Agriculture news in marathi On lakh hectares in Pune Kharif sowing | Agrowon

पुण्यात लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 27 जुलै 2021

पुणे जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत १ लाख २ हजार ४६२ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरण्यांचे हे प्रमाण सरासरी खरीप क्षेत्राच्या तुलनेत ५५.६० टक्के एवढे आहे.

पुणे : जिल्ह्यात जुलै महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत १ लाख २ हजार ४६२ हेक्टर क्षेत्रावर खरिपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. पेरण्यांचे हे प्रमाण सरासरी खरीप क्षेत्राच्या तुलनेत ५५.६० टक्के एवढे आहे. यामध्ये भोर तालुक्याने आघाडी घेतली असून, तालुक्यात सर्वाधिक १२ हजार ८७९ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. मागील आठवड्यात झालेल्या दमदार पावसानंतर आता रखडलेल्या पेरण्यांना वेग येणार आहे. चालू आठवड्यात पावसाच्या उघडिपीचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

जिल्ह्यातील काही भागात मे महिन्याच्या अखेरीपासून पाऊस सुरू झाला होता. हा पाऊस जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होता. त्यानंतर मात्र अगदी जुलैच्या मध्यापर्यंत पावसाने मोठा खंड दिला होता. या खंडामध्ये विविध पिकांचा पेरण्या रखडल्या होत्या. तर भाताची पुनर्लागवड देखील खोळंबली होती. पश्‍चिम घाट परिसरातील तालुक्यांमधील भाताची रोपे पावसाअभावी पिवळी पडू लागली होती. या रोपांना पावसाने दिलासा मिळाला आहे. 

जिल्ह्यात खरिपाचे सर्वाधिक ३१ हजार २५५ हेक्टर क्षेत्र जुन्नर तालुक्यात असून, सर्वात कमी म्हणजे ३ हजार १३७ हेक्टर क्षेत्र दौंड तालुक्यात आहे. खरीप हंगामात पुणे जिल्ह्यात भात, खरीप ज्वारी, बाजरी, रागी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कारळे, सूर्यफूल, सोयाबीन आदी प्रमुख पिके घेतली जातात. 


इतर बातम्या
'गुलाब' चक्रीवादळ कलिंगापट्टणमनजीक...पुणे : बंगालच्या उपसागरात घोंगावणारे 'गुलाब'...
येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरवयेवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत...
सोयाबीन विक्रीची घाई नकोनागपूर : मुहूर्ताचे दर पाहून शेतकऱ्यांकडून अधिक...
‘गुलाब’ चक्रीवादळ आज पूर्व किनाऱ्याला...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...
अन्न प्रक्रिया उद्योगासाठी  कोल्हापुरात...चंदगड, जि. कोल्हापूर : कृषी मालावर आधारित...
राज्यात पावसाचा जोर वाढणारपुणे : बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीमुळे...
साहित्य संमेलनातून वैचारिक दिशा...औरंगाबाद : साहित्य हे समाजाच्या विकासासाठी...
लहान संत्रा फळांचे करायचे काय?नागपूर : लहान आकाराच्या संत्रा फळांवर नांदेड...
दहा जिल्ह्यांत ‘कृषी तंत्रज्ञान पारायण’नगर ः फळबागा, शेतीपिके आणि पशुसंवर्धनाबाबत ऐनवेळी...
नगर :‘तहसील’मध्ये सोयाबीन ओतून  किसान...नगर : शेतकऱ्यांचे सोयाबीन बाजारात आल्यानतर...
किनवट, हदगाव, माहूरमध्ये पुन्हा पाऊसनांदेड : जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून पाऊस...
रब्बीत पंधरा हजार हेक्टरवर  करडई...अकोला : तेलवाण वर्गीय पिकांचे उत्पादन...
नाशिक : शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ...नाशिक : जिल्ह्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने...
सोयाबीनचे दर दबावाखाली;  ‘स्वाभिमीनी’चे...परभणी : सोयाबीनचे दर कोसळविणाऱ्या राज्य व केंद्र...
ऊसबिले दिल्याशिवाय  गाळप परवाना नको :...सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांकडे...
‘नासाका’ सुरू होण्याची प्रक्रिया पुढे...नाशिक रस्ता : नाशिक सहकारी साखर कारखाना सुरू...
अकोला :सोयाबीन, कापूस उत्पादक  सततच्या...अकोला : सोयाबीन काढणीला तयार होत असतानाच पावसाची...
कुसुम सौरऊर्जा प्रकल्पातून शेतकऱ्यांना...नाशिक : ‘नापीक आणि अकृषिक जमिनीचा वापर करून...
इंधवे येथील पाझर तलावाची दुरुस्ती होईनापारोळा, जि. जळगाव : इंधवे (ता. पारोळा) येथील पाझर...
पांगरी परिसरात मुसळधारेचा सोयाबीन... पांगरी, ता. बार्शी ः पांगरी भागात...