालीअकोला ः आजवर झालेल्या सततच्या पावसाने अकोट...
बुलडाण्यातील नुकसानीचे पंचनामे करून...बुलडाणा : पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे...
सातगाव पठारावर नुकसानग्रस्त बटाट्याचे...पुणे :‘‘लांबलेला मॉन्सून, सततचा कोसळणारा वादळी...
गाव पातळीवरील बैठका, सभा तात्पुरती...अकोला ः कोवीड १९ च्या वाढत्या प्रभावामुळे गाव...
नोकर भरतीची वयोमर्यादा वाढवाः...चंद्रपूर : कोरोना संकटामुळे या वर्षात नोकरीकरता...
लातूर, उस्मानाबादेत एक लाख ४१ हजार...उस्मानाबाद / लातूर : लातूर व उस्मानाबाद...
औरंगाबाद, जालन्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : बीड, लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेड...
मजुरांना कष्टाचे तरी पैसे मिळावेत नगर ः राज्यातील साखर कारखान्यांची तब्बल ८० हजार...
पोषक चाऱ्यासाठी ओट लागवडजनावरांच्या हिरव्या चाऱ्यासाठी अधिक पोषणमूल्य...
राज्यात सोयाबीन २५०० ते ३९७४ रुपये नगरमध्ये ३००० ते ३७०० रुपये  नगर येथील...
कोरडवाहू क्षेत्रातील रब्बी पीक नियोजनकोरडवाहू  भागातील जमिनीतील ओलावा हा...
हरभऱ्याच्या अधिक उत्पादनासाठी फुले...महात्मा फुले कृषि विदयापिठाने कंबाईन हार्वेस्टरने...
मानवी आहारासाठी पोषणयुक्त जैवसंपृक्त वाणजैवसंपृक्त पिकांची लागवड केल्यास पौष्टिक व...
सामूहिकपणे शंखी गोगलगायींचे नियंत्रण...शंखी गोगलगायी जून ते सप्टेंबर या कालावधीत जास्त...