ऊस उत्पादकांचा योग्य खते वापरून जमीन सुपीकतेसाठी पुढाकार

ऊस उत्पादकांचा योग्य खते वापरून जमीन सुपीकतेसाठी पुढाकार
ऊस उत्पादकांचा योग्य खते वापरून जमीन सुपीकतेसाठी पुढाकार

सांगली ः सांगली जिल्हा हा ऊस उत्पादनासाठी नेहमीच अग्रेसर राहिला आहे. जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकरी नवीन तंत्रज्ञान आणि योग्य खतांचा वापर करून जमीन सुपीक ठेवण्यासाठी पुढे येत आहेत. यामुळे अनेक ऊस उत्पादक शेतकरी उसाचे एकरी १०० टनांपेक्षा अधिक उत्पादन घेत आहेत. जिल्ह्यातील अनेक शेतकरी महाधन स्मार्टटेक खते वापरत आहेत. त्याचा उत्पादनवाढीसाठी प्रयत्न होताना दिसून येत आहे, असे मत महाधनचे कार्यकारी उपाध्यक्ष अरविंद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

इस्लामपूर येथे आयोजित महाधन ऊसभूषण शेतकरी परिसंवादात ते बोलत होते. या वेळी एकरी १०० टनांपेक्षा अधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या परिसंवादाला संजीव माने, अंजिक्य माने, अशोक खोत, विजय जाधव, मारुती जाधव, अमर पाटील, अमोल लकेसर, दत्तात्रेय चव्हाण प्रगतिशील शेतकरी हे उपस्थित होते. 

अरविंद कुलकर्णी म्हणाले, ‘‘स्मार्टकेम टेक्नॉलोजिज या कंपनीने आपली खत उत्पादन क्षमता ३ लाख मेट्रिक टनावरून ११ लाख मेट्रिक टनापर्यंत वाढवली आहे. तसेच महाधन स्मार्टेकच्या उत्पादनाने खत उद्योगात एक नवीन क्रांतीचे पर्व सुरू झाले आहे. महाधन हा प्रमुख ब्रॅंड असून, तो गुणवत्ता आणि विश्वासासाठी ओळखला जातो.’’

महाधन स्मार्टटेक १०ः२६ः२६ हे भारतातील एकमेव उत्पादन आहे. स्मार्टटेक खते पिकांची उत्पादन क्षमता वाढीस मदत ठरते. पांढऱ्या मुळींची संख्या वाढवून अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढून पिकांचा दर्जा आणि गुणवत्ता सुधारते. स्मार्टकेम टेक्नॉलॉजीजने FAST तंत्रज्ञानाने निर्माण केलेल ९० टक्के दाणेदार महाधन बेनसल्फ FAST बाजारात उपलब्ध आहे. यामध्ये ९० टक्के मूलभूत गंधक व १० टक्के बॅटोनाईट आहे. यामुळे जमिनीचा सामू सुधारण्यास मदत होते. या वेळी शेतकऱ्यांनी महाधन स्मार्टटेक १०ः२६ः२६, महाधन बेनसल्फ FAST या खतांबाबत आपले मत मांडले. या परिसंवादास कंपनीचे संजय बिराजदार, श्रीकांत मोरे, पंकज गोंजारी, रवी वाघमोरे, प्रकाश पाटील उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com