agriculture news in marathi, Lakhganga milk producers agitating on milk issue | Page 2 ||| Agrowon

लाखगंगात दूध संकलन घटले
वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

औरंगाबाद : दूध उत्पादकांनी मोफत दूधवाटप केल्याने लाखगंगा येथील दूध संकलन जवळपास निम्म्यावर आले आहे. शिवाय दूध घातले तरी हमीदर मिळत नाही, तोवर स्लिप न घेण्याची भूमिका दूध घालणाऱ्या दूध उत्पादकांनी  घेतल्याची माहिती दूध उत्पादकांनी दिली. 

औरंगाबाद : दूध उत्पादकांनी मोफत दूधवाटप केल्याने लाखगंगा येथील दूध संकलन जवळपास निम्म्यावर आले आहे. शिवाय दूध घातले तरी हमीदर मिळत नाही, तोवर स्लिप न घेण्याची भूमिका दूध घालणाऱ्या दूध उत्पादकांनी  घेतल्याची माहिती दूध उत्पादकांनी दिली. 

लाखगंगा येथे जवळपास चार ते साडेचार हजार लिटर दूध संकलन केले जाते. गुरुवारी (ता. ३) लुटता कशाला... फुकटच न्या,   म्हणत आंदोलनाचा शंखनाद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारीही (ता. ४) लाखगंगा येथे फुकट दूधवाटपाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. सकाळपासूनच ग्रामदैवत मारोतीच्या मंदिरासमोर ठरल्याप्रमाणे भजनाला सुरवात करण्यात आली. त्यानंतर गावातील दूध उत्पादकांनी मंदिरासमोर दूध घोटून त्याचे मोफत वाटप केले.  

लाखगंगा येथे दरदिवशी साडेचार हजार लिटर दूध संकलन केले जाते. शुक्रवारी (ता. ४) केवळ २८०० लिटर दुधाचे संकलन झाले. जवळपास १७०० लिटरने एकट्या लाखगंगा गावातील दूध संकलन घटले.  

पंचक्रोशीतील लाडगाव, बापतारा, बाभूळगाव, लाखगंगा, पुरणगाव, वीरगाव आदी गावांमध्येही दूध उत्पादकांनी मोफत दूधवाटपाचा कार्यक्रम राबविल्याने त्या गावांमधीलही दूध संकलन मोठ्या प्रमाणात घटले. शिवाय तेथील दूध उत्पादकांनीही आपल्या दुधाच्या स्लिप घेतल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. जोवर दूध उत्पादकांना शासनाने ठरवून दिलेला २७ रुपये प्रतिलिटरचा हमीदर दिला जात नाही. तोवर आंदोलन तसेच ९ मेपर्यंत दररोज मोफत दूधवाटपाचा कार्यक्रम सुरूच राहणार असल्याची भूमिका दूध उत्पादकांनी घेतली आहे. शनिवारी (ता. ५) लाखगंगा, लाडगाव, सावखेड गंगा आदी गावांतील दूध उत्पादकांसह वैजापूरच्या तहसील कार्यालयावर जाऊन मोफत दूधवाटप करण्याची तयारी चालविली असल्याची माहिती लाखगंगाचे सरपंच दिगंबर तुरकने यांनी दिली. डोणगाव येथील दूध उत्पादकांनीही शुक्रवारी घातलेल्या दुधाच्या स्लिप घेतल्या नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

दूध उत्पादक फुकट वाटतोय म्हणजे त्याच्याकडे दूध शिल्लक आहे असे नाही. यामागील दूध उत्पादक शेतकऱ्यांची भावना सरकारने समजून घ्यावी. अंत न पाहता दूध उत्पादकाला न्याय देण्याची भूमिका घ्यावी.
- धनंजय धोर्डे,
दूध उत्पादक तथा शेतकरी नेते. 

.....
आठ दिवसांपूर्वी ५० हजाराला एक गाय बाजारातून आणली होती. एकीच्या दोन गायी झाल्यानं दहा-वीस लिटर दूध निघंल व कुटुंबाचा रहाटगाडा भागल असं वाटलं. विकत आणलेल्या गायीचा मृत्यू झाल्यानं साऱ्या अपेक्षांवर स्वप्नांवर पाणी फेरलं. गायही गेली अन्‌ पैसेही गेल्यानं आर्थिक संकट आलं. 
- नंदू तुरकने,
दूध उत्पादक, लाखगंगा, ता. वैजापूर, जि. औरंगाबाद. 

.....

इतर अॅग्रो विशेष
अजित पवार, मुश्रीफांसह ५० जणांवर गुन्हे...मुंबई  : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक...
अतिवृष्टी, पुराचा चार लाख हेक्टरवरील...पुणे  : राज्यात अतिवृष्टी व पुरामुळे...
अतिवृष्टीमुळे सुपारी पीक धोक्यातसिंधुदुर्ग ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आता...
मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या...पुणे ः विदर्भात चक्राकार वाऱ्याची स्थिती असल्याने...
‘ती’च्या शिक्षणाची कथाशा ळा-महाविद्यालयांचे निकाल असो  विविध...
संथ वाहते कृष्णामाई...संथ वाहते कृष्णामाई, तीरावरल्या सुख-दुःखाची,...
`चांद्रयान २' चंद्राच्या कक्षेत दाखलनवी दिल्ली ः भारताची महत्त्वाकांक्षी...
मराठवाड्यात २७ टक्केच पीक कर्जवाटपऔरंगाबाद : यंदाच्या खरिपासाठी शेतकऱ्यांना...
राज्य बँकेची ३५ हजार कोटींची उलाढालमुंबई : अहवाल वर्षात इतिहासात ३५,४४० कोटी इतकी...
नाशिक जिल्ह्यात मक्यावर अमेरिकन लष्करी...नाशिक  : चालू खरीप हंगामात मका पिकावर मोठ्या...
`अतिपावसाने होत्याचं नव्हतं झालं`; पुणे...पुणे ः शेतकरी पाणीटंचाईच्या संकटातून सावरण्याचा...
अपघात विमा योजनेत शेतकऱ्यासह कुटुंबातील...मुंबई: गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा...
राज्यात पूरप्रवण क्षेत्राबाबत संशयकल्लोळपुणे : कृष्णा व गोदावरी नदीच्या खोऱ्यात सतत पूर...
भाजीपाल्याचे आगार उद्ध्वस्तकोल्हापूर/सांगली : ज्या जिल्ह्यांनी संपूर्ण...
‘शेती तिथे रस्ता’ उपक्रमासह...सातारा जिल्ह्यातील पाटण हा डोंगराळ तालुका म्हणून...
कृत्रिम पावसासाठी अखेर विमान उडाले; ३८...औरंगाबाद  : कृत्रिम पावसाच्या प्रयोगासाठी...
पुरामुळे मका पिकाला फटकानवी दिल्ली  ः महाराष्ट्र आणि कर्नाटकात मका...
राज्यात हलक्या पावसाचा अंदाज पुणे : कमाल तापमानात वाढ होत असतानाच, बुधवारी (ता...