agriculture news in marathi Lack of provision did not provide the benefit of ‘micro-irrigation’ | Agrowon

जळगाव : कमी तरतुदींमुळे ‘सूक्ष्मसिंचन’चा लाभ मिळेना

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 डिसेंबर 2020

जळगाव  ः थेट अनुदान (डीबीटी) लागू असतानाच कमी लक्ष्यांक किंवा अल्प तरतुदीमुळे जिल्हा परिषदेच्या कृषी योजनेतून एचडीपीई पाइप योजनेपासून अनेक अर्जदारांना वंचित राहावे लागेल, अशी स्थिती आहे. 

जळगाव  ः थेट अनुदान (डीबीटी) लागू असतानाच कमी लक्ष्यांक किंवा अल्प तरतुदीमुळे जिल्हा परिषदेच्या कृषी योजनेतून एचडीपीई पाइप योजनेपासून अनेक अर्जदारांना वंचित राहावे लागेल, अशी स्थिती आहे. 

डीबीटी लागू केल्याने कृषी योजनेतून एचडीपीई पाइप घेण्यासाठी शेतकऱ्यांना कृषी विभागातील संबंधितांची परवानगी घ्यावी लागते. यानंतर निर्देशित कंपनीच्या पाईपची खरेदी बाजारातून करावी लागते. खरेदीनंतर पूर्वसमतीची कागदपत्रे, बिले व अनुदानाचा प्रस्ताव पंचायत समितीकडे सादर करावा लागतो. यानंतर पुढे अनुदान मिळते. या अनुदानासाठीची तरतूद मात्र कमी आहे.

डीबीटीमुळे शेतकऱ्यांना लागणारा सर्व निधी एकाचवेळी खर्च करावा लागतो. त्यात अनुदान कमी असल्याने ते मर्जीतल्या मंडळीला लवकर मिळते. खऱ्या लाभार्थींना अनेकदा अनुदानासाठी कार्यालयांचे खेटे घालावे लागतात. 

जिल्हा परिषदेने २०२०-२१ साठी दीड कोटी रुपयांची तरतूद कृषी योजनांसाठी स्वनिधीतून केली होती. स्वनिधी म्हणजेच स्वः उत्पन्नातून ही तरतूद केली आहे. परंतु, कोरोना व नंतरची वित्तीय संकटे, यामुळे जिल्हा परिषदेच्या स्वनिधीसंबंधी अडचणी आहेत. यामुळे या योजनेतून यंदा फक्त २० ते २२ लाभार्थीच कव्हर करता येतील, अशी स्थिती आहे. 

एका लाभार्थीला सुमारे ११ हजार रुपये अनुदान ३० पाइपसाठी मिळते. बाजारात एक २० फुटाचा एचडीपीई पाइप १००० ते ११०० रुपयांना मिळतो. अर्थातच ३० पाइप किमान ३० हजार रुपयात मिळतात. यामुळे निम्मे अनुदानही मिळत नाही, असे दिसत आहे. यातच जिल्ह्यात १५ तालुके आहेत. एका तालुक्यात किमान पाच लाभार्थींना अनुदान मिळणे अपेक्षित आहे. यामुळे तरतूद वाढविण्याची गरज आहे. ही गरज लक्षात घेता कृषी समितीच्या विशेष सभेत याबाबत चर्चा करून निर्णय प्रक्रिया राबविण्याची मागणीदेखील केली जात आहे. 

अनुदानाचे वितरण रखडत 

या योजनेसंबंधी अर्ज दाखल करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. कृषी विभागाला जे अनुदान या वर्षी मंजूर अर्थसंकल्पात जाहीर झाले. त्यातील अनुदानाचे वितरणही रखडत सुरू आहे. अनुदानाचा खर्च एचडीपीई पाइप व्यतिरिक्त ट्रॅक्टर, अवजारे, फवारणीचे पंप, कृषिपंप आदी योजनांवरही केला जाईल. या स्थितीत खर्च करताना एचडीपीई पाइप योजनेवर अधिक भर देणे गरजेचे आहे, अशी अपेक्षा सदस्य प्रताप पाटील केली.


इतर ताज्या घडामोडी
शाश्‍वत कापूस उत्पादन तंत्रज्ञान अवगत...अकोला ः कापूस हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. या...
अकोल्यात ५५ हजार हेक्टरला तडाखाअकोला ः गेल्या आठवड्यात जिल्ह्यात ५२ पैकी ३५...
रत्नागिरीत हजार हेक्टर भातक्षेत्र...रत्नागिरी : अतिवृष्टीमुळे मोठ्या नद्यांना आलेल्या...
सांगलीत ३३ हजार हेक्टर पिकांचे नुकसानसांगली : जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून...
खानदेशात पंधरा हजार हेक्टर बाजरीची...जळगाव : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि...
नाशिक बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे...नाशिक : नाशिक बाजार समितीसंदर्भात शासनाकडे...
खानदेशात हलक्या सरी; जोरदार पावसाचा अभावजळगाव : खानदेशात यंदा पाऊसमान अद्याप कमी आहे....
नांदेड जिल्ह्यात पीकविमा योजनेत नऊ लाख...नांदेड : पंतप्रधान पीक विमा योजनेत शेतकऱ्यांनी...
मराठवाड्यातील पशुविज्ञान केंद्राचे घोडे...परभणी ः भारतीय कृषी संशोधन परिषदेने महाराष्ट्र...
परभणी जिल्ह्यात भाजीपाला पिकांची नासाडीपरभणी ः अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेकडो एकरवरील...
पैसे थकवणाऱ्या व्यापाऱ्यांचे लिलाव बंद...सोलापूर ः शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या पट्ट्या...
पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या...
पीकविम्यासाठी स्वाभिमानीचा कृषी...पुणे : पीकविमा योजनेतील गेल्या खरिपाची नुकसान...
नगरमध्ये खरीप पेरण्यांनी सरासरी ओलांडली नगर : नगर जिल्ह्यात खरिपाच्या पेरण्यांनी सरासरी...
`लातूरला शेतकऱ्यांनी भरला २३ कोटीचा...लातूर : ‘‘पंतप्रधान खरीप पीक विमा २०२१...
नियमित कर्जदार शेतकऱ्यांना  मिळणार...गोंदिया : राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड...
सातारा : पाच हजार हेक्टर क्षेत्र ...सातारा : जिल्ह्यात मागील आठवड्यात झालेल्या...
सांगलीतील पूर ओसरू लागला  सांगली : कृष्णा नदीला आलेल्या महापुराचा सांगली...
सिंधुदुर्गमध्ये नुकसानीचे पंचनामे सुरू सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या...
पुराचा वारंवार फटका बसणाऱ्या घरांच्या...सांगली : ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना...