पुणे विभागात पावसाअभावी चाराटंचाई कायम

पावसाअभावी चाराटंचाई कायम
पावसाअभावी चाराटंचाई कायम

पुणे ः पावसाळ्याचे तीन महिने पूर्ण होत आले आहे. तरी अजूनही बहुतांशी भागात अजूनही दमदार पाऊस पडलेला नाही. यामुळे चारा पिकांच्या पुरेशा प्रमाणात पेरण्या होऊ शकलेल्या नाहीत. परिणामी, अजूनही चाराटंचाई कायम आहे. पावसाअभावी अवघ्या एक लाख तीन हजार ३३८ हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली आहे. त्यामुळे उत्पादन घट होणार असून पुढील काही महिने चाऱ्यांचा प्रश्न कायम राहण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यात चारा उपलब्ध होण्यासाठी दरवर्षी मे, जून आणि जुलै महिन्यांत चारा उपलब्ध होण्यासाठी उन्हाळी हंगामात मार्च महिन्यांत मका, कडवळ, लुसर्नग्रास, नेपिअरग्रास, बाजरी अशा विविध चारा पिकांची लागवड करतात. चारा पिकांच्या लागवडीनंतर साधारणपणे दोन ते तीन महिन्यांनंतर चाऱ्यांचे उत्पादन होते. त्यामुळे उन्हाळ्याच्या अखेरीस व पावसाळ्याच्या तोंडावर चाराटंचाई कमी होण्यास मदत होत होते. मात्र, यंदा पाणीटंचाईमुळे उन्हाळ्यात पुरेशा प्रमाणात चारा पिकांची लागवड होऊ शकली नाही. 

यामुळे जून, जुलैमध्ये चाऱ्यांची मोठी टंचाई भेडसावू लागल्याने अजूनही विभागात चारा छावण्या सुरू ठेवण्याची नामुष्की सरकारवर आली होती. खरीप हंगामात नगर जिल्ह्यात ६७ हजार ५८८ हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली. यामध्ये संगमनेरमध्ये सर्वाधिक चारा पिकांची लागवड झाली आहे. त्यानंतर नेवासा, राहुरी, कोपरगाव, कर्जत, नगर, श्रीगोंदा, पाथर्डी, संगमनेर या तालुक्यांत चारा पिकांची लागवड झाली आहे. तर पाणीटंचाईमुळे अकोले, शेवगाव, श्रीरामपूर, पारनेरमध्ये चारा पिकांची अल्प प्रमाणात लागवड झाली आहे. त्यामुळे या भागात चाराटंचाई चांगलीच भेडसावण्याची शक्यता आहे. 

पुणे जिल्ह्यात अवघ्या २१ हजार ७०६ हेक्टरवर चारा पिकांची लागवड झाली आहे. यामध्ये आंबेगाव तालुक्यात सर्वाधिक पाच हजार ६४७ हेक्टरवर लागवड झाली आहे. तर हवेली, शिरूर, बारामती, इंदापूर, पुरंदर या तालुक्यांत अत्यल्प प्रमाणात चारा पिकांची लागवड झाली आहे. तर  मुळशी, मावळ, जुन्नर, वेल्हे, भोर तालुक्यांत चारा पिकांची लागवड झालेली नाही.

सोलापुरात सर्वात कमी क्षेत्र सोलापूर जिल्ह्यात सर्वात कमी क्षेत्रावर चारा पिकांची लागवड झाली आहे. जिल्ह्यात अवघ्या १४ हजार ४४ हेक्टरवर लागवड झाली आहे. जिल्ह्यात दक्षिण सोलापूर, माढा, करमाळा, पंढरपूर, माळशिरस तालुक्यांत कमी क्षेत्रावर लागवड झाली आहे. तर उत्तर सोलापूर, बार्शी, मोहोळ, मंगळवेढा तालुक्यांत अत्यंत कमी क्षेत्रावर लागवड झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com