agriculture news in Marathi lamon rate low in market Maharashtra | Page 2 ||| Agrowon

लिंबे तोडणीलाही महाग 

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 जून 2021

कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, लिंबे फेकून देण्याची वेळ आली आहे. पातूर तालुक्यातील सावरगाव येथील उत्पादक ज्ञानेश्‍वर नागलकर यांनी लिंबे फेकून दिली.

अकोला ः कोरोनामुळे यंदा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला असून, लिंबे फेकून देण्याची वेळ आली आहे. पातूर तालुक्यातील सावरगाव येथील उत्पादक ज्ञानेश्‍वर नागलकर यांनी लिंबे फेकून दिली. तोडणीसाठी लागणारा खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यावर ही दुर्दैवी वेळ येऊन ठेपली आहे. 

जिल्ह्यात पातूर, बाळापूर, अकोला, बार्शीटाकळी तालुक्यातील लिंबांच्या बागा आहेत. दरवर्षी उन्हाळ्यात लिंबू उत्पादकांना चांगली मिळकत होत असते. त्यामुळे दरवर्षी लिंबू लागवड क्षेत्रात वाढ होत आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे लिंबाचा मुख्य हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून जात आहे. यंदाही अशीच स्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांना सुरुवातीला लिंबांना भाव मिळाला.

मात्र लॉकडाऊन लावल्याने बाजारपेठा बंद झाल्या. प्रामुख्याने हॉटेल व्यवसाय, उन्हाळ्यात चालणाऱ्या थंडपेयांची दुकाने बंद राहिल्याने लिंबाला मागणीच मिळाली नाही. त्यामुळे या उत्पादकांना मोठी झळ सहन करावी लागली. त्यातही ज्या शेतकऱ्यांच्या बागांमध्ये लिंबाची फळे उशिराने काढणीला आली त्यांना आता फेकून देण्याची वेळ आलेली आहे. 

ज्ञानेश्‍वर नागलकर यांच्याकडे लिंबाची पाचशे झाडे आहेत. सुरुवातीला हिरव्या लिंबाला बऱ्यापैकी दर मिळाले. सध्या हिरव्या तसेच पिकलेल्या लिंबांपासून तोडणीचाही खर्च निघेनासा झाला. हिरव्या लिंबांची १५ किलोची गोणी ९० ते १२० रुपयांना, तर पिकलेल्या लिंबांची गोणी अवघी ४० ते ५० रुपयांना व्यापारी मागत आहेत. मजुरांना एक गोणी तोडण्यासाठी ५० रुपये द्यावे लागतात. तर ग्रेडिंगचा खर्च १० रुपये, वाहतूक २० रुपये आणि अडत. हाच खर्च ९० रुपयांवर जातो. खर्च आणि मिळणारे उत्पन्न हे बरोबरीत आलेले आहे. यामुळे नागलकर यांनी पिकलेली लिंबे अक्षरशः फेकून दिली. 

प्रतिक्रिया 
मागील दोन हंगामांपासून लिंबांना मागणी व भावच मिळालेला नाही. इतर पिकांप्रमाणे याला हमीभाव नसल्याने लिंबू उत्पादकांचे भवितव्य अधांतरी आहे. मी या वर्षी बागेवर केलेला खर्चही निघालेला नाही. आता १५ किलो पिकलेली लिंबे ४० रुपयांत देण्याची वेळ आलेली आहे. झाडांखाली या लिंबांचा सडा पडलेला आहे. लिंबे बागेतून बाहेर काढण्याचाही खर्च निघेनासा झालेला आहे. 
- ज्ञानेश्‍वर नागलकर, लिंबू उत्पादक, सावरगाव, जि. अकोला 
 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात आज हलक्या सरींची शक्यता पुणे : राज्याच्या अनेक भागांत पावसाने उघडीप दिली...
पशुचिकित्सा व्यवसायींचा राज्यभर बेमुदत...नगर : पशुचिकित्सा व्यवसायी (डिप्लोमा, पदविकाधारक...
ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये सर्वसाधारण पावसाची...पुणे : हवामान विभागाने ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याचा...
पीकविमाधारकांना मिळणार २५ टक्के तात्काळ...पुणेः राज्यात प्रतिकूल परिस्थितीमुळे खरीप...
खोटे बोलण्यासाठी नाही, प्रामाणिक...भिलवडी, जि. सांगली : ‘‘मी तत्काळ मदतीबाबत विचार...
'रेडग्लोब’ द्राक्षवाणात मिळवली ओळखपुणे जिल्ह्यातील खोडद येथील सुहास थोरात यांनी...
उत्पन्नाच्या विविध स्त्रोतांमधून मिळवली...बोरगाव खुर्द (ता.. जि.. अकोला) येथील महेश वानखडे...
शेतकऱ्यांनी वापरले ६५० कोटींचे घरचे...पुणेः राज्यात यंदा सोयाबीनच्या पेऱ्यात मोठी वाढ...
कोकणात हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्र...
अडीच लाख शेतकऱ्यांच्या जमिनी सावकाराकडे...अमरावती : राष्ट्रीय व खासगी बँकांनी हात आखडता...
धरणक्षेत्रात पावसाची हजेरी पुणे : पावसासाठी पोषक वातावरण नसल्याने पावसाचा...
सर्वदूर हलक्या पावसाची शक्यता पुणे : बंगालच्या उपसागरातील कमी दाब क्षेत्राच्या...
पीक विम्यात कुचराई केल्यास नोटिसा काढा...नाशिक: पीकविमा योजनांची संबंधित कंपन्यांच्या...
मत्स्यबीज केंद्रामुळे महिला झाल्या...भिगवण (जि. पुणे) येथील पाच उपक्रमशील महिलांनी...
गणपतराव देशमुख यांच्या पार्थिवावर...सोलापूर ः शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि...
चीनची खत निर्यातीवर बंदी बीजिंग ः चीनमध्ये खतांचे घटलेले उत्पादन, विजेच्या...
राज्याची पीकपेरा नोंद आता शेतकरीच करणार पुणेः सातबारा उतारावरील पीकपेऱ्याची नोंद आता...
निसर्गदूतांच्या सहयोगाने ‘झाडांची भिशी...सोलापुरातील उपक्रमशील डॅाक्टर, इंजिनिअर्स,...
खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा...जळगाव : खानदेशात मका पिकाची लागवड यंदा बऱ्यापैकी...
पंधरा दिवस पावसाचा जोर कमी राहणार पुणे : गेल्या पंधरा दिवस कोकण आणि घाटमाथ्यावर...