सन्मान योजनेत लाखभर शेतकरी मदतीपासून वंचित

A Lakh farmers deprived of aid in PM's shetkari sanman scheme
A Lakh farmers deprived of aid in PM's shetkari sanman scheme

नाशिक : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देशात ''पंतप्रधान किसान सन्मान'' योजनेच्या मदतीचा चौथा हप्ता गुरुवार (ता. २२) केंद्राकडून जमा झाला. आत्ता या योजनेचे चार हप्त्यांचे पैसे शेतकऱ्यांना प्राप्त झाले आहेत. मात्र, सन्मान योजनेत नाशिक विभागात अर्ज केलेल्या किमान लाखभर शेतकरी असेही आहेत, की ज्यांना अजून पहिलाही हप्ता मिळालेला नाही. त्यामुळे संबंधितांना अपात्र ठरवले, की माहिती अजून जुळते आहे, याविषयीही संभ्रमावस्था कायम आहे. एकंदरीत देऊ केलेल्या मदतीपासून एक लाख शेतकरी वंचित असल्याचे उघड झाले आहे.  

पंतप्रधान किसान सन्मान योजनेची घोषणा झाली. आचारसंहितेच्या तोंडावर योजनेचा लाभ देण्यासाठी गतीने कालबद्ध कार्यक्रम आखून जिल्हानिहाय शेतकऱ्यांची माहिती संकलित केली गेली. माहिती संकलनानंतर संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्याच्या कामाला पुन्हा गती दिली गेली. सगळी कामे दुय्यम राहून त्या वेळी पंतप्रधान किसान सन्मानची माहिती अपलोड करण्यास प्राधान्य दिले गेले. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना एकेक दोन हजारांचा हप्ता थेट खात्यात जमा झाला.

आत्तापर्यंत या योजनेत चार हप्ते जमा झाले आहेत. ठरावीक दिवसांनंतर शेतकऱ्यांच्या बॅच करून ती माहिती केंद्राकडे पाठविली जाते. त्या माहितीचीही खातरजमा करणे, बॅंक खाते, आधार क्रमांक जुळविण्यासह अनेक माहिती अपलोड करताना त्यात नावातील चूक, बॅंक खात्यातील नावातील फरकापर्यंत अनेक त्रुटींमुळे मदत मिळत नाही. याच कारणांनी मदत अजून पोचलेली नसल्याचे बोलले जात आहे.

 लाभार्थ्यांच्या थेट खात्यात मदतीचे नियोजन असलेल्या उपक्रमात मदत थेट केंद्राकडून जमा होते. त्यात कोण पात्र कोण अपात्र ठरले, कुणाच्या नावात इंग्रजीतील आद्याक्षर (स्पेलिंग मिस्टेक) सारख्या चुका आहेत, हे मात्र शेतकऱ्यांना कळत नाही. त्यामुळे अजूनही एकेका जिल्ह्यात लाखभर शेतकरी असे आहेत, की ज्यांना पहिला हप्ताही जमा नाही.

लाभासाठी अपात्र ठरले, की माहिती भरण्यातील त्रुटी हे मात्र अजूनही अनेकांना कळलेच नाही. एकट्या नाशिक विभागात ही संख्या एक लाखाहून अधिक आहे. सहा महिने होऊनही पहिला हप्ताही मिळालेला नाही.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com