agriculture news in marathi, Lakhganga milk producers starts agitating on milk issue | Agrowon

लुटता कशाला, फुकटच घ्या ! दूध आंदोलनाला प्रारंभ
संतोष मुंढे
शुक्रवार, 4 मे 2018

लाखगंगा, जि. औरंगाबाद : लाखगंगा ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयानंतर प्रशासन व शासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर ठरल्याप्रमाणे दुधाला शासनाने जाहीर केलेला दर मिळावा, यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ‘फुकट घ्या दूध’ आंदोलन सुरू केलं. भजन-कीर्तनाच्या माध्यमातून सुरू झालेल्या आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दूध उत्पादकांनी दिला. लुटता कशाला आणि शोषण करण्यापेक्षा दूध ‘फुकटच घ्या’ या आशयाने सुरू झालेल्या आंदोलनाचा हुंकार लाखगंगा येथून फुटला आहे.  

लाखगंगा, जि. औरंगाबाद : लाखगंगा ग्रामसभेत घेतलेल्या निर्णयानंतर प्रशासन व शासनाकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने अखेर ठरल्याप्रमाणे दुधाला शासनाने जाहीर केलेला दर मिळावा, यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांनी ‘फुकट घ्या दूध’ आंदोलन सुरू केलं. भजन-कीर्तनाच्या माध्यमातून सुरू झालेल्या आंदोलनाची दखल न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दूध उत्पादकांनी दिला. लुटता कशाला आणि शोषण करण्यापेक्षा दूध ‘फुकटच घ्या’ या आशयाने सुरू झालेल्या आंदोलनाचा हुंकार लाखगंगा येथून फुटला आहे.  

दरम्यान, अौरंगाबाद जिल्ह्यासह जालना, नगर, परभणी, भंडारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांत काही ठिकाणी शेतकऱ्यांनी ‘फूकट घ्या दूध’ आंदोलन केले. 
लाखगंगा येथे किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले, युवा शेतकरी नेते धनंजय धोर्डे पाटील, आमदार सुभाष झांबड आदींच्या उपस्थितीत आंदोलनाला सुरवात झाली. सरकारने उत्तम दर्जाच्या दुधाला २७ प्रति लिटर हमी दर निश्‍चित केले असले तरी प्रत्यक्षात दूध उत्पादक शेतकऱ्यांना ते दूध घालत असलेल्या डेअरी वा संघाकडून मिळत नाहीत. केवळ १६ ते २१ रुपयांवर त्यांची बोळवण केली जाते. त्यामुळे दूध उत्पादक संकटात सापडला आहे. दूध उत्पादकांची ही लुट सुरू असतांना शेतीपूरकर उद्योग करा म्हणनारं सरकार मूग गिळून बसले. त्यामुळे शासनाचे धोरण आणि लुटीचा निषेध म्हणून लाखगंगा येथील ग्रामसभेत ३ मे पासून दूध फुकट घालण्याचा, वाटण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतरही शासन व प्रशासनाने कोणतीच दखल न घेतल्याने गुरुवारी (ता.३) सकाळी ७ वाजताच गावकऱ्यांनी दूध गावातील मारुती मंदिराजवळ जमा केलं.

 

मारुती मंदिरात भजन कीर्तनाने आंदोलनाला सुरवात करण्यात आली. सोबतच दूध उत्पादकाला जाहीर केलेला हमी दर संबंधीतांकडून मिळवून देण्याची बुद्धी शासनाला मिळावी याकरिता देवाला दुधाचा अभिषेक करण्यात आला. दूध उत्पादक संघाच्या संचालकांना निवेदन देऊन मोफत दूध वाटपाला सुरवात करत आंदोलनाच्या पहिल्या टप्प्याची सुरवात करण्यात आली. 

या आंदोलनात औरंगाबाद जिल्ह्यातील बापतारा डोनगाव, लाखगंगा, पुरणगाव, बाभूळगाव, गंगा सावखेड, गंगा हिंगोनी, भऊर, तर नगर जिल्हातून पुणतांबा, पिंपळवाडी, वारी, संगमनेर, गोंडेगाव आदी गावातील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. किसान सभा, स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान क्रांती आदी संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचे जाहीर केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चंद्रकांत कटारे यांनीही दूध दराच्या आंदोलनात सक्रिय सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले. 

