दुष्काळाबाबत प्रशासनात गंभीरतेचा अभाव

दुष्काळाबाबत प्रशासनात गंभीरतेचा अभाव
दुष्काळाबाबत प्रशासनात गंभीरतेचा अभाव

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता वरचेवर वाढतेच आहे. पण प्रशासनाकडून मात्र त्यावर उपाययोजनेच्या दृष्टीने कोणतीच पावले उचलली जात नसल्याने शेतकऱ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. सध्या ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे हाल सुरू आहेत. ना चारा, ना पाणी अशी स्थिती आहे. कोणत्याच सोयीसुविधांबाबत प्रशासन अद्यापही गांभीर्याने घेत नसल्याचे चित्र आहे. 

जिल्ह्यात यंदा सरासरीच्या केवळ ३८ टक्केच पाऊस झाला. जिल्ह्यातील ९१ महसूल मंडळांपैकी ८९ मंडळांचा समावेश दुष्काळात झाला. दुष्काळाची घोषणा होऊन दीड-दोन महिन्यांचा कालावधी उलटला. मात्र चाऱ्यासाठी बियाणे वाटपाच्या कार्यक्रमापुढे प्रशासन अद्यापही सरकले नसल्याचे दिसून येते.

जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा सध्या गंभीर प्रश्न आहे. यंदा ५४० टॅंकर आणि २१७ छावण्या लागतील, या दृष्टीने नियोजन आखण्यात आले. पण त्याचा अद्यापही ठावठिकाणा नाही. रब्बी ज्वारीचे कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यात यंदा फक्त २० टक्‍के पेरणी झाली आहे. पेरलेली ज्वारीही आता जळून गेली आहे. त्यातच जिल्ह्याबाहेर चारा विकण्यास बंदी घालण्यात आली आहे. तातडीने उपाययोजना देण्यासाठी दुष्काळ निवारण नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पण तिथे सध्या काय चालू आहे, हे एक कोडेच आहे. 

५५३ गावांतील उसाला हुमणी सोलापूर जिल्ह्यातील ९५ हजार ९२३ शेतकऱ्यांचे ५२ हजार ७९९ हेक्‍टरवरील उसाचे ३३ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नुकसान हुमणीमुळे झाले आहे. जिल्ह्यातील ५५३ गावांमधील उसाला हुमणीचा फटका बसला आहे.

उजनीसह मध्यम प्रकल्पातील साठा राखीव

सोलापूर आणि इतर शहरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातील वीस टीएमसी पाणी राखीव ठेवले आहे. जिल्ह्यातील आठ मध्यम आणि लघू प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा नाही. त्यामुळे या प्रकल्पातील पाणी शेतीसाठी न वापरता पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्यात आले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com