agriculture news in Marathi ladies finger and chili export from Bhandara Maharashtra | Agrowon

दुर्गम भंडारा जिल्ह्यातून भेंडी, मिरचीची निर्यात 

विनोद इंगोले
रविवार, 10 जानेवारी 2021

मागास अशी ओळख असलेल्या पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्याने भेंडी आणि हिरवी मिरची निर्यातीच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. 

भंडारा ः दुर्गम आणि मागास अशी ओळख असलेल्या पूर्व विदर्भातील भंडारा जिल्ह्याने भेंडी आणि हिरवी मिरची निर्यातीच्या माध्यमातून जागतिक स्तरावर आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. कोरोना लॉकडाउनपूर्वी सुमारे ९२ टन भेंडीची निर्यात भंडारा जिल्ह्यातून आखाती देशांमध्ये करण्यात आली. त्यासोबतच सद्यःस्थितीत जिल्ह्यातून दुबईला मिरचीची निर्यात केली जात आहे. 

धानाचे कोठार अशी भंडाऱ्याची ओळख. कृषी विभागाने २०१८-१९ पासून या भागात पीक फेरपालटासाठी व्यापक अभियान राबविले. त्याला शेतकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत. कधी काळी अवघे अडीच हजार हेक्‍टरचे भाजीपाला क्षेत्र आज तब्बल दहा हजार हेक्‍टरपर्यंत विस्तारले आहे. त्यामध्ये २५० हेक्‍टर क्षेत्रावर भेंडी घेतली जाते. २१० हेक्‍टरच्या आसपास मिरची लागवड आहे. 

शेतकऱ्यांकडून स्थानिक बाजार समितीमध्ये भेंडीची विक्री होते. या बाजारात दर्जानिहाय वर्गीकरण करून व्यापारी मध्य भारतातील इटारसी, जबलपूर, झांशी अशा जिल्ह्यांमध्ये भेंडी पाठवितात. त्यापुढे जात याच भागातील प्रफुल्ल बांडबुचे या युवा निर्यातदाराने या भागात उत्पादित भेंडी आणि मिरची थेट आखाती देशांमध्ये निर्यात करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. कोरोना लॉकडाउनच्या पूर्वी तब्बल ९२ टन भेंडी कतार, कुवेत, दुबई या देशांमध्ये निर्यात करण्यात आली. 

प्रतिक्रिया
धान काढणीनंतर शेती खाली राहते. भेंडीची जानेवारीत लागवड होते. ४० ते ४५ दिवसांत तोडणीस येते. १२० दिवसांचे हे पीक असले तरी काही शेतकरी जूनपर्यंत पीक घेतात. आकाराने लांब असल्यामुळे मागणी अधिक आहे. आजवर ९२ टन निर्यात केली आहे. मिरचीचा हंगाम नोव्हेंबर ते फेब्रुवारी असा असून, दर दिवशी ८०० ते १००० टन मिरची निघते. 
- प्रफुल्ल बांडबुचे, निर्यातदार 

जिल्ह्यात धान १ लाख ७७ हजार हेक्टरवर राहते. २०१८-१९ पर्यंत जिल्ह्यात भाजीपाल्याखाली अडीच हजार हेक्‍टर इतकेच क्षेत्र होते. त्यानंतर कृषी विभागाने पीक बदलावर भर देत जागृती केली. त्याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला. परिणामी, भाजीपाल्याखालील क्षेत्र आज १० हजार हेक्‍टरवर पोचले आहे. भेंडी, टोमॅटो, वांगी, मिरची ही पिके घेतली जातात. लाखनीमध्ये भेंडी, मोहाडीमध्ये टोमॅटो, मिरची, तर तुमसर टोमॅटो तालुक्‍यात टोमॅटो खालील क्षेत्र अधिक आहे. 
- हिंदूराव चव्हाण, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, भंडारा 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आठवडाभर हलक्या पावसाची शक्यतापुणे : कोकणसह राज्यातील काही भागांत पावसाने...
देशात सव्वादोन लाख हेक्टरवर हळद लागवडसांगली ः यंदा देशात हळदीची लागवड अंतिम टप्प्यात...
आयातशुल्क वाढीचा संत्रा निर्यातीवर...अमरावती : संत्र्याचा मुख्य आयातदार असलेल्या...
मध्य प्रदेशात सोयाबीनचे क्षेत्र कमी...नागपूर : मध्य प्रदेशात पिवळं सोनं म्हणून ओळखल्या...
प्रक्रिया उद्योगातून ‘सूर्या’ची झळाळी तेलगाव (ता. वसमत. जि. हिंगोली) येथील सूर्या...
संकटांमधून जांभूळ शेती उद्योगाची वाटचालसिंधुदुर्ग जिल्ह्यातील निरुखे येथील अनिरुद्ध...
पावसाचा जोर कमी होणार पुणे : कोकण, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे व...
कोकणात पावसाचा जोर ओसरला पुणे : कोकणात धुमाकूळ घातलेल्या पावसाचा जोर...
सोसायट्यांवर बॅंकिंग सुधारणांचा परिणाम...पुणे ः बॅंकिंग नियमन कायद्यात झालेल्या...
राज्यात ‘एचटीबीटी’च्या ७५ लाख पाकिटांची...पुणे ः बंदी असूनही देशात कपाशीच्या तणनाशक सहनशील...
राज्यातील धरणांत २३४ टीएमसी पाणीसाठानगर ः राज्याच्या एकूण सहा महसूली विभागांतील...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा अंदाज पुणे : दक्षिण कोकणची किनारपट्टी ते उत्तर...
राज्यात ठिकठिकाणी मुसळधारपुणे : कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग...
उत्तरेत मॉन्सूनचा वेगाने प्रवास पुणे : गेल्या दोन दिवसांपासून उत्तर भारतात पुन्हा...
तुम्हीच अभ्यास करा, अन् विम्याचे ठरवा...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक...
चिकू विमा हप्त्यात सहा पटीने वाढ पालघर ः कोरोनाच्या संकटात चहूबाजूंनी शेतकरी...
फळपीक विमा योजनेत हवामान धोके कायम, ...सोलापूर ः पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा...
चार पिकांमध्ये पूर्ण बियाणे बदल नगर ः चांगले उत्पादन घ्यायचे तर नवी सुधारित...
द्राक्ष उत्पादकांची फसवणूक, ५...नाशिक : दिंडोरी तालुक्यातील वळखेड, निगडोळ, नळवाडी...
राज्यात ३.१४ लाखांवर नवीन वीजजोडण्या सांगली ः कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेत मार्च...