३ मे ते ९ मे अस सात दिवस मोफत दूध वाटप करण्यात येणार आहे. लाखगंगा येथे पहिल्या दिवशी मोफत दूध दिल्या नंतर पुढील सहा दिवस दूध डेअरी आणि शासकीय कार्यालयात मोफत दूध वाटप करण्यात येणार आहे. आंदोलनात लाखगंगाचे सरपंच दिगंबर तुरकने, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत सदाफळ, जिल्हा परिषद सदस्य पंकज ठोंबरे, राजेंद्र पाटील कराळे, सखाजी चंदणे, लक्ष्मण मुकींद, जालिंदर तुरकने, बाळासाहेब चव्हाण, प्रभाकर वारसे, अण्णासाहेब थोरात आदींसह दूध उत्पादकांचा मोठ्या संख्येने सहभाग होता. 

एका टॅंकरचे मशीनमधून तीन टॅंकर करण्याचा प्रकार थांबविला, तर सरकार व संबंधीत म्हणत असलेला शहरातील दुधाचा महापूर थांबेल. सात दिवस शांतीच्या मार्गाने फुकट दूध घालू मात्र त्यानंतरही सरकारला जाग आला नाही, तर आंदोलनाची धार तीव्र केली जाईल. तशी वेळ सरकारने येऊ देऊ नये. 
- डॉ. अजित नवले, 
किसान सभा, महाराष्ट्र प्रदेश

संकटात असलेल्या शेतकऱ्यांचा सर्वात चांगला शेतीपूरक उद्योग म्हणून दूध उत्पादन. मात्र तोही संकटात सापडला आहे. सरकारनं या गंभीर प्रश्नाकडे वेळीच लक्ष द्यावं. दूध दरासाठीच्या या आंदोलनाची धार औरंगाबाद व जालना जिल्ह्यात तीव्र केली जाईल.
- आमदार सुभाष झांबड, औरंगाबाद. 

इतर अॅग्रो विशेष
युवा कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करारपुणे ः आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य...
महाराष्ट्राला ‘स्किल कॅपिटल' बनवावेः...मुंबई ः महाराष्ट्र शासनाच्या छत्रपती राजाराम...
कोकण, घाटमाथ्यावर हलक्या सरींचा अंदाज पुणे ः  उत्तर भारतामध्ये असलेल्या कमी...
तीन हजार शेतकऱ्यांच्या मूल्यांकनाचा...कोल्हापूर ः कृषी कौशल्य विकास प्रशिक्षण पूर्ण...
सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांचे...सांगली : जिल्ह्यातील एक हजारांवर द्राक्ष उत्पादक...
कर्जमाफीतील तक्रार निवारणासाठी समिती...पुणे ः छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
विविध तंत्रांच्या वापरातून प्रयोगशील...भोसी (जि. हिंगोली) येथील गोरखनाथ हाडोळे विविध...
उत्कृष्ठ व्यवस्थापनातून खरीप कांद्याचे...बुलडाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील आखाडे कुटुंबाने...
‘पक्षाघाता’च्या साथीत कायदा बासनात"व्हेन मेन आर प्युअर लॉज आर युजलेस. व्हेन मेन आर...
चिंता वाढविणारी उघडीपराज्यात मॉन्सूनच्या पावसाचा काहीसा जोर कमी झाला...
ऊन-सावल्यांच्या खेळात पावसाची दडी;...पुणे : मॉन्सून सक्रिय नसल्याने राज्याच्या बहुतांश...
पीकविम्यासाठी आतापर्यंत साडेतीन लाख...पुणे  : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी चालू...
कमी खर्चात वाइननिर्मितीचे तंत्र विकसित...पुणे : महाराष्ट्र विज्ञान वर्धिनीच्या आघारकर...
शेंगासोबतच शेवग्याची पावडर ठरतेय...संपूर्ण २० एकर क्षेत्रांमध्ये शेवगा लागवडीचा...
मराठवाड्यात दुष्काळाची धग कायमऔरंगाबाद : पावसाळा सुरू होऊन महिना उलटला,...
मराठा उमेदवारांच्या खुल्या प्रवर्गातील...मुंबईः मराठा आरक्षणाला स्थगिती असताना खुल्या...
मराठवाड्यात ४८ टक्‍के पेरणी; पिके...औरंगाबाद : मराठवाड्यातील खरिपाच्या ४९ लाख ९६...
बिस्किटउद्योगातून आर्थिक प्रगतीमौजे सांगाव (ता. कागल, जि. कोल्हापूर) येथील...
शेती, शिक्षण अन् ग्रामविकासात ‘वसुधा’...धुळे येथील वन्य सुस्थापन धारा (वसुधा) ही...
।। जातो माघारी पंढरीनाथा । तुझे दर्शन...पंढरपूर, जि. सोलापूर सावळ्या विठुरायाचे दर्शन आणि...