सोमठाणा येथील लालकंधारी वळू सर्वोत्कृष्ट

The Lalkandhari Bull at Somthana is the first in the contest
The Lalkandhari Bull at Somthana is the first in the contest

श्रीक्षेत्र माळेगाव, जि. नांदेड : जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने माळेगाव यात्रेत पशुप्रदर्शन घेण्यात आले. यावर्षी या स्पर्धेत सोमठाणा (ता. नायगाव) येथील पशुपालक तिरुपती कदम यांचा लालकंधारी वळू सर्वोत्कृष्ट ठरला. प्रथम क्रमांक मिळवत त्यांनी एक लाख रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे.

लाल कंधारी मादी गटात बोरी खुर्द (ता. कंधार) येथील ज्ञानेश्वर कदम यांनी सर्वोत्कृष्ट पारितोषिक मिळवले आहे. देवणी नर गटात देवर्जन (ता. लातूर) येथील पशुपालक नारायण माधव खरात यांनी सर्वोत्कृष्ट ठरले. या दोघांनी पन्नास हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले आहे. पंचवीस हजारांचे पुरस्कार लातूर जिल्ह्यातील देवर्जन येथील पशुपालक नारायण धोंडीबा जाधव यांच्या देवणी मादी गटास मिळाला आहे.

लाल कंधारी गटात वळूमध्ये प्रथम लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील पशुपालक नवनाथ सापनर, व्दितीय लोहा तालुक्यातील रिसनगाव येथील पशुपालक पाशामियॉ हरोन्न साहेब शेख तर तृतीय क्रमांक घुगेवाडी (ता. लोहा) येथील पशुपालक मारोती घुगे यांना मिळाला आहे. लाल कंधारी दोन दात वळूमध्ये प्रथम सोमठाणा (ता. नायगाव) येथील पशुपालक तिरुपती विठ्ठल कदम, व्दितीय लिंबोटी (ता. लोहा) येथील पशुपालक माधव सापनर तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक माळाकोळी (ता. लोहा) येथील पशुपालक सुनील होनमोडे यांना मिळाला आहे.

लाल कंधारी चार दात वळूमध्ये प्रथम लातूर जिल्ह्यातील डोंगरसांगवी येथील पशुपालक संग्राम हलगरे, व्दितीय कंधार तालुक्यातील बाचोटी येथील पशुपालक विठ्ठल पांडूर्णे तर तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रिसनगाव (ता. लोहा) येथील पशुपालक सत्यनारायण मेनगर यांना मिळाला आहे. 

लाल कंधारी नर गट वासरे : प्रथम माळाकोळी (ता. लोहा) येथील पशुपालक संजय निदवंडे, व्दितीय लातूर येथील पशुपालक राजेभाऊ जाधव तर तृतीय पारितोषिक शेतफुट (ता. अहमदपूर) येथील पशुपालक शिवाजी नरबोटे यांना मिळाला आहे. 

लालकंधारी गाय गट ः प्रथम लिंबोटी येथील बालाजी सपनर व परसराम सापनर. लालकंधारी कालवड गट ः प्रथम बोरी खुर्द येथील ज्ञानेश्वर कागणे, सिंदगी (ता. अहमदपूर) येथील कमलाकर मुळे तर तृतीय माळाकोळी येथील व्यंकटेश सूर्यकांबळे. लालकंधारी वासरे गट ः मादीमध्ये प्रथम माळाकोळी येथील गोपीनाथ कांबळे, व्दितीय लिंबोटी येथील हरी सापनर व तृतीय बाचोटी येथील बालाजी पांडूर्णे. 

देवणी गटात वळू ः प्रथम हसेगाव वाडी (ता. औसा) येथील व्यंकट शेंडगे, फुगनरवाडी  (ता. गंगाखेड) येथील रावसाहेब फुगनर व्दितीय तर ढोरसांगवी (ता. जळकोट) येथील संग्राम हलगरे तृतीय. देवणी गट दोन दात वळूमध्ये देवर्जन (ता. उदगीर) येथील नारायण खरात प्रथम, हसेगाववाडी (ता. औसा) येथील संजय जाधव व्दितीय, रेणापूर तालुक्यातील अमोल शिंदे तृतीय. देवणी नर गट चार व सहा दात वळू मध्ये प्रथम तळणी (ता. रेणापूर) येथील सौ. सत्यभामा केरबा शिंदे, व्दितीय बेलगाव (ता. चाकूर) येथील तुळशिराम भरनोळे, तर तृतीय नागरपाला (ता. औराद) येथील रामाप्पा बिरादार.

देवणी नर वासरी गट ः प्रथम हसेगाववाडीतले (ता. औसा) येथील बालाजी जाधव तर व्दितीय माणिक जाधव. तृतीय हगदळ (ता. अहमदपूर) येथील माधव मुंडे. देवणी गाय गट प्रथम नारायण जाधव कुनकी तालुका जळकोट, व्दितीय भाऊसाहेब गायकवाड, चाकूर तालुका तिपरगाव तृतीय संजय बामन्ना जळकोट. देवणी कालवड गट कुनकी (ता. जळकोट) येथील बालाजी केंद्रे प्रथम, शिरडशहापूरचे (ता. औंढा नागनाथ) महादेव अपमार व्दितीय, जळकोट तालुक्यातील कुनकीचे दशरथ पवार तृतीय. 

देवणी मादी वासरे गट ः प्रथम गोविंद तिडके, व्दितीय दादाराव नागोराव गोताळे, तृतीय धनंजय वाघमोड (सर्व लातूर जिल्हा). जर्सी गाय वासरे गटात तिवघ्याचे (ता. चाकूर) नामदेव तिवघळे प्रथम, दगडू आलट तृतीय व कनेरवाडीचे श्रीकांत बहीरे व्दितीय. एच.एफ.गाय गट प्रथम बालाजी तिवघाळे, व्दितीय बालाजी जाधव, तृतीय बालाजी अनदूरे (सर्व लातूर जिल्हा). एच. एफ. कालवड गट प्रथम दत्तराम त डूमनर, व्दितीय माधव केंद्रे, तृतीय सुधाकर सोळंके. एच. एफ. नर व मादी वासरे प्रथम बालाजी जाधव, व्दितीय श्रीकृष्ण माने, तृतीय केरबा शिंदे.

श्वानगटासह कुक्कुट गटाच्याही स्पर्धा पशुप्रदर्शन व स्पर्धेमध्ये अश्व, शेळीगट, श्वानगट, कुक्कुट गटाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यात अश्व गटात नर व मादी गटात नांदेड येथील अधीक्षक गुरुव्दारा बोर्डाने प्रथम क्रमांकाचे बक्षीस पटकावले आहे. शेळी गटात लिंबोटी येथील संतोष राठोड यांनी प्रथम येण्याचा मान पटकावला. श्वान गटातील विविध जातींचे श्वान स्पर्धेत सहभागी झाले होते. तसेच शेळीगट आणि कुक्कुट गटातही विजेत्या स्पर्धकांनी पारितोषिक दिले जाणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com