agriculture news in Marathi land Mashagat cost increased by 25 percent Maharashtra | Page 2 ||| Agrowon

शेती मशागतीचा खर्च २५ टक्क्यांनी वाढला 

अभिजित डाके
रविवार, 21 फेब्रुवारी 2021

गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शेतात यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला असून, ट्रॅक्टरच्या साह्याने अनेक कामे कली जातात. 

सांगली ः गेल्या काही दिवसांपासून डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शेतात यांत्रिकीकरणाचा मोठ्या प्रमाणात वापर होऊ लागला असून, ट्रॅक्टरच्या साह्याने अनेक कामे कली जातात. डिझेल वाढत्या दरामुळे मशागतीच्या खर्चात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या इंधन दरवाढीचा थेट फटका शेतकऱ्यालाही बसू लागला आहे. 

जिल्ह्यात शेतीतील मशागतीची कामे करण्यासाठी ट्रॅक्टरचा वापर वाढला आहे. अलीकडच्या काळात अल्पभूधारक शेतकरीही ट्रॅक्टर वापरू लागले आहेत. जिल्ह्यात ४३ हजारांहून अधिक ट्रॅक्टरची संख्या आहे. नांगर करण्यापासून ते पालाकुट्टी आणि द्राक्ष आणि डाळिंब बागेत कीटनाशके फवारणीसाठी याचा मोठ्या प्रमाणात वापर हेत आहे. एक पीक काढले की कमी कालावधीत शेतीची मशागत करून, शेतकरी दुसऱ्या पिकाची तयारी सुरू करतो. यासाठी विविध अवजारे व साहित्य साधनाचा वापर होतो. यंत्रामुळे शेतकऱ्याच्या वेळेच्या बचतीसह परिश्रम वाचले आहेत. त्यामुळे ट्रॅक्टररच्या संख्येत भर पडत आहे. 

जिल्ह्यात प्रत्येक गावानुसार मशागतीचे दर वेगळे असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला अधिक भार पडत आहे. एकाबाजूला इंधनाचे वाढते दर तर दुसऱ्या बाजूला भाजीपाल्यासह अन्य पिकांना अपेक्षित न मिळणारे दर आणि इंधनवाढीमुळे शेतीमाल वाहतूकदेखील खर्चिक झाली आहे. याची सांगड घालणे शेतकऱ्यांना कठीण बनले आहे. गेल्या वर्षी एकरी ७५०० ते ८००० रुपये येणारा खर्च आता १२,००० ते १३, ५०० रुपयांवर गेला आहे. 

अशी झाली दरवाढ 
गेल्या महिनाभरापासून डिझेल आणि पेट्रोलच्या दरात दररोज पंचवीस ते तीस पैशांनी वाढ होत आहे. सध्या डिझेलचा प्रति लिटर ८६ रुपये ०५ पैसे इतका आहे. ऑक्टोबर महिन्यात डिझेलचा दर प्रति लिटर ७५ रुपये ६५ पैसे असा दर होता. नोव्हेंबर महिन्यात २ रुपये २४ पैशांनी दरात वाढ झाली. तर डिसेंबर महिन्यात दीड रुपयाने दर वाढले. ३१ जानेवारीला ८२ रुपये १४ पैसे असा दर होता. १८ फेब्रुवारी म्हणजे अठरा दिवसांत ३ रुपये ८१ पैशांनी दर वाढले आहेत. 

मशागतीचे दर (प्रति एकर) 

मशागतीचा प्रकार. २०२० २०२१ 
नांगरणी २००० २४०० ते २६०० 
रोटर मारणे २००० २४०० ते २६०० 
खुरटणी १००० १२०० ते १५०० 
सरी पाडणी १००० १२०० ते १६०० 
पेरणी १३०० १४०० ते १५०० 
पालाकुट्टी २००० २२०० ते २५०० 
ऊस बांधणी १००० १२०० ते १४००

प्रतिक्रिया
इंधनाच्या वाढत्या दरामुळे मशागतीच्या दरात वाढ झाली आहे. ट्रॅक्टरचा खर्च, चालकाचा पगार आणि वाढते इंधन दर, असा वर्षाला खर्च वाढतोय. त्यामुळे ट्रॅक्टर व्यवसाय धोक्यात आला आहे. मशागतीचा खर्च वाढत असल्याने शेतकऱ्यांना परवडत नाही. पण त्याला पर्याय नाही. 
- सुनील पाटील, ट्रॅक्टर मालक, दूधगाव, ता. मिरज 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात अद्याप वीस लाख टन ऊस शिल्लक कोल्हापूर : राज्यातील ऊस उत्पादक पट्यातील साखर...
बाजार समित्या बंद ठेवू नका पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमाल वितरण सुरळीत...
राज्यात चिकन, अंड्यांच्या दरात सुधारणा नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर...
साखर वाहतुकीसाठी क्विंटलला १०० रुपये...कोल्हापूर : पूर्वेकडील राज्यांनी वाहतूक खर्चात...
कमाल तापमान वाढण्यास सुरुवात पुणे : राज्याच्या अनेक भागांत आकाश कोरडे झाले आहे...
पीक बदलातून शेती झाली किफायतशीरनांदोस (ता.मालवण,जि.सिंधुदुर्ग) गावातील...
देशात यंदा सर्वसाधारण पाऊस;...पुणे : देशभरात यंदा मॉन्सूनचा सर्वसाधारण पाऊस...
चैत्री यात्राही यंदा प्रतिकात्मक...सोलापूर ः कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्‍...
अवजारे उद्योगावर मंदीचे ढग पुणेः राज्यात पाच अब्ज रुपयांची उलाढाल करणाऱ्या...
फळे, भाजीपाला थेट पणन परवान्याला ६...पुणे ः कोरोना टाळेबंदीत शेतीमालाचे नुकसान होऊ नये...
देशाची साखर उत्पादनात उच्चांकी झेप कोल्हापूर ः साखर उत्पादनात देशाची घोडदौड ३०० लाख...
क्यूआर कोड रोखणार हापूसमधील भेसळ रत्नागिरी ः बाजारपेठेमध्ये ‘हापूस’ची कर्नाटक...
जालन्यात वर्षभरात ४२९ टन रेशीम कोष...जालना : येथे प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात...
राज्यात उन्हाचा चटका वाढणार पुणे : आठवडाभर पूर्वमोसमी पावसाने धुमाकूळ...
भाजीपाला विकण्याचे शेतकऱ्यांपुढे आव्हान...कोल्हापूर : ‘ब्रेक द चेन’च्या नवीन...
आठवडी बाजारांचे नेटवर्क उभारत यशस्वी...पुणे येथील नरेंद्र पवार व चार मित्रांनी एकत्र...
धान्य प्रक्रियेतून ‘संत तेजस्वी’ ची...शेतकरी गटापासून वाटचाल करीत देऊळगावमाळी (जि....
कोविडला नैसर्गिक आपत्ती घोषित करा ः...मुंबई ः राज्यातल्या ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्‍...
उन्हाळी काकडीने उंचावले धामणखेलचे...बाजारपेठेची मागणी ओळखून धामणखेल (ता. जुन्नर. जि....
कडवंचीचे द्राक्ष आगार तोट्यात जालना : जिल्ह्यातील द्राक्षाचे आगार म्हणून ओळख...