पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या 

पुणे जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत १ लाख २ हजार ४६२ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरण्यांचे हे प्रमाण सरासरी खरीप क्षेत्राच्या तुलनेत ५५.६० टक्के एवढे आहे.
पुण्यात लाख हेक्टरवर  खरिपाच्या पेरण्या  On lakh hectares in Pune Kharif sowing
पुण्यात लाख हेक्टरवर  खरिपाच्या पेरण्या  On lakh hectares in Pune Kharif sowing

पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत १ लाख २ हजार ४६२ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरण्यांचे हे प्रमाण सरासरी खरीप क्षेत्राच्या तुलनेत ५५.६० टक्के एवढे आहे. यामध्ये भोर तालुक्याने आघाडी घेतली असून, तालुक्यात सर्वाधिक १२ हजार ८७९ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. मागील आठवड्यात झालेल्या दमदार पावसानंतर आता रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. चालू आठवड्यात पावसाच्या उघडिपीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  जिल्ह्यातील काही भागात मे महिन्याच्या अखेरीपासून पाऊस सुरू झाला होता. हा पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होता. त्यानंतर मात्र अगदी जुलैच्या मध्यापर्यंत पावसाने मोठा खंड दिला होता. या खंडामध्ये विविध पिकांचा पेरण्या रखडल्या होत्या. तर भाताची पुनर्लागवड देखील खोळंबली होती. पश्‍चिम घाट परिसरातील तालुक्यांमधील भाताची रोपे पावसाअभावी पिवळी पडू लागली होती. या रोपांना पावसाने दिलासा मिळाला आहे.  जिल्ह्यात खरिपाचे सर्वाधिक ३१ हजार २५५ हेक्टर क्षेत्र जुन्नर तालुक्यात असून, सर्वात कमी म्हणजे ३ हजार १३७ हेक्टर क्षेत्र दौंड तालुक्यात आहे. खरीप हंगामात पुणे जिल्ह्यात भात, खरीप ज्वारी, बाजरी, रागी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कारळे, सूर्यफूल, सोयाबीन आदी प्रमुख पिके घेतली जातात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com