agriculture news in Marathi land acquisition of gosekhurd not completed Maharashtra | Agrowon

`गोसेखुर्द'चे भू-संपादन संपेना

टीम अॅग्रोवन
बुधवार, 8 जुलै 2020

गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ ३६ वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, या प्रकल्पाकरिता आवश्‍यक भूसंपादनाची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही.

नागपूर : गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ ३६ वर्षांपूर्वी झाला होता. मात्र, या प्रकल्पाकरिता आवश्‍यक भूसंपादनाची कार्यवाही अद्याप पूर्ण झालेली नाही. पुन्हा नव्याने ३२ हेक्‍टर जागा संपादन करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे हा प्रकल्प पूर्ण होणार केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे.

गोसेखुर्द प्रकल्प पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणार असल्याचा दावा करण्यात आला होता. नागपूर, भंडारा, चंद्रपूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना सिंचनासाठी याचा लाभ होणार असून दोन लाख हेक्‍टरपेक्षा जास्त क्षेत्राला याचा फायदा होणार असल्याचे सांगण्यात येत होते. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कामाचा प्रारंभ झाला होता.

या प्रकल्पात नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांतील ८५ गावे विस्थापित झाली असून दोन हजार हेक्‍टरवर जमीन संपादित करण्यात आली. या प्रकल्पाला ३६ वर्षे होत असताना अद्याप याचे काम पूर्ण झालेले नाही. या प्रकल्पाच्या कामांवर आत्तापर्यंत १० हजार कोटींच्या जवळपास खर्च झाला. या प्रकल्पाच्या कामात हजारो कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचे आरोप झाले. एसीबीमार्फत चौकशी सुरू असून अनेक अधिकारी, कंत्राटदारांच्या विरोधात गुन्हेही दाखल करण्यात आले.

हा प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला असून केंद्र सरकारमार्फतही निधी देण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाण्यामुळे बुडीत क्षेत्र वाढणार असून कालव्याकरिता भूसंपादन करायचे आहे. त्यामुळे आता नव्याने ३२ हेक्‍टर जागा संपादित करण्यात येणार आहे. सिंचन विभागाकडून तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाला देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मूळ प्रस्ताव चुकला?
गोसेखुर्द प्रकल्पासाठी सर्व्हे करून आराखडा तयार करण्यात आला. या आराखड्याच्या आधारे प्रकल्पकरिता भूसंपादनाची कार्यवाही करण्यात आली. परंतु भविष्याच्या दृष्टिकोनातून आवश्‍यक कालवे, इतर कामांसाठी जागा संपादनाचा समावेश आराखड्यात करण्यात आला नाही. त्यामुळे ३५ वर्षांनंतरही भूसंपादनाची गरज पडत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.


इतर अॅग्रो विशेष
कृषी अधीक्षक, उपसंचालकांच्या बदल्यापुणे : कोविड १९ रोगाच्या पार्श्वभूमीवर कार्यरत...
मका विक्रीचे चुकारे ४० दिवसांनंतरही थकितजळगाव ः जिल्ह्यातील सुमारे साडेतीन हजार मका...
कोकणात मुसळधारेचा अंदाजपुणे ः  उत्तर प्रदेशचा नैऋत्य भाग ते...
राज्यात सर्वदूर हलका पाऊसपुणे ः राज्यातील बहुतांशी भागात हलका ते मध्यम...
सोयाबीनचे एकरी ५१.७७ क्विंटल उच्चांकी...जॉर्जिया येथील व्होलदोस्ता प्रांतामधील रॅंडी...
शेतकऱ्यांचे वनौषधी अनुदान पुन्हा रखडलेपुणे: राज्यात वनौषधी उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे...
दुर्गम शेतकऱ्यांसाठी जलकुंडे ठरली वरदानठाणे जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील दुर्गम...
बाजार समिती कर्मचाऱ्यांना शासन सेवेत...यावल, जि. जळगाव: केंद्राने ‘एक देश एक बाजार समिती...
‘एचटीबीटी’मुळे कपाशीतील आंतरपिके...पुणे : काळ्याबाजारातून आलेल्या तणनाशक सहनशील (...
केळी पिकात तयार केली ओळखमोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव,जि.सांगली) येथील...
बंदीची प्रक्रिया हवी  सुटसुटीत अन्...केंद्र सरकारने १८ मे रोजी २७ कीडनाशकांच्या बंदीचा...
कृषिसेवक भरतीतील गैरव्यवहारावर पांघरूण...पुणे : राज्यात २०१६ मध्ये झालेल्या कृषिसेवक भरती...
कोकण, विदर्भात मुसळधारेचा इशारा पुणे ः मध्य प्रदेश व परिसराच्या वायव्य भागात कमी...
संपूर्ण नियमनमुक्तीची अंमलबजावणी करापुणे:  सर्वच शेतमालाच्या संपूर्ण...
बाजार समिती कायद्यात बदल करण्याची मागणीपुणे: शेतमालाच्या संपूर्ण नियमनमुक्तीच्या...
भाजपच्या दूध आंदोलनापासून ‘संघर्ष समिती...नगर ः दुधाच्या दरासाठी सातत्याने आग्रही राहून...
मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरु...मुंबई: दूध उत्पादकांच्या मागण्या मान्य होईपर्यंत...
बीटी कपाशी बियाणे अप्रमाणित ...अकोला ः या हंगामात बाजारपेठेत विक्रीसाठी आणलेल्या...
'नाबार्ड’चा व्यवस्थापक नसल्यास अग्रणी...पुणे: कृषी पायाभूत निधी योजनेला प्रत्येक...
देशातील जलसंपत्तीची माहिती आता एका...पुणे ः केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देशभरातील...