नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातून (पोकरा) संरक्षित शेतीत वापरल्या जात असलेल्या अनेक घटकांना
अॅग्रो विशेष
वीज जोडणी न देताच कृषीपंपाची लाखोंची वीजबिले ! शेतकरी बसले उपोषणाला
कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील पाच शेतकऱ्यांच्या शेतात शेतीपंप वीज जोडणी न करताच गेल्या सहा वर्षांपासूनचे लाखों रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या माथी लावण्याचे काम ‘महावितरण’ने केले आहे.
नांदेड : कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील पाच शेतकऱ्यांच्या शेतात शेतीपंप वीज जोडणी न करताच गेल्या सहा वर्षांपासूनचे लाखों रुपयांची बिले शेतकऱ्यांच्या माथी लावण्याचे काम ‘महावितरण’ने केले आहे. याबाबत तक्रार करुनही उपयोग झाला नसल्याने शेतकऱ्यांनी ‘महावितरण’च्या कार्यालयापुढे सोमवारपासून (ता. २३) उपोषण सुरु केले आहे.
कुंडलवाडी येथील शेतकरी अशोक रामजी गायकवाड, भूमाबाइ सायलू करेवाड, राजन्ना राजन्ना नागूलवाड, रामलू हूसेना कोटलावार व धनराज हनमंत रत्नागीरे या शेतकऱ्यांनी कृषी पंपासाठी विज मिळावी, यासाठी २०१४ मध्ये महावितरण कंपनीला अर्ज केले होते. यानंतर विद्युत जोडणी झाली नाही. परंतु विजबिल मात्र लाखोंची आली आहेत.
याबाबत महावितरणशी संपर्क केला असता, त्यांनी कनेक्शनचे सर्वे चालू आहे, सर्वे पूर्ण झाले, पुढच्या वर्षी पोल येणार आहेत, सरकार बदलले, ठेकेदार काम करीत नाहीत, असे उत्तरे देण्यात आली आहेत, उत्तर मिळत नसल्याने चौकशी करुन संबंधित अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली. परंतु त्याचाही उपयोग झाला नसल्याने येथील शेतकऱ्यांनी सोमवारपासून महावितरण कंपनीच्या कुंडलवाडी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले आहे.
- 1 of 654
- ››