Agriculture news in marathi; Land acquisition in Malegaon taluka by police settlement for the prosperity highway | Agrowon

समृद्धी महामार्गासाठी पोलिस बंदोबस्तात मालेगाव तालुक्यात भूसंपादन

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

वाशीम : जिल्ह्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गासाठी बुधवारी (ता. ७) पोलिस बंदोबस्तात जमीन संपादित करण्यात आली. या वेळी शेतकऱ्यांनी मोबदला कमी मिळत असल्याने विरोध केला. तरीही यंत्रणांनी पोलिस बंदोबस्तात पिकांवर जेसीबी फिरवून भूसंपादन केल्याने रोष व्यक्त होत आहे.

वाशीम : जिल्ह्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गासाठी बुधवारी (ता. ७) पोलिस बंदोबस्तात जमीन संपादित करण्यात आली. या वेळी शेतकऱ्यांनी मोबदला कमी मिळत असल्याने विरोध केला. तरीही यंत्रणांनी पोलिस बंदोबस्तात पिकांवर जेसीबी फिरवून भूसंपादन केल्याने रोष व्यक्त होत आहे.

समृद्धी महामार्ग जात असलेल्या मालेगाव तालुक्यातील रिधोरा, वारंगी, सुकांडा आणि अनसिंग येथे शेतकऱ्यांची जमीन ओलिताची असतानाही कोरडवाहू दाखवून मोबदला दिला जात असल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. त्यामुळे शेतकरी जमीन देण्यास नकार देत आहेत. समृद्धी महामार्गाचे काम सुरू असून संपादनाची राहिलेली जमीन ताब्यात घेण्यासाठी बुधवारी अधिकारी या गावांमध्ये पोचले.

शेतकऱ्यांनी पेरणी केलेली असून त्यावर जेसीबी मशीन चालविण्यात आले. महसूल, पोलिस खात्याचे अधिकारी फौजफाट्यासह आल्याने शेतकऱ्यांचा विरोध मोडून काढण्यात आला. जबरदस्तीने होत असलेल्या भूसंपादनाला विरोध म्हणून शेतकऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केले. या वेळी उपविभागीय अधिकारी राऊत, पोलिस उपअधीक्षक बनसोड, तहसीलदार आर. ए. काळे यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी आदी उपस्थित होते. 

वारंगी येथे विजयकुमार दहात्रे यांच्या नावे असलेल्या शेतीत डाळिंबाच्या बागेसह इतर पिके आहेत. असे असतानाही तलाठ्याच्या चुकीने हे क्षेत्र कोरडवाहू दाखविले आहे. आता समृद्धीमध्ये ही जमीन जात असून त्याचा मोबदला कोरडवाहूच्या दराने दिला जात असल्याने विरोध आहे. 
- राजकुमार दहात्रे, वारंगी, ता. मालेगाव जि. वाशीम


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...