नांदेड जिल्ह्यात जागेअभावी दोन केंद्रांवरील कापूस खरेदी बंद

नांदेड : जिल्ह्यातील भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) पाच आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या (फेडरेशन) तीन केंद्रांवर सोमवार (ता.२५) पर्यंत ६ हजार १९२ शेतकऱ्यांच्या १ लाख २३ हजार ३५३ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली.
 Lack of space in Nanded district Cotton purchase stopped at two centers
Lack of space in Nanded district Cotton purchase stopped at two centers

नांदेड : जिल्ह्यातील भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) पाच आणि राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या (फेडरेशन) तीन केंद्रांवर सोमवार (ता.२५) पर्यंत ६ हजार १९२ शेतकऱ्यांच्या १ लाख २३ हजार ३५३ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. 

कापूस टाकण्यासाठी जागा नसल्यामुळे ‘सीसीआय’च्या कुंटूर (ता.नायगाव) येथील तसेच फेडरेशनच्या पोमनाळा (भोकर) येथील, तर ग्रेडरअभावी धर्माबाद येथील कापूस खरेदी बंद आहे. कापूस विक्रीसाठी २५ एप्रिलपर्यंत जिल्ह्यातील २८ हजार १५९ शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. ‘सीसीआय’ची कलदगाव (ता.अर्धापूर), किनवट, नायगाव, कुंटूर (ता.नायगाव), धर्माबाद, बिलोली या ठिकाणी केंद्रे आहेत. 

बिलोली येथील केंद्र कामगार नसल्यामुळे सुरु झालेले नाही. कुटूंर येथील केंद्रावरील जिनिंगची क्षमता कमी आहे. त्यामुळे खरेदी केलेला कापूस टाकण्यासाठी जागा नाही. त्यामुळे खरेदी बंद राहत आहे. कापूस उत्पादक सहकारी पणन महासंघाची तामसा (ता.हदगाव) आणि पोमनाळा (ता.भोकर),भोकर या ठिकाणी केंद्रे आहेत.  केंद्रनिहाय कापूस खरेदी (क्विंटल) 

केंद्र शेतकरी संख्या कापूस 
कलदगाव ६८१ १५११०.९० 
कुंटूर १२६१ १८१२८.५०
नायगाव १३४६ ३१२६१
धर्माबाद ९०१ १३८४२.२५ 
किनवट ३७९ ९१४६.३५ 
तामसा ५२६ १०५२६.७० 
पोमनाळा ९३६ २१५२३.२६ 
भोकर. १६२ ३८१४.२०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com