विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना मोठा फटका

लॉकडाउनमुळे अनेक बाजार समित्या बंद झाल्या. विक्री होऊ शकली नाही. त्यात प्रचंड प्रमाणात घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लिंबू कोणत्या मार्केटमध्ये पाठवायची, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.
 Lack of sales hits lemon growers in Malwandi
Lack of sales hits lemon growers in Malwandi

मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी येथे जवळपास दीड - दोनशे एकर क्षेत्रावर लिंबू बागा आहेत. त्याचा हंगाम चालू झाल्याने लिंबाचे जास्त प्रमाणात उत्पन्न झाले. मात्र, लॉकडाउनमुळे अनेक बाजार समित्या बंद झाल्या. विक्री होऊ शकली नाही. त्यात प्रचंड प्रमाणात घट झाली. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. लिंबू कोणत्या मार्केटमध्ये पाठवायची, हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

मागील वर्षी दुष्काळ असल्याने शेतकऱ्यांनी बागेला बोर मारुन व टॅंकरद्वारे पाणीपुरवठा केला. साधारण मार्च महिन्यापासून लिंबाला बाजारात मोठ्या प्रमाणात मागणी असते. लिंबांना भाव न मिळाल्याने चालू बाग तोडून शेतकरी द्राक्ष बागांची लागवड करू लागले आहेत. बहुतांश शेतकरी लिंबू विक्रिसाठी पुण्यातील बाजार समितीत पाठवतात. मात्र हॉटेल, मेस बंद असल्याने लिंबाची खरेदी होत नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. मागील वर्षी १८ ते २० किलोची गोणी १ एक हजार ते १३०० रूपयांपर्यंत विक्री झाली. मात्र यावर्षी फक्त सत्तर ते ८० रूपयांना विक्री होत आहे.

मागील वर्षी दुष्काळाचे संकट आणि यावर्षी कोरोनाचे संकट, यामुळे लिंबू बागेचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकारने सरसकट फळबाग नुकसान भरपाई दिली. तरच, शेतकरी उभा राहील. - महेश साखरे, लिंबू उत्पादक शेतकरी. 

हंगामात एकरी चार ते पाच लाख रुपयांचे उत्पन्न होते. सध्या गावात व्यापारी लिंबू खरेदी करतात व हैद्राबादला पाठवतात. पुण्यामध्ये लिंबू पाठवायला परवडत नाही.  - संजय चव्हाण, शेतकरी, मालवंडी

हॉटेल, मेस, लाहान- मोठे मार्केट बंद असल्याने लिंबू विक्री होत नाही. लोणचे करण्यासाठी लिंबू खरेदी करतात. पण, लोणचे विकले गेले नाही. तसेच शिल्लक आहे. आता १० ते १५ पैशाला लिंबू विक्री होत आहे. - रोहन जाधव, अडते, गुलटेकडी मार्केट यार्ड, पुणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com