ज्ञानज्योतींच्या लेकींचा सन्मान झाला पाहिजे ः छगन भुजबळ

Ladies of Gyanjyoti should be honored ः chaggan Bhujbal
Ladies of Gyanjyoti should be honored ः chaggan Bhujbal

सातारा : ज्ञानज्योती सावित्रीबाई जोतिबा फुले यांच्या जयंती कार्यक्रमासाठी शासनाकडून १० लाख रुपये तत्काळ मंजूर केले. हा निधी कायमस्वरूपी मिळावा यासाठी तरतूद करण्यात येईल. मात्र, याठिकाणी असलेला हा सोहळा अधिक दिमाखदार व्हायला हवा. तसेच या कार्यक्रमातून महिलांचा सन्मान झाला पाहिजे. त्यांना किमान १ लाख रुपयांचा पुरस्कार यातून दिला जावा, अशा सूचना राज्याचे ग्रामविकास मंत्री छगन भुजबळ यांनी केल्या. 

नायगाव (जि. सातारा) येथे ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८९ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी (ता.३) आयोजित कार्यक्रम सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी मंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभुराजे देसाई, माजी मंत्री राम शिंदे, आमदार मकरंद पाटील, माजी आमदार शशिकांत शिंदे, कमल ढोले पाटील, बापू भुजबळ, प्रा. हरी नरके, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, मंजिरी धाडगे, दत्ता बाळसराफ, नितीन वैद्य, अजय भाळणवकर, अमोकर गोवर्धन, अश्विनी कासार, वंदना धायगुडे, ॲड. सुभाष राऊत, प्रितेश गवळी, राजेंद्र तांबे, सरपंच सुधीर नेवसे, उपसरपंच सीमा कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री भुजबळ म्हणाले, की महाविकास आघाडीच्या सरकारने शेतकऱ्यांना दोन लाख रुपये कर्जमाफी दिली आहे. त्याचा राज्यातील ३० लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. तसेच दोन लाखांहून अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना देखील मदत करण्यासाठी शासनाकडून नवीन योजना आखण्यात येईल. प्रास्ताविक सरपंच नेवसे यांनी केले.

शेतकऱ्यांच्या हितासाठी महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. तत्कालीन व्यवस्थेवर आसूड ओढले. नेहमीच शेतकऱ्यांच्या हितासाठी लढा दिला. त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, त्यांच्या विचारांची जोपासना व्हावी यासाठी कर्जमाफीला महात्मा जोतिबा फुले यांचे नाव दिले आहे. त्यामुळे त्यांच्या नावाला कलंक लागू दिला जाणार नाही. - छगन भुजबळ, ग्रामविकास मंत्री

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com