Agriculture news in Marathi, ladyfinger, Guar, brinjal, Pune prices increased in Pune | Agrowon

पुण्यात भेंडी, गवार, वांगी, घेवड्याचे दर वधारले
टीम अॅग्रोवन
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

पुणे ः आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून पडणाऱ्या संततधार पावसाने दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने भाजीपाल्याची चांगली आवक होत आहे. गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ११) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. मागणी वाढल्याने भेंडी, गवार, वांगी, गाजर, घेवड्याचे दर १० ते २० टक्क्यांनी वधारले आहेत. तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते. 

पुणे ः आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून पडणाऱ्या संततधार पावसाने दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने भाजीपाल्याची चांगली आवक होत आहे. गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये रविवारी (ता. ११) भाजीपाल्याची सुमारे १६० ट्रक आवक झाली होती. मागणी वाढल्याने भेंडी, गवार, वांगी, गाजर, घेवड्याचे दर १० ते २० टक्क्यांनी वधारले आहेत. तर इतर भाजीपाल्याचे दर स्थिर होते. 

कोल्हापूर, सांगलीत आलेल्या पूरस्थितीमुळे या दोन जिल्ह्यांसह कर्नाटकातून येणाऱ्या आवकीवर परिणाम झाला आहे. तर विभागातील पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांसह नाशिक आणि नगर जिल्ह्यांतून सुरळीत आवक होत आहे. विविध भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून आंध्रप्रदेश, तमिळनाडू आणि कर्नाटक येथून सुमारे १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, बंगळूर येथून ५ ते ६ टेम्पो टोमॅटो, गुजरात आणि आंध्रप्रदेशातून ३ ते ४ ट्रक कोबी, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू येथून शेवगा सुमारे ४ ते ५ टेम्पो, इंदौर येथून गाजर सुमारे ५ ते ६ टेम्पो, मध्यप्रदेश आणि गुजरात मधून लसणाची सुमारे ५ ते ६ हजार गोणी तर आग्रा आणि इंदौर येथून बटाटा सुमारे ५० ट्रक आवक झाली होती.

महाराष्ट्राच्या विविध भागांतून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे १००० ते १२०० गोणी, टॉमेटो सुमारे सात ते आठ हजार क्रेट, फ्लॉवर १० ते १२ टेम्पो, कोबी प्रत्येकी सुमारे ७ ते ८ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, भेंडी आणि गवार प्रत्येकी ७ ते ८ टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, तांबडा भोपळा प्रत्येकी सुमारे १० ते १२ टेम्पो, भुईमूग शेंग सुमारे ५० ते ६० गोणी, शेवगा ३ ते ४ टम्पो तसेच कांदा सुमारे १०० ट्रक इतकी आवक झाली होती.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव : कांदा : १२०-१६०, बटाटा : ९०-१४०, लसूण : ५००-९००, आले : सातारी ७००-९००, भेंडी : ३००-४००, गवार : ५००-७००, टोमॅटो : १००-२००, दोडका : ३००-४००, हिरवी मिरची : १००-२५०, दुधी भोपळा : ८०-१५०, चवळी : १५०-२००, काकडी : १५०-२२०, कारली : हिरवी ३००-३५०, पांढरी २००-२५०, पापडी : २५०-३००, पडवळ : २५०-२८०, फ्लॉवर : १५०-२००, कोबी : १५०-२००, वांगी : २००-३५०, डिंगरी : १५०-२००, नवलकोल : १५०-१६०, ढोबळी मिरची : १५०-२५०, तोंडली : कळी २००-२५०, जाड : ९०-१००, शेवगा : ४००-५००, गाजर : २५०-३००, वालवर : ३००-३५०, बीट : २५०-२८०, घेवडा : १२००-१४००, कोहळा : १५०-२००, आर्वी : ३००-३५०, घोसावळे : १८०-२००, ढेमसे : १८०-२२०, पावटा : २५०-३००, भुईमूग शेंग : ५००-६००, मटार : ४००-७००, तांबडा भोपळा : ८०-१२०, सुरण : २८०-३००, मका कणीस : ६०-१२०, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

फळबाजार
फळबाजारात रविवारी (ता. ११) मोसंबी सुमारे २५ ते ३० टन, संत्री ३ ते ४ टन, डाळिंब २०० टन, पपई २५ ते ३० टेम्पो, लिंबे सुमारे दोन ते तीन हजार गोणी, चिक्कू ४०० ते ५०० डाग, कलिंगड १० ते १२ टेम्पो, खरबूज ३ ते ४ टेम्पो, पेरुची सुमारे ३०० क्रेट आवक झाली होती.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : २००-६००, मोसंबी : (३ डझन) : १५०-३५०, (४ डझन ) : ५०-१५०, संत्रा : (३ डझन) : १५०-३५०, (डझन ४) : ५०-१२०, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ३०-१२० गणेश १०-४०, आरक्ता २०-५०. कलिंगड : ५-१५, खरबूज : १०-३५, पपई : १०-३०, चिक्कू : ५०-३००, पेरु (२० किलो) ६००-९००.

फुलबाजार 
श्रावणी सोमवारमुळे फुलांची आवक वाढली आहे. तर मागणीही टिकून आहे. बकरी ईदमुळे गुलछडी, गुलाब, जुई, चमेलीला उठाव आहे. मागणी वाढल्याने फुलांचे दर २० ते ३० टक्क्यांनी वाढली आहे. 
फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : ४०-७०, गुलछडी : १५०-२००, बिजली : १३०-१५०, कापरी : ६०-८०, शेवंती : १३०-१५०, अ‍ॅस्टर : २५-३०, गलांड्या : १५-२५ (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : १०-१५, गुलछडी काडी : १०-४०, डच गुलाब (२० नग) : ३०-६०, लिली बंडल : १५-२०,  जर्बेरा : २५-४०, कार्नेशियन : १००-२००.

पालेभाज्या 
गुलटेकडी येथील बाजारात रविवारी (ता. ११) कोथिंबिरीची सुमारे २ लाख जुड्या, आणि मेथीच्या ८० हजार जुडींची आवक झाली. 
पालेभाज्यांचे भाव (शेकडा जुडी) : कोथिंबीर : ५००-१०००, मेथी : ५००-१०००, शेपू : ३००-७००, कांदापात : १२००-१५००, चाकवत : ६००-८००, करडई : ५००-८००, पुदिना : ५००-८००, अंबाडी : ७००-८००, मुळे : १०००-१२००, राजगिरा : ५००-८००, चुका : ८००-१०००, चवळई : ५००-८००, पालक : ८००-१०००.

मटण मासळी 
श्रावण महिन्यामुळे मासळी, चिकन, मटणाची मागणी घटली असली तरी पावसामुळे पश्चिम किनारपट्टीवरून मासळीची आवक बंद 
आहे. परिणामी विविध मासळींचे ५ ते १० टक्क्यांनी उतरले आहेत. पावसाच्या संततधारेमुळे खाडीच्या मासळीची आवक पूर्णपणे बंद झाली आहे. गणेश पेठ येथील मासळी बाजारात रविवारी (ता. ११) खोलसमुद्रातील मासळी सुमारे ३ ते ४ टन, आणि नदीच्या मासळीची सुमारे २०० किलो आवक झाली होती. तसेच आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे ४ ते ५ टन आवक असल्याची माहिती ठाकूर परदेशी यांनी दिली.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे भाव) : पापलेट : कापरी : १४०० मोठे १४०० मध्यम: ८०० - ९००, लहान ७००-७५०, भिला : ६००, हलवा : ६००-६५०, सुरमई : , रावस : लहान ७५०, मोठा : ९००, घोळ : ७००, पाला : मोठा ११००-१२००, वाम : पिवळी मोठी ७००, काळी :४००, ओले बोंबील : २००-२४०, कोळंबी ः लहान २८०, मोठी : ४०० जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ८००, लॉबस्टर : १४००, मोरी : लहान : २००, मोठी ३६०, मांदेली : १२०, राणीमासा : २००, खेकडे : २००, चिंबोऱ्या : ४८०

नदीची मासळी : रहू :१४०, कतला : १४०, मरळ : २८०, शिवडा : १६०, खवली : १६०, आम्ळी: ८० खेकडे : २००, वाम : ४४०

मटण : बोकडाचे : ५००, बोल्हाईचे : ५००, खिमा: ५००, कलेजी : ५६०.

चिकन : चिकन : १३०, लेगपीस : १७०, जिवंत कोंबडी : ११०, बोनलेस : २४०.

अंडी : गावरान : शेकडा : ५९०, डझन : ८४ प्रतिनग : ७ इंग्लिश : शेकडा : ३५० डझन : ४८ प्रतिनग : ४
 

इतर बाजारभाव बातम्या
राज्यात हिरव्या मिरचीला १८०० ते ४०००...परभणी : येथील पाथरी रस्त्यावरील फळे -भाजीपाला...
सांगलीत गूळ ३३०० ते ४४०० रुपये...सांगली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत बुधवारी...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
बऱ्हाणपुरात केळीला १८०० रुपयांपर्यंत दरजळगाव : खानदेशसह लगतच्या मध्य प्रदेशात केळीच्या...
सोलापुरात डाळिंबाच्या दराची उसळीसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
पुण्यात वांगी, तोंडली, गाजरासह...पुणे   ः राज्यातील पूरस्थिती...
औरंगाबादेत कांदे १००० ते १६०० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत फ्लॉवर २५०० ते ३५०० रुपये...परभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
सांगलीच्या बाजारपेठेत गुळाला ५५०० रुपये...सांगली : महापुरामुळे तसेच बरेच रस्ते...
नाशिकमध्ये कांदा प्रतिक्विंटल ७०० ते...नाशिक : नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
जळगाव बाजारात भाजीपाल्याचे दर स्थिरजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील...
पुण्यात भेंडी, गवार, वांगी, घेवड्याचे...पुणे ः आठवडाभरापेक्षा अधिक काळापासून पडणाऱ्या...
औरंगाबादेत भेंडी १००० ते ४००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
परभणीत गवार प्रतिक्विंटल २००० ते ३०००...परभणी ः पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...
नाशिकमध्ये वांगी प्रतिक्विंटल ४५०० ते...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
अकोल्यात तूर प्रतिक्विंटल सरासरी ५६००...अकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
जळगावात टोमॅटो, गवारीचे दर टिकूनजळगाव ः कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटो व...
सोलापुरात वांगी, घेवडा, काकडीच्या दरात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
हरभरा वगळता शेतीमालाची आवक जेमतेमनागपूर ः हरभऱ्याच्या सरासरी एक हजार क्‍विंटलच्या...
पुण्यात कांदा, आले, बीटच्या दरात सुधारणापुणे ः खरिपातील भाजीपाल्याच्या उत्पादनाला सुरवात